‘आय कॅन फ्लाय’. . . कारण आयुष्यावर सर्वांचा समान अधिकार आहे.

0

एका ‘स्पेशल चाईल्ड’ची आई असल्यामुळे मिनू बुधीया त्या लोकांच्या गरजांना समजतात, जे या क्षेत्रात संघर्ष करत आहेत. त्यांच्या व्यक्तिगत अनुभवाने त्यांना मनोवैज्ञानिक विकासासाठी ‘अॅडलाइफ’ (AddLife)च्या स्थापनेसाठी प्रेरित केले. कोलकात्यातील या पहिल्याच सेंटरमध्ये ३०पेक्षा अधिक मानसिक आरोग्य व्यावसायिक चिकित्सालय आणि अव्यावसायिक चिकित्सालय अशा दोन्ही प्रकारात आपल्या तज्ञसेवा प्रदान करतात. मिनू सांगतात की, “मी अनेक दिवसांपासून माझी मुलगी प्राची (स्पेशल चाईल्ड) हिच्या भविष्याबाबत चिंतीत होते. मला चिंता असायची कारण, ती एक स्पेशल चाईल्ड आहे, जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिचे काय होईल? तिला मी टीव्ही बघायला मनाई करू शकते का, किंवा संध्याकाळी चालायला जाण्यासाठी थांबवू शकते का? माझी मुलगी इतकी सुस्त व्हावी, असे मला अजिबात वाटत नाही आणि माझ्या डोक्यात केवळ माझी मुलगीच नव्हती.”

हा विचार करताना त्यांना एक कल्पना सुचली की, या स्पेशल चाईल्ड प्रौढ गरजू मुलांना सशक्त बनविले जावे. या समाजात त्यांचेदेखील एक हक्काचे स्थान आहे. मिनू यांना वाटते की, “ या स्पेशल चाईल्ड मुलांना स्वतंत्र होण्यासाठी प्रशिक्षित केले जाऊ शकते, ज्यामुळे ते सुरक्षित कार्यस्थळी नोकरी करून स्वतःचा रोजगार मिळवू शकतील. काही चांगली मुले तर कॉर्पोरेट अशा ठिकाणी देखील नोकरी करू शकतात. ही समाजाची जबाबदारी आहे की, त्यांना गृहीत धरावे आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना नोकरी द्यावी. त्यांच्यासाठी एक वेगळा कोटा देखील असला पाहिजे, जसे पश्चिमी देशात असतो.”

मीना यांची नेहमीपासूनच मानवी मस्तिष्क आणि वैद्यकीय विज्ञानाच्या अध्ययनात रुची होती. त्यांनी ‘कॉग्निटिव बीहेवियर थेरपी’ (संज्ञानात्मक व्यवहार पध्दती)चा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. तसेच त्यांनी शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी सल्लागार म्हणून देखील काम केले आहे.

मीना बुधीया सांगतात की, “आपली छोटी मुलगी प्राची हिला उपचार पद्धती आणि सल्लासेवेसाठी (थेरपी आणि काउंसिलिंग) घेऊन जाताना मी पाहिले की, लोकांना विभिन्न प्रकारच्या सेवेसाठी अनेक उपचार केंद्राच्या फे-या माराव्या लागत असत आणि त्यात त्यांना खूप थकवा देखील येत असे. तेव्हा मी एका ‘वनस्टेप’ उपचार केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, जेथे मानिसक आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध असतील.”

मागील दोन वर्षापासून ‘अॅडलाइफ केयरिंग माइंड्स’चे ४ वर्ग काम करत आहेत – वैद्यकीय, प्रशिक्षण आणि विकास, अॅकेडमिया और माइंडस्पीक. वैद्यकीय वर्गात साइक्रिस्ट्स, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, मानसोपचारतज्ञ, उच्चार समुपदेशक, ऐकणे आणि बोलण्याचे चिकित्सालय. यांसारख्या सेवांसोबतच मानसिक आरोग्याची काळजी देखील घेतली जाते. प्रशिक्षण आणि विकास या वर्गात आई-वडील, शिक्षक, विद्यार्थी, कॉरपोरेट दर्शक आणि दुस-या सामाजिक संघटनेसाठी प्रासंगिक मुद्द्यांवर कार्यशाळेचे आयोजन केले जाते.

तीस-या अॅकेडमीया प्ले थेरपी या वर्गात वागणूक, सुधारणा, विशिष्ट शिक्षण विकार इत्यादी विषयांवर सामान्य सल्लाविषयक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशिष्ट वेळेसाठी असलेल्या अभ्यासक्रमाचे यशस्वीरीत्या संचालन केले जाते. चौथा गट म्हणजेच माइंड स्पिकचा असा खुला मंच आहे, जो प्रत्येक महिन्यात प्रासंगिक विषयावर मुक्तपणे बोलण्याच्या सत्राचे आयोजन करतो, जेथे प्रत्येक क्षेत्रात असलेले लोक सहभाग घेऊ शकतात आणि आपल्या विचारांना व्यक्त करू शकतात.

