बँका आणि उद्योजकांच्या समन्वयातून साकारणार 'सर्विस अपार्टमेंटस्' : ' 14 स्क्वेयर'

बँका आणि उद्योजकांच्या समन्वयातून साकारणार 'सर्विस  अपार्टमेंटस्'  : ' 14 स्क्वेयर'

Friday October 16, 2015,

5 min Read


जर तुम्ही जेटसेटर असाल आणि जर तुम्हाला आठवड्यातले जास्त दिवस घराच्या बाहेरच रहावं लागत असेल, तर सर्व्हिस्ड रुम्स आणि अपार्टमेंट्सची संकल्पना तुमच्यासाठी नवीन नाही. पण भारतात मात्र ही संकल्पना अजूनही तशी नवीन आहे. सर्व्हिस अपार्टमेंट्स म्हणजे जिथे तुम्हाला हॉटेलसारख्या सर्व सेवा, सुविधा मिळतात.

व्यवसायानिमित्त सतत प्रवास करावा लागत असल्यानं गौरांग चंद्राना आणि प्रशांत या दोघांनाही भारत आणि परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी रहावं लागायचं. पण परदेशात ज्याप्रमाणे पूर्णपणे व्यावसायिक सर्व्हिस अपार्टमेंट्स आहेत, तशा गुणवत्तेची सेवा भारतात नाही, हे या दोघांनाही खटकत होतं.

सुरुवातीची कल्पना आणि संशोधन

ही संकल्पना पहिल्यांदाच प्रत्यक्षात उतरवली जात असल्यानं या दोघांनीही अनेक कॉर्पोरेट्सना संपर्क साधला. या कल्पनेचं प्रत्यक्षातलं रुप कसं असेल, त्यातून काय फायदा होईल हे सगळं या दोघांनी त्यांना समजावून सांगितलं, त्यानंतर जो प्रतिसाद मिळाला, तो खरोखरच उत्साह वाढवणारा होता.

गौरव आणि प्रशांतनं मार्केटमध्ये सर्वेक्षण केलं आणि भारतासह जगभरातून माहिती गोळा केली असता त्यांना असं लक्षात आलं की भारतात सर्व्हिस अपार्टमेंट उद्योग त्याच्या बाल्यावस्थेतच आहे आणि खोल्यांचीही भरपूर कमतरता आहे. जगभरात ७ लाखांच्या आसपास अपार्टमेंट्स असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण भारतात मात्र या व्यवसायाचं स्वतंत्र अस्तित्वच नव्हतं. भारतातल्या असंघटित क्षेत्रांमध्ये एकूण २५ हजार अपार्टमेंट्स आणि 50 हजार खोल्या असल्याचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला.

या क्षेत्रात पुढच्या काही वर्षांत जवळपास एक लाख नवीन खोल्यांची आवश्यकता भासेल,

असा अंदाज व्यक्त केला जातोय. “ या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला आमचं काम प्रायोगिक तत्वावर सुरु करायला चालना मिळाली आणि आश्चर्य म्हणजे आमच्या कंपनीचं प्रत्यक्ष काम सुरु होण्याआधीच विक्रीलाही सुरुवात झाली., “प्रशांतनं सांगितलं. यातूनच जन्म झाला १४ स्क्वेअरचा...

सर्व्हिस अपार्टमेंट्स म्हणजे मुख्यत: छोट्या स्थानिक लोकांकडून राहण्याची केली जाणारी सोय...असं भारतातल्या या व्यवसायाचं प्राथमिक स्वरूप होतं. पण उच्च दर्जाच्या सेवा देणारे काही नियोजनबद्ध नामांकित व्यावसायिकही होते.

१४ स्क्वेअरच्या मदतीनं बाजारपेठेतील असंघटित, अनियोजित अशा क्षेत्रामध्ये आम्ही नियोजनबद्ध असं काही देण्याचा प्रयत्न करत होतो, असं प्रशांतनं सांगितलं.

“ आम्ही स्थानिक लोकांसोबत काम केलं. अपार्टमेंट्स आणि नियोजित तसंच दर्जात्मक सेवा देण्यासाठी त्यांच्यासोबत सहकार्याचाच दृष्टीकोन ठेवला. ग्राहकांपर्यंत पोहोचलो आणि तरीही या जागेत आम्ही नवीन काही देण्याची कल्पना मात्र कायम ठेवली. थोडक्यात, आम्ही सर्वसामान्य माणसासाठी मॅरिएट्स, वेस्टिन किंवा नोव्होटेलच्या बरोबरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, “ पुढे त्यानं सांगितलं.


संशोधन टीम

चार वर्षांपूर्वी प्रशांत आणि गौरांगची एका व्यासपीठावर एकमेकांशी ओळख झाली. तेव्हापासून ते एकमेकांचे पक्के मित्र झाले आणि सेवाक्षेत्रात एकत्र काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रिअल इस्टेटच्या एका पोर्टलसाठी त्यांनी बाहेरून काही काम केलं आणि रिअल इस्टेट संपत्ती व्यवस्थापन सल्लागार म्हणूनही काम पाहिलं.

