व्हिल चेअरवर योगासने: अपंगांचे जीवन सक्षम बनवणारे गुरू सैयद पाशा

व्हिल चेअरवर योगासने: अपंगांचे जीवन सक्षम बनवणारे गुरू सैयद पाशा

Monday October 19, 2015,

4 min Read

संगीताच्या तालावर दोन पायांवर थिरकताना तुम्ही लोकांना पाहिले असेल. परंतु व्हिल चेअरवर तितकेच उत्कृष्ट भारतीय शास्त्रीय नृत्य आणि योग केला जाऊ शकतो यावर तुम्ही विश्वास ठेवाल का ? या कठीण कामाला सहज सोपे बनवण्याचे श्रेय जाते सैयद सलाउद्दीन पाशा यांना. पाशा यांना योग खूपच आवडतो. याच योगमुळे ते आपल्या वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या समवयस्क मुलांच्या तुलनेत अधिक चपळ आणि स्फुर्तीदायक होते. त्यांना संगीताच्या सुरांची आणि संस्कृतमधील श्लोकांची चांगली माहिती आहे. चांगल्या गोष्टी शिकण्याच्या आड कधीही कोणता धर्म येत नाही असे त्यांना वाटते. इतरांना योग शिकवणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे असे पाशा यांना वाटते. याचे कारण म्हणजे योग हा समानता, न्याय आणि सक्षमीकरणाशी संबंधीत आहे असे त्यांना वाटते.

image


पाशा यांना वाटते, की एका विशिष्ट समुदायाच्या लोकांचे मनोबल वाढवण्याची गरज आहे, हा समुदाय म्हणजे शारीरिक रुपाने कमजोर असणारे लोक. गेली ४० वर्षे त्यांनी योगदर्शनावर खूप काम केले आहे. जे लोक शारीरिक दृष्ट्या कमजोर आहेत अशा लोकांना याचा खूप फायदा झालेला आहे. पाशा यांच्या मते योग हा प्रकार काही मनाची लहर नाही, तर ते जीवनाचे दर्शन आहे. स्वामी विवेकानंद,रामकृष्ण परमहंस असे महात्मे याचे अनुयायी आहेत याचे हेच कारण आहे. गुरू पाशा जेव्हा शारीरिक कमजोर लोकांना योग शिकवतात, तेव्हा त्यांना पंच महाभूतांमध्ये संतुलन तयार करण्यास मदत मिळावी असा त्यांचा प्रयत्न असतो. हा आमच्या ब्रह्मांडाचा एक भाग आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम प्रकार नाही, तर ते संगीत, नृत्य, मंत्र, मुद्रा आणि आध्यात्मिकतेचे मिश्रण आहे.

image


image


पाशा म्हणतात, “मी केवळ योग करणे शिकवत नाही, तर लोकांनी कर्म योग, धर्म योगाच्या माध्यामातून निरोगी कसे रहावे हे शिकावे असे आपल्याला वाटते.” सुरवातीच्या काळात पाशा पाण्यामध्ये पद्मासन, शवासन आणि प्राणायामचा भरपूर सराव करत असत. कोणत्याही व्यक्तीमध्ये जन्मत: किंवा मग एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा मानसिक अपंगत्वामुळे शारीरिक दुर्बलता येऊ शकते. योग अशा लोकांना आत्मविश्वास देण्याचे काम करतो. शिवाय आत लपलेल्या क्षमता बाहेर काढण्याचे काम सुद्धा करतो. याचे उदाहरण द्यायचे झाले तर ते पाशा यांच्या शिष्यांचे देता येईल. पाशा यांचे एक शिष्य कायम व्हिल चेअरवर असतात आणि ते चक्क शीर्षासन तसेच मयूरासनासारखी कठीण आसने आपल्या नृत्याद्वारे करत असतात. गुरू पाशा म्हणतात की त्यावेळी ती व्हिल चेअर ही त्यांच्या शरीराचा एक भागच असते. ही आसने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अडथळ्यांना दूर करतात आणि तुम्ही स्वत:ला शारीरिक दृष्ट्या कमजोर समजू नका असे त्यांना सांगत असतात. ही आसने त्यांना स्वातंत्र्य देत असतात.

