पर्यायी योजनेची कधी गरजच लागली नाही, फ्रेशडेस्कची पाच वर्षांची यशस्वी वाटचाल

0

फ्रेश डेस्क च्या संस्थापक सदस्यांनी जेव्हा २०१० मध्ये उत्पादनांचा आराखडा तयार करायला घेतला तेव्हा ते दुसऱ्या पर्यायासह सज्ज होते. जर ९ महिन्यात ते उत्पादन तयार करू शकले नाहीत आणि त्या पुढील ९ महिन्यात त्यांना त्यातून २० हजार अमेरिकी डॉलर इतकं उत्पन्न मिळालं नाही तर एक संस्थापक सदस्य आणि झोहो कॉर्पचे माजी उपाध्यक्ष गिरीश मथ्रुबोथम हे सरळ दुसरीकडे नोकरी बघणार होते आणि इतर सद्स्यानाही बरोबर घेऊन जाणार होते.

पण हा दुसरा पर्याय कधीच धूळ खात पडला होता. फ्रेशडेस्क झाल्यापासून पाच वर्षातच तो भारतीय उद्योगांच्या सॉफ्टवेअरचा चेहरा बनला होता. त्याची सुरवातीची किंमत ५०० मिलियन अमेरिकी डॉलर इतकी होती. गुगल भांडवलदार मार्क़ु इन्वेस्टर्स, टाईगर ग्लोबल आणि एसेल पार्टनर्स यांनी ९४ मिलियन अमेरिकी डॉलर गुंतवले. महत्वाचं म्हणजे कंपनीचे आता १४५ देशात ५० हजारांहून अधिक ग्राहक आहेत.

फ्रेशडेस्कच्या गिरीशने जेव्हा हॅकर न्यूज वर जगभरात सेवा देणारी झेन्डेस्क कॅस्टमर सपोर्ट कंपनीने आपले सेवा दर वाढवले आहेत अशी बातमी वाचली आणि त्यावर एका वाचकाने प्रतिक्रिया दिली होती की, या क्षेत्रात व्यवसायाला संधी आहे. हे वाचल्यावर गिरीशला नवीन व्यवसाय करण्याचा साक्षात्कार झाला. त्याने झोहो कॉर्प मधील त्याचा सहकारी शान कृष्णास्वामी याच्या मदतीने ऑक्टोबर २०१० मध्ये व्यवसायाचा आराखडा तयार केला. त्यानंतर आठ महिन्यांनी त्याचं उत्पादन तयार झालं. त्यांनी असं एक सोफ्ट्वेअर तयार केलं ज्यामुळे दूरध्वनी, इमेल, सोशल मिडिया वरील निरोप याचं रुपांतर एखाद्या पत्रात होईल. ज्याची दखल कस्टमर केअरचे कर्मचारी घेणार.

जून २०११ हा कंपनीसाठी फार महत्वाचा महिना ठरला. फ्रेशडेस्कला पहिला ग्राहक मिळाला तो म्हणजे ऑस्ट्रेलियातील अट्वेल महाविद्यालय. गिरीश आणि त्याच्या सहकाऱ्यांना माहित होतं की, ऑनलाईन सपोर्ट देण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी जगभरातील ग्राहक मिळणं गरजेचं आहे. त्याच वर्षी फ्रेशडेस्क ने माइक्रोसाॅफ्ट बीजस्पार्क चायलेंज जिंकलं. त्याच वर्षी युवर स्टोरी ने त्यांची दाखल घेतली आणि दरवर्षी टेक ३० मध्ये त्यांची निवड होत गेली. लवकरच कंपनीला १०० ग्राहक मिळाले आणि मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही.

फ्रेशडेस्कच्या पाचव्या वर्धापन दिनाला गिरीश सांगतो कंपनीच काम चांगल्या वातावरणात सुरु राहणं हेच खूप महत्वाचं आहे. "कामाचा दर्जा राखणं आणि जोडीने कामाचं वातावरण चांगलं असणं याचा कंपनीच्या यशात मोठा वाटा असतो. मला सांगायला अभिमान वाटतो की, आम्ही ही कंपनी सुरु केली आणि त्या कंपनीच्या कामाची एक वेगळी शैली आहे. आम्ही आमच्या कामाच्याप्रती एकनिष्ठ आहोत आणि सगळे उत्तम पद्धतीने काम करत आहोत," असं गिरीश सांगतात.

फ्रेशडेस्क चे ५०० कर्मचारी आहेत आणि चेन्नईमध्ये ६० हजार चौरस फुटांच प्रशस्त मुख्य कार्यालय आहे. गिरीशला असं वाटतं की, कोणाला कोणतंही काम देण्यापेक्षा ज्याला जे काम चांगलं येतं तेच काम त्या व्यक्तीला द्यायचं यामुळे कामाची गुणवत्ता राखली जाते. कंपनीच्या शाखा आता सनफ्रान्सिस्को, लंडन आणि सिडनीमध्ये सुरु झाल्या आहेत.

सेवा आणि उत्पादन हे फ्रेशडेस्क चा आत्मा आहे. युवर स्टोरीच्या मोबाईल स्पार्क २०१५ ला गिरीश ने दृकश्राव्य मुलाखतीत सांगितलं की, एखाद्या उपहारगृहाच्या यशामध्ये पदार्थांच्या दर्जाचा मोठा वाटा असतो त्याप्रमाणे फ्रेशडेस्क च्या कामाचा दर्जा हेच त्याच्या यशाचं मुख्य कारण आहे.


कंपनीने फ्रेश सर्विस ही नवीन सेवा सुरु केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अंतर्गत सेवा, मोबाईल संदर्भातील सेवा, मोबाईल एप बाबतच्या सेवा या माध्यमातून दिल्या जातात. याचे दोन फायदे झाले. एकाच वेळी व्हीडीओ चाट आणि ब्राउझिंग करणं शक्य झालं. वन क्लिक मुळे ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवणं अधिक सोपं झालं. गेल्या महिन्यात फ्लीर्प ने ही त्याला मान्यता दिली.

भविष्यातील योजनांबाबत गिरीश सांगतो की, " आम्ही ज्या ठिकाणाहून सुरवात केली त्याच्या बरंच पुढे आम्ही आलो आहोत, आता आम्ही अशा टप्प्यावर आहोत जिथून प्रगतीचे अनेक मार्ग पुढे जातात. आम्हाला आमच्या कामात अजून सुसूत्रता आणून आमची भारतीय कंपनी जगभर पोहोचवायची आहे."


लेखक : राधिका पी नायर

अनुवाद : श्रद्धा वार्डे