"भूक मिटाओ" मोहिमेमुळे टळली १८०० मुलांची उपासमार

0

आपण बाहेर फिरायला जातो, खातो पितो, धम्माल करतो, पण आपली नजर कधी अश्या मुलांवर गेली का जे झोपडपट्टी भागात राहतात. ज्यांचे सगळे आयुष्य आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्ची पडते. जीवनातल्या या विवंचनेत दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणा-या गरीब व लाचार लोकांच्या उद्विग्नतेला जवळून बघितले आहे ते गुजरात वडोदराच्या दर्शन चंदन यांनी.


वडोदरा मधून पदवीधर झालेले दर्शन चंदन हे कच्छ भागातील रहिवासी असून एका व्यावसायिक कुटुंबाशी संबंधित आहे. शिपिंग कंपनीमध्ये सेल्स प्रोफेशनलच्या रूपाने कार्य करणारे दर्शन यांनी युवर स्टोरीला सांगितले, " एक दिवस मी आपल्या कुटूंबासोबत बडोद्याच्या एका मोठ्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. पण जेवणाची चव आवडली नसल्याची तक्रार मी मेलद्वारे रेस्टॉरंटला केली. त्यांनी आपली चूक कबुल करून मला परत मोफत खाण्याचे आमंत्रण दिले पण मी त्यांना नकार कळवून ते जेवण गरीब मुलांमध्ये वाटून देण्यास सांगितले’’.


रेस्टॉरंटवाल्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन काही गरीब मुलांना एकत्र करून त्यांना मोफत जेवण वाटले व त्याचे फोटो मला पाठविले.

दर्शन सांगतात की, "मी जेव्हा ते फोटो बघितले तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघुन मी सांगू शकत नाही मला किती आनंद झाला. त्याच क्षणी मी विचार केला की आपल्याला या मुलांसाठी काहीतरी करायचे आहे’’.


या नंतर दर्शन यांनी जून २०१५ मध्ये ‘’भूक मिटाओ’’ मोहिमेची सुरवात आपल्या ५-७ मित्रांच्या मदतीने सुरु केली. पहिल्या दिवशी त्यांनी जवळजवळ ४० मुलांना जेवण दिले. हळूहळू त्यांच्या या मोहिमेला अनेक लोकांची साथ मिळाली व आज वडोदरामध्ये ५०० पेक्षा जास्त लोकांचा या कामात सहभाग आहे. दर्शन आणि त्यांचे मित्र वडोदरा शहराच्या १० स्लम भागात दर रविवारी या मुलांना जेवण देतात, त्याच बरोबर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या मुलांबरोबर राहतात,खेळतात व त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. वडोदरामध्ये मिळालेल्या आपल्या कामाच्या यशाने त्यांनी आपल्या या कामाचा विस्तार वाढवला आहे. ही मोहीम आज गुजरातच्या आदिपूर, गांधीधाम, कोसंब, नारीयदा व महाराष्ट्रात मुबई पर्यंत पसरली आहे.


दर्शन यांची इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांच्या सहयोगाने आठवड्यातील ७ ही दिवस या मुलांना अन्न मिळू शकेल, कारण आपल्या देशात असे असंख्य मुल आहे जे उपासमारीने त्रस्त आहे. दर्शन यांनी युवर स्टोरीला सांगितले की, "आम्ही मुलांना सकस अन्न देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होईल. मुलांच्या जेवणात आम्ही पोळी,भाजी, भात,केळी व बिस्कीट देतो. हे जेवण आम्ही आपल्या घरूनच करून आणतो. काही जण मिळून पोळ्या व भाजी करतात तसेच या कामासाठी दर्शन कुणाकडूनही नगद पैसे किंवा चेक घेत नाही. त्या बदल्यात हे लोकांकडून दान म्हणून जेवण बनविण्याची सामग्री घेतात. आज दर्शन आणि त्यांच्या साथीदारांच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणजे," भूक मिटाओ" मोहिमेमुळे १८०० मुलांची उपासमार टळली आहे.


दर्शन सांगतात की या मोहिमेचा एक उद्देश म्हणजे लोकांना समाजाप्रती जागरूक करून आपल्या देशातील गरिबीला संपविण्याचा आहे. ते सांगतात की, "आमचा उद्देश फक्त मुलांना जेवण देण्याचा नाही तर त्यांना शिकून आत्मनिर्भर बनवून आपल्या हिंमतीच्या जोरावर कोणतेही काम करून आपल्या पायांवर उभे करण्याचा आहे. दर्शन व त्यांची टीम मुलांना साफसफाई तसेच लोकांशी वागण्याची रीतही शिकवतात.

दर्शन आणि त्यांच्या मित्रांनी वडोदराच्या एका स्वयंसेवी संस्था ‘’महावीर ‘’इंटरनॅशनल’’ शी एक करार केला आहे, जे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. रविवारी वडोदराच्या ज्या १० जागांवर हे लोक जेवण देतात त्याच जागेवर ही संस्था सोमवार ते शनिवार या मुलांना शिकविण्याचे काम करते.


भविष्यातील योजनेच्या संदर्भात दर्शन सांगतात की आमचे लक्ष्य या वर्षी जवळजवळ १५० मुलांना सरकारी व खाजगी शाळेत प्रवेश देण्याचा आहे. या मुलांची निवड आम्ही ज्यांना अन्नदान करतो त्याच मुलांमधून करतो. मुलांच्या अभ्यासाचा खर्च लोकांकडून मिळणाऱ्या पैशानेच केला जातो.

याशिवाय दुसऱ्या राज्यात या मोहिमेच्या विस्तारासाठी ते प्रयत्नशील आहे. तसेच ते लोकांना निवेदन करतात की ते ज्या कोणत्या राज्यात व शहरात असतील तेथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गरीब मुलांची उपासमार टाळण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्या देशाला जर ‘हंगर फ्री’’ बनवायचे असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या तरुण पिढीने सक्रीय होऊन पुढाकार घेतला पाहिजे. कारण युवा शक्ती ही आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे. जर इथल्या तरुणांनी ठरविले तर एक दिवस आपण भारताला उपासमारीतून नक्कीच मुक्त करू शकू.  

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

भुकेल्या पोटासाठी रोटी बँक...

अन्नदाते आणि रूग्णांचे ‘मसिहॉं’ हरखचंद सावला!

छतीसगढच्या ६५ वर्षीय विश्वनाथ पाणीग्रहींनी गावागावात राबविली स्वच्छता ग्राम अभियान मोहीम


लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे