या मंत्र्यांना भेटा, ज्यांनी आपले पद तीन मुलींना दिवसभरासाठी दिले!

या मंत्र्यांना भेटा, ज्यांनी आपले पद तीन मुलींना दिवसभरासाठी दिले!

Monday February 06, 2017,

2 min Read

देशभरात राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जात असताना, राजस्थान मध्ये वेगळ्याच पध्दतीने हा दिवस साजरा केला गेला. पहिल्यांदाच अशाप्रकारे हा दिवस साजरा करताना राजस्थानच्या तीन मुलींना २४ जाने. २०१६ या दिवसभरासाठी मंत्रीपदावर नियुक्त करण्यात आले. गरिमा बालिका संरक्षण सन्मान नावाच्या या उपक्रमात महिला आणि बाल कल्याण मंत्री अनिता बाधेल यांनी त्यांच्या पदाचा पदभार राजसमंद येथील जशोदा गामेटी, टोंक येथील सोना बैरवा, आणि राजावत येथील प्रिती कनवार यांना दिवसभरासाठी देवू केला. या मुलींनी पदभार हाती घेताच दहा हजार पाचशे मोबाईल फोन अंगणवाडी कर्मचा-यांना वितरीत करण्याचा निर्णय घेतला. तसेच २८२ महिला पर्यवेक्षकांना आय पॉड वितरीत करण्यात आले असे या बाबतच्या वृत्तात म्हटले आहे.


महिला आणि बाल कल्याण मंत्री अनिता बाधेल 

महिला आणि बाल कल्याण मंत्री अनिता बाधेल 


या तीन मुली, ज्यांनी बालविवाहा विरुध्द आवाज उठविला होता, त्यांचा अशाप्रकारे सन्मान केला गेला. बाधेल या देखील या एक दिवसांच्या मंत्री झालेल्या मुलींच्या निर्णयाने प्रभावित झाल्या. ‘ आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की मुली या मुलांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. त्यांना स्वातंत्र्य मिळाले तर त्यादेखील भरारी घेवू शकतात. समाजाने त्यांना समान हक्क आणि संधी दिल्या पाहिजेत. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या स्वत:ला सिध्द करु शकतील ” बाधेल म्हणाल्या.

याबाबतच्या बातमी नुसार ही घोषणा करून मंत्री महोदयानी बिर्ला ऑडीटोरियम मध्ये भाषण केले त्यात समाजाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांचे सरकार महिलांच्या विकासा करीता करत असलेल्या अनेक योजनांची त्यांनी माहिती देखील दिली. या प्रसंगी महिला आणि बाल कल्याण विभागाचे सचीव कुलदिप रांका, एकात्मिक बालविकास सेवांचे संचालक समित शर्मा आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

२४ जानेवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय कन्या दिवस मुलींच्या विकासाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसांची सुरुवात करण्यामागे अधिक समर्थन आणि संधी देवून मुलींना समानतेची वागणूक देशात दिली जावी हा संदेश दिला जातो. समाजात महिलांना सहन कराव्या लागणा-या अन्यायाबाबत जागृती आणण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो.

या सारख्याच आणखी काही कहाण्या तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कळवा. यासाठी [email protected] वर संपर्क साधा.