image


image


image


‘अॅबिलिटी अनलिमिटेड फाऊंडेशन’ ही एक धर्मदाय संस्था आहे. ही संस्था गरू पाशा यांनी स्थापन केली होती. योगाचा अभ्यास हा नृत्य थेरपी, संगीत चिकित्सा, पारंपारिक योग चिकित्सा, समूह चिकित्सा आणि रंग चिकित्सा यांचा मेळ आहे. पाशा यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा तुम्ही संगीतात योग करता तेव्हा तुम्ही त्यातील एक ताल सुद्धा सोडू इच्छित नाही. यामुळे एकाग्रतेचा स्तर वाढतो. योगासोबतच संस्था चालवणे कठीण काम आहे. विशेषत: जेव्हा विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या कमजोर असतात तेव्हा ते अधिकच कठीण असते. त्यांच्याकडे योग शिकण्यासाठी येणा-या प्रत्येक विद्यार्थ्याची शारीरिक अडचण वेगळी असते. त्यामुळे त्यांना केवळ विद्यार्थ्यांशी बोलून भागत नाही, तर त्यांच्या पालकांशी देखील सल्लामसलत करावी लागते. अनेक वेळा एखाद्या विद्यार्थ्याला मानसिक धक्क्यातून किंवा नैराश्यातून बाहेर येण्यासाठी कैक वर्षे लागतात. गुरू पाशा सुनामी पीडित मुलांवर देखील उपचार करतात. ही मुले सुनामी दुर्घटनेनंतर पूर्णपणे हरवून गेली होती असे पाशा सांगतात. या मुलांच्या मनातून भय काढून टाकून त्यांना शांती प्राप्त करून देण्यासाठी पाशा यांनी ध्यानाची देखील मदत घेतली. याचा खूप चांगला परिणाम जाणवला. ही प्रक्रिया भले हळू चालणारी प्रक्रिया असेल, परंतु ही प्रक्रिया निरंतर अशी चालणारी प्रक्रिया आहे. जर एखाद्याला कासवासारखे जीवन जगायचे असेल, तर त्याला हळूच चालावे लागेल. परंतु जर कुणाला कुत्रा व्हायचे असेल तर मग त्याचा जीवनकाल आपोआप कमी होऊन जाईल.

image


देशात योगाची लोकप्रियता वाढत चालली आहे. योग आता एक व्यावसायिक उत्पादन बनून विकले जात आहे. योग आता एक आकर्षक व्यवसाय आणि जाहिरातबाजीच्या उद्देशाने योजलेली युक्ती बनला आहे. हजारो लोक एका ठिकाणी बसतात आणि आसने करत असतात. गुरू पाशा या गोष्टीमुळे नाराज आहेत. म्हणून तर ते, योगाच्या माध्यामातून गुरू-शिष्य परंपरा शिकण्याची गरज आहे असे म्हणत असतात. ‘त्याने असे करावे, तसे करावे’ असे कुणी कुणाला सांगू शकत नाही असे ते कुण्या गुरूचे नाव न घेताच सांगतात. कोणत्या व्यक्तीला काय अडचणी आहेत हे तुम्ही कसे सांगू शकता ? मेडिकल योग हा प्रकार आपण आपल्या मित्रांसोबत करत असल्याचे गुरू पाशा सांगतात. हे काम अतिशय गंभीरपणे केले जात असल्याचेही ते सांगतात. जर एखाद्याला पाठीचे दुखणे असेल तर ती व्यक्ती चक्रासन कसे काय करू शकते? त्यावेळी तर कण्यावर प्रभाव पाडू शकणार नाहीत अशीच आसने तुम्हाला करावी लागतील.

image


image


ज्यांना योग शिकण्याची इच्छा आहे त्यांनी अनवाणी पायांनी आणि सूती कपड्यांमध्ये आले पाहिजे. जे लोक केवळ लहर आली म्हणून योग करतात आणि जे लोक हजारो रूपये कपडे आणि चटई खरेदीवर उडवतात अशा लोकांपासून गंभीरपणे योग शिकणा-या लोकांनी दूर राहिले पाहिजे. गुरू पाशा मुसलमान असल्यामुळे स्वत:ला ते राष्ट्रीय एकतेच्या प्रतिकाच्या रूपात पाहत असल्याचेही सांगतात. त्यांना वाटते की काब्याला लाखो फे-या मारणे, वैदिक मंत्र उच्चारणे, ईसाई भजन म्हणणे आणि आध्यात्मिक प्रवचन या गोष्टींचा एकच अर्थ आहे – मन, शरीर आणि आत्म्याची एकाग्रता. प्रत्येकानेच योग केला पाहिजे असे गुरू पाशा यांना वाटते.