‘सच्ची सहेली’, दिल्लीच्या सरकारी शाळांमधून सेवाभावी संस्थेचा मासिकपाळीसंबंधी जाणिव जागृती कार्यक्रम!

‘सच्ची सहेली’, दिल्लीच्या सरकारी शाळांमधून सेवाभावी संस्थेचा मासिकपाळीसंबंधी जाणिव जागृती कार्यक्रम!

Friday February 24, 2017,

2 min Read

‘सच्ची सहेली’ नावाच्या सेवाभावी संस्थेने दिल्लीतील झोपडपट्ट्यामध्ये मासिक पाळीबाबत जाणिव जागृती करताना कार्यशाळा घेतल्या. या सेवाभावी संस्थेने आता या मासिक पाळी बाबतच्या चर्चा ७० सरकारी शाळांमधून करण्याची तयारी केली आहे. सच्ची सहेली आता नेहमीच विचारल्या जाणा-या त्या प्रश्नाना सहजतेने उत्तरे देणार आहे, जे मासिक पाळीच्या वेळी शाळेत जाणा-या मुलीना पडतात. या सेवाभावी संस्थेने ‘ब्रेक द ब्लडी टॅबो’ अभियान सुरु केले आहे. ज्यातून सातत्याने मुलींशी संवाद साधला जातो. 

Source: Impatient Optimists

Source: Impatient Optimists


डॉ. सुरभी सिंग, या सेवाभावी संस्थेचे नेतृत्व करतात, ज्या याबाबतच्या मुलींच्या प्रश्नांना शास्त्रीय आणि उपयुक्त पध्दतीने उत्तरे देतात. या मोहिमेचा मुख्य उद्देश मुलींच्या मनात मासिक धर्माबाबत असलेल्या गैरसमज आणि भितीपासून त्यांना मुक्त करणे हा असून त्यासाठी मुलींना प्रश्नपत्रिका देवून त्यात उत्तरे देण्यास सांगण्यात येते. त्यातून त्यांच्या मनात या विषयावर किती माहिती किंवा पांरपारीक गोष्टींची भिती आहे ते समजते. या चमूतील लोक या मुलींच्या आईंसोबतही चर्चा करतात आणि त्यांच्याही मनातील या विषयावरील भिती आणि गैरसमज दूर करतात.

एका वृत्तानुसार, डॉ. सुरभी म्हणाल्या की, “ साधारणपणे मासिकपाळीबाबत मुलींना काय करावे त्याबाबत त्यांच्या आईचे मार्गदर्शन मिळते. ज्या नकळत त्यांना भिती देखील दाखवत असतात. जी नैसर्गिक धर्माबाबत निर्वाहन करताना अनावश्यक असते. लहान वयातच मुलींच्या मनातील ही भिती काढली पाहिजे की, मासिक धर्म हा रोग नाही, त्यांना त्याची लाज देखील बाळगण्याचे काही कारण नाही”.

या कार्यशाळा झोपडपट्ट्यातून घेतल्या जातात, त्यात कोंडी, लक्ष्मी नगर, कृष्णा नगर, पतपरगंज, त्रिलोकपूरी, मदनपूर खादर, वाझीपूर, आणि शाकूर बस्ती या भागांचा समावेश आहे. डॉ. सुरभि या स्त्रिरोग तज्ञ आहे, ज्या सध्या मासिकपाऴीच्या विषयावर काम करत आहेत, ज्याबाबत खूपच गैरसमज आहेत आणि जागरुकतेचा आभाव आहे.

सच्ची सहेली या सेवाभावी संस्थेचा हा अभिनंदनीय उपक्रम आहे, ज्यातून तळागाळातील स्तरापर्यंत मासिकपाळीबाबत जाणिव जागृती आणि आरोग्याबाबत काळजी घेण्याची माहिती दिली जात आहे.