जग जिंकून आलेल्या पहिल्या वहिल्या भारतीय महिला ‘भारुलता कांबळें’चे स्वागत!

महिला सक्षमीकरणाच्या संदेशासाठी केली धाडसी सफर!!

0

भारुलता कांबळे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिश: नवी दिल्लीत स्वागत केले जेंव्हा त्या जगपरिक्रमा करुन येथे पोहोचल्या त्यांच्या या जगपरिभ्रमणाच्या मोहिमेत या धाडसी महिलेने स्वत: वाहन चालवित आर्टीक वर्तुळ पूर्ण केले त्यात ३२ देश ३२ हजार किलोमिटरचे अंतर पार केले. ९ पर्वतरांगा, ३ महत्वाची वाळवंटे, आणि ९ टाइम झोनमधून त्या गेल्या.

युअर स्टोरीने मागील वर्षी भारुलता यांच्या या मोहिमेला याच संकेतस्थळावरून व्यापक प्रसिध्दी दिली होती. ४३ वर्षाच्या भारुलता यांचा जन्म गुजरात मधील नवसारी येथे झाला. त्या वकील आहेत आणि ब्रिटिश सरकारच्या माजी कर्मचारी आहेत. त्यांचा विवाह पेशाने सर्जन (युरोलॉजिस्ट) असलेल्या महाराष्ट्रीयन व्यक्ती सोबत झाला आहे. त्यांना ११ आणि ९ वर्षांची दोन मुले आहेत.

१३ सप्टे २०१६ रोजी भारुलता यांनी युनायटेड किंगडमच्या आर्टिक वर्तुळातून त्यांच्या सोलो कार ने प्रवास सुरू केला आणि भारताच्या दिशेने निघाल्या, त्यांनी पहिला विक्रम केला २८ सप्टे २०१६ रोजी तो म्हणजे प्रथमच एका महिलेने संपूर्णत: सोलो कारने आर्टिक मंडळाची परिक्रमा करण्याचा. हा प्रवास करताना त्यांना मदत करणारा कोणताही चमू सोबत नव्हता हे विशेष! २७९३ किलोमिटरच्या या प्रवासात त्यांनी स्वत: कार चालविली आणी आर्टीक मंडळात सर्वात जास्त अंतर चालविणा-या पहिल्या महिला म्हणून मान मिळवला. त्या नंतर त्या भारतात पोहोचल्या आणि त्यांनी तीन खंडाचा प्रवास करून आलेल्या आणि त्यातही आर्टिक मंडळातून एकटीने वाहन चालविलेल्या जगातील पहिली  महिला असल्याचा विक्रम जाहीर केला. या प्रवासात त्यांनी ३२ हजार किलोमिटर अंतर, ३२ देशातून पादाक्रांत केले केवळ ५७ दिवसांत खूप जास्त देशात भटकंती करणारी पहिली  महिला म्हणूनही त्यांच्या नावे विक्रम प्रस्थापित झाला आहे. भारतात त्यांनी मणीपूरच्या मोरेह चेक पोस्ट येथून ८ नोव्हे.२०१६ रोजी प्रवेश केला, त्यावेळी त्यांच्या ३२ हजार किलोमिटरच्या या परिक्रमाची सांगता झाली.

त्यांच्या या प्रवासातील ५५०० किमी प्रवास डोंगराळ भागातून होता, त्यात ९ पर्वतरांगा होत्या ज्यांची उंची समुद्रसपाटी पासून ३७०० ते ४००० फूट इतकी होती. वाळवंटातील त्यांचा प्रवास २५०० किमी होता. त्याची नोंद जागतिक विक्रम नोंदविणा-या संस्थानी घेतली आहे. दर रोज त्या सरासरी ७०० किमी अंतर कारने पार करत जात होत्या. तर डोंगराळ भागात हाच वेग ४००किमी दररोज असा कमी झाला होता. काहीवेळा एका दिवशी त्यांनी १५०० किमी इतके सर्वाधिक कार चालविण्याचे विक्रमही केले तर त्यात २० ते २२ तास त्या कार चालवित होत्या. पाटणा ते दिल्ली हे ११०० किमी अंतर त्यांनी कुठेही न थांबता एका दिवसांत पार केले.

या सा-या प्रवासांत त्यांनी काय संदेश दिला त्यांचा संदेश होता ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ आणि त्यातून महिला सक्षमीकरण होवू द्या. त्याच्या या सा-या प्रवासात त्यांना ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कँमेरुन यांचा पाठिंबा मिळाला, शिवाय वरिष्ठाच्या सभागृहातील (हाऊसऑफ लॉर्डस् )मधूनही अनेकांचे समर्थन  त्यांना होते. कनिष्ठ सभागृह (हाऊस ऑफ कॉमन्स)मधूनही त्यांचे हितचिंतक होते. ब्रिटन मधील अनेक आशियाई संस्था संघटना, सामान्य नागरीक आणि हितचिंतक यांनी त्यांना मदत आणि मार्गदर्शन केले.

नवी दिल्लीत त्यांचा प्रवेश झाला त्यावेळी त्यांना अक्षरधाम मंदीर परिसरात विशेष व्यक्तीचा दर्जा देण्यात आला आणि जंगी स्वागत झाले. त्यावेळी महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या अधिकारी वर्गाने भारुलता यांच्या असामान्य कामगिरीची आवर्जून दखल घेतली.