अॅडलाइफ केयरिंग माइंडच्या मुख्य संस्थापक मिनू बुधिया सांगतात की,-“ आता आम्ही पाचवा वर्ग आय कॅन फ्लायला सर्वांसमोर आणत आहोत. याला प्रामुख्याने स्पेशल चाईल्ड असलेल्या गरजू प्रौढ मुलांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना व्यवसायाभिमुख कामांसाठी प्रेरित करण्याची गरज आहे. यामुळे त्यांना स्वतःच्या कलागुणांची जाणीव होईल आणि त्यावेळी त्यांना असे वाटेल की, त्यांनी समाजात स्वतःचे काहीतरी योगदान दिले आणि काहीतरी सार्थक केले आहे. आम्ही आशा करतो की, जे हे प्रशिक्षण घेतील ते त्यानंतर आपल्या घरूनच ऑनलाईन काम करू शकतील आणि अशा वस्तू बनवण्यात समर्थ असतील, ज्यांची बाजारात विक्री केली जाऊ शकेल. आम्ही आय कॅन फ्लायसाठी नामांकन करणा-या प्रत्येक व्यक्तीच्या चेह-यावर आनंद आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची आशा करतो.”

आय कॅन फ्लायचे उद्दिष्ट स्पेशल चाईल्ड असलेल्या वयस्क गरजू १५ वर्ष किंवा त्याहून अधिक) मुलांसाठी एक असे मंच उपलब्ध करणे आहे, जेथे ते त्यांची रुची आणि स्वतःमधील क्षमता जाणू शकतील, विभिन्न कारकीर्दीच्या पर्यायाबाबत जागरूक होऊ शकतील आणि ज्यामुळे ते एका चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असलेलेल्या गुणाला प्रशिक्षणामार्फत विकसित करू शकतील. प्रशिक्षणामुळे त्यांना केवळ आर्थिकच फायदा होणार नाही तर, त्यांच्यात एक नवी उमेद देखील जागेल आणि त्यांना प्रतिस्पर्धात्मक जगात स्वतंत्र बनवेल.

मीना सांगतात की, “ हा एक विशेष नक्षीकाम करून बनविलेले पाठ्यक्रम आहे, ज्याला त्या व्यावसायिकांनी बनविले आहे, ज्यांनी स्पेशल चाईल्ड असलेल्या गरजू प्रौढांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. असे प्रौढ हळू हळू कौशल्य आधारित उपक्रम शिकू शकतील आणि आमच्या निर्मिती क्षेत्रातील एक भाग बनतील किंवा आपल्या घरी स्वतंत्ररित्या काम करू शकतील. कारण प्रत्येकजण आपापल्या गतीनुसार शिकतात, त्यासाठी अॅडलाइफ केयरिंग माइंडसचे शिक्षक आणि प्रशिक्षक त्यांना त्यांच्या गतीनुसार शिकण्यासाठी मदत करतात. शिक्षक आणि प्रशिक्षक एक सहयोग आणि उत्साहाचे वातावरण बनविण्यात मदत करतील.”

आय कॅन फ्लाय केवळ कौशल्य वाढविण्यासाठीच मंच उपलब्ध करत नाही तर या गोष्टीकडे देखील लक्ष देतात की, अशा स्पेशल गरजू प्रौढांच्या नातेवाईकांना थोड्या वेळेसाठी विश्रांती मिळू शकेल. संशोधनानुसार, जर काळजी घेणारे नियमितरित्या आपल्या कामाहून काही वेळेसाठी स्वतःला लांब ठेवू शकले नाही तर, त्यांची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते.

मीना अॅडलाइफ केयरिंग माइंडचा विस्तार करत आहेत आणि स्वतःच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणत आहे. आज त्यांच्या चेह-यावर हास्य आहे. त्यांची मोठी मुलगी प्रियम देखील आता त्यांच्या या मोहिमेत त्यांच्यासोबत सामील आहे.

मीना यांची मुलगी प्राचीने काही गरजूंसाठी त्यांना खूपच संवेदनशील बनविले आहे. ही एडलाइफचीच कमाल आहे, नाहीतर त्या त्यांच्यासाठी इतक्या जागरूक झाल्या नसत्या. मीना योग्यच सांगतात की, “ईश्वर जे काही करतो, त्याच्या पाठीमागे त्यांचा एक उद्देश असतो. प्राची मार्फत त्यांनी मला आपल्या पद्धतीने समाजाची सेवा करण्यासाठी प्रेरित केले. माझे स्वप्न आता खूप मोठे आहे. ईश्वराचे आभार !”

लेखक : साहिल

अनुवाद : किशोर आपटे.