राष्ट्रपती पदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीराकुमार यांच्या बाबत जाणून घ्या

राष्ट्रपती पदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवार मीराकुमार यांच्या बाबत जाणून घ्या

Wednesday June 28, 2017,

2 min Read

मीरा कुमार हे नाव आहे महत्वाच्या विरोधी पक्षांच्या १७जुलै २०१७ रोजी होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून. त्यांच्या उमेदवारीची घोषणा २२जून २०१७ रोजीच करण्यात आली आहे. त्या ज्येष्ठ कॉंग्रेस आणि दलित नेत्या आहेत, ज्यांचा राजकीय अनुभव प्रदीर्घ आणि दांडगा आहे.


Image Source: Huffington Post India

Image Source: Huffington Post India


७२ वर्षांच्या मीराकुमार या संसदेच्या पाच वेळा सदस्या राहिल्या असून तीन वेळा त्या वेगवेगळ्या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. उत्तर प्रदेशातील बीजनोर, दिल्लीमध्ये करोलबाग आणि बिहारमधील सासाराम. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून त्याची निवड २०१४ मध्ये झाली होती ही जबाबदारी त्यांनी शेवटपर्यत निभावली. एका वृत्ता नुसार, २००४ मध्ये त्या कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्री म्हणून समाविष्ट झाल्या. मनमोहन सिंह यांच्या सरकार मध्ये त्या जलसंपत्ती मंत्री होत्या, कॉंग्रेसच्या संघटनात्मक पदांवर देखील त्यांनी काम केले आहे. त्यात पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांनी निभावली होती. मीरा या स्वातंत्र्य सैनिक आणि माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. ३१मार्च १९४५ रोजी पटना येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी एलएलबी सोबत इंग्रजी साहित्यात मास्टर्स ही पदवी मिळवली आहे. एका वृत्तानुसार त्यांनी १९७३मध्ये भारतीय विदेश सेवेत काम केले त्या दरम्यान त्या स्पेन, मॉरिशस, आणि यूके येथे राजदूतावासात कार्यरत होत्या. त्यानंतर राजीव गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि उत्तर प्रदेशात बिजनौर येथून लोकसभा निवडणूकीची उमेदवारी केली.

केंद्रीय समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांची कामगिरी त्या स्वत: दलित समाजातून आल्या असल्याने खाजगी क्षेत्रातील आरक्षणाच्या मानसिकतेला कलाटणी देणारी ठरली. गावकुसाबाहेर राहिलेल्या समाजाला न्याय देताना त्यांनी त्यांची व्यापक व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला. जातीच्या आधारे हक्क नाकारण्याला त्यांनी विरोध केला, त्यांच्या एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या की, “ देशाचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर शतकानुशतकांचे विचार सोडावे लागतील ज्यात विशिष्ट वर्गाला प्राधान्य आणि विशिष्ट वर्गाचे हक्क जाती आणि जमातीच्या नावाखाली हिरावले गेले आहेत.”

१९९१-९२ तसेच १९९६-९९ मध्ये मिरा यांनी कॉंग्रेसच्या सरचिटणीस म्हणून काम केले, पक्षाचे निर्णय घेणा-या कार्यसमितीच्या देखील त्या सदस्या राहिल्या आहेत. २००९मध्ये ज्यावेळी त्यांची निवड लोकसभा अध्यक्षा म्हणून झाली, त्यांनी सदस्यांना त्यांचा वेळ प्रामुख्याने वैधानिक आणि उत्पादक गोष्टींवर देण्याचे आवाहन केले. त्यांनी अनेक संसदीय समित्यांचे नेतृत्व केले, ज्यात आंतर संसदीय केंद्रीय आणि राष्ट्रकुल अध्यक्षांच्या परिषदेचा समावेश होता.

मीरा यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली होती, त्यावेळी त्यांचे वडील १९४६च्या अंतर्गत सरकारचे सदस्य होते, नेहरू ज्या सहजपणे आणि साधेपणाने मुलांमध्ये रमत असत त्याबद्दल त्यांना नेहमी कौतुक वाटे. त्यांना हिंदीत कविता लिहिण्याचा छंद आहे, सांस्कृतीक वारसा जतन आणि हस्तकला हे देखील त्यांचे आवडीचे कला विषय आहेत.