“२०१४ सालच्या सुरुवातीला, सेवा क्षेत्रातली आमची आवड पाहून आमच्या एका मित्रानं आम्हाला सर्व्हिस अपार्टमेंट्स या संकल्पनेविषयी विचार करायला संगितलं .आम्ही खूप अभ्यास केला, सतत विचारमंथन केलं, नवनवीन कल्पना मांडल्या आणि मग आंतरराष्ट्रीय डिझाईन (आराखडा) आणि ब्रँड सल्लागार म्हणून सुरुवात केली,”गौरांगनं माहिती दिली.

२०१४ मध्ये कंपनी स्थापन झाली आणि डिसेंबरमध्ये दोन कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं विक्रीलाही सुरुवात झाली. हे दोन्ही कर्मचारी त्यांच्या अन्य व्यवसायातलेच होते.

सगळ्यात मोठं आव्हान शेवटच्या टप्प्यावर होतं.इथले जे स्थानिक व्यावसायिक होते त्यांचा दृष्टिकोन, मानसिकता पूर्णपणे वेगळी होती आणि नेमकं नव्या संधी काय असू शकतात याबद्दल रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड उदासीनता होती.


१४ स्क्वेअरची टीम

१४ स्क्वेअरची टीम



टीम बांधणी


प्रशांत हा वाणिज्य अर्थात् कॉमर्स शाखेचा पदवीधर आहे आणि त्यानं त्याचं पदव्युत्तर शक्षण झेविअर स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI) मधून पूर्ण केलंय.त्याला ब्रिटनमध्ये रिअल इस्टेटशी संबंधित कायदेशीर सेवा क्षेत्रातील कामाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. तसंच त्यानं WNS च्या भारतातील कायदेशीर मालमत्ता केपीओच्या कार्यकारी प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे. त्याशिवाय त्यानं ब्रिटनमध्ये एक अनुदानित कार्यालयही सुरु केलं.त्यानंतर त्यानं २००२ साली बंगळुरुमध्ये स्वत:ची कायदेशीर सल्ला देणारी केपीओ सुरु केली. या कंपनीचं व्यवस्थापन आता त्य़ाचा भाऊ पाहतो.

गौरांग एमएमएस आहे आणि त्याला बँकिंग आणि वित्त क्षेत्रातला १४ वर्षांचा अनुभव आहे. त्यानं अनेक नामांकित संस्थांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलं आहे आणि खूप मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. बँकिंग, तारण आणि जोखीम व्यवस्थापन क्षेत्रातला तो तज्ज्ञ आहे.

“ इंटिग्रेटेड डिझाईन वर्क्सच्या संस्थापक आणि निर्मिती संचालक शैलजा शाह या आमच्या डिझाईन आणि ब्रँड सल्लागार आहेत. त्यांनी राष्ट्रीय डिझाईन संस्थेमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आणि त्यांना न्यूयॉर्कमधल्या पार्सन्समध्ये १२ वर्षांचा कामाचा अनुभव आहे, “ असंही गौरांगनं सांगितलं.

अगदी घड्याळ्याच्या काट्यावर मर्यादित कक्षेत चालण्यापेक्षा प्रत्यक्ष सेवा पुरवण्यावर या संस्थेचा विश्वास आहे.

परिवर्तन आणि विकास

सध्या रात्रीच्या वेळेस पुरवल्या जाणाऱ्या खोल्यांच्या संख्येत दर पंधरा दिवसांनी वाढ होते असा टीमचा दावा आहे आणि पुढच्या चार ते पाच महिन्यांमध्ये एका दिवसांत १०० ते २०० नवीन ब्रँडेड आणि विशिष्ट दर्जाच्या खोल्या पुरवण्याचं त्यांचं उद्दीष्ट आहे. भौगोलिकदृष्ट्या कंपनी पुण्यात स्थापन झाली, पण आता ती १० शहरांमध्ये कार्यरत आहे. कोलकाता, दिल्ली-एनसीआर,अहमदाबाद, मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई, हैद्राबाद आणि कोची. “आम्ही सध्या आमच्या संबंधित भागीदारांचा (स्थानिक व्यावसायिक) पूर्ण वापर करत आहोत. पण आमची टीम वाढत जाईल तसं आम्ही आमच्या मालकीच्या नवीन खोल्या घेण्याचं ठरवलं आहे,” प्रशांतनं पुढची ध्येय स्पष्ट केली.

निधी आणि भविष्य

ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याआधी १४ स्क्वेअर कंपनीनं चार गुंतवणुकदारांकडून ३५ लाख रुपयांचा निधी उभारला. आता ३.२५ कोटी निधी मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

थोडक्यात,सध्या टीमनं व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे आणि मोठ्या व्यवसायाचा पाया घातला आहे, असं म्हणायला हरकत नाही. पुढच्या दोन वर्षांत ३० शहरांमध्ये स्वत:च्या दहा हजार खोल्यांची मालमत्ता म्हणून भर टाकण्याचा कंपनीचा मानस आहे. या खोल्या व्यवस्थापन कंत्राटं, विक्री केंद्र आणि त्यासारख्याच व्यवस्थांमधून घेण्याचं कंपनीनं ठरवलं आहे.

नोंदणी व्यवस्था आणि बॅक एंड व्यवस्थेमध्ये सध्या सुधारणा करण्याचं काम सुरु आहे. “आतापर्यंत अगदी कमीत कमी तंत्रज्ञान वापरून आम्ही विक्री वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या तंत्रज्ञानविषयक गरजाही आम्ही याच तंत्रज्ञानाच्या सहाय़्यानं पूर्ण करू शकलो आहोत, “असंही प्रशांतनं सांगितलं.