अनेक फिल्मी ताऱ्यांचे सौंदर्य  खुलवणाऱ्या शुभा धर्माना

ग्लॅमरची दुनिया सोडून डॉक्टर झाल्या. . . लोकांच्या सौंदर्यासाठी काम करता करता झाल्या उद्यमी. . . .देशासाठी इंग्लंडमधून भारतात आल्या पण मिळाला धोका. . . पण स्वत:ला सांभाळून सौंदर्यांच्या क्षेत्रात केली वाटचाल. . . अनेक सेलिब्रिटीजना दिली सेवा. . .त्यांच्या रंग रुपात केला कायापालट. . .देशाच्या प्रसिध्द सौंदर्य विशेषज्ञांच्याकडून शिकल्या तंत्र आणि केले यशस्वी प्रयोग, हैद्राबाद, बंगळूरूमध्ये स्थापन केले स्वत:चे क्लिनीक.

0

अकरा वर्ष युरोपात डॉक्टरी करणा-या शुभा धर्माना जेंव्हा मायदेशी आल्या तेंव्हा त्यांच्याशी विश्वासघात झाला. एका मोठ्या आसामीने त्यांना वचन दिले होते की, भारतात डर्मेटोलॉजी बाबत क्लिनीकची शृंखला तयार केली जाईल आणि त्यांना प्रमुख म्हणून जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे मायदेशात मिळणा-या या सन्मानाच्या ओढीने त्या परतल्या आपली कारकिर्द सोडून. मोठी स्वप्न घेऊन त्या आल्या मात्र त्यांना इथे काहीच मिळाले नाही. आयकरांच्या काही समस्यामुळे हा व्यवसायच सुरू होऊ शकत नाही असे त्यांना वचन देणा-या बड्या आसामीने सांगितले. त्यांच्या या विश्वासघातकी बोलण्याने शुभा हादरल्याच, आयुष्यात त्या पहिल्यांदाच फसल्या होत्या काय करावे समजेनासे झाले होते.

युरोपात डॉक्टरीत चांगले नाव मिळवले होते. केस आणि त्वचा यांच्या समस्यांवर इलाज करण्यासाठी दूरवरून लोक त्यांच्याकडेच येत होते.लोकांच्या सौंदर्याची काळजी घेताना त्यांच्या जीवनात सारेकाही सुरळीत होते. नाव, प्रसिद्धी, पैसा सारे मिळत होते. आपल्या देशात या सा-या सेवा देता येतील या विचाराने त्या या नव्या संधीसाठी तयार झाल्या आणि सुखाचे जीवन सोडून परतल्या होत्या. पण इथे विश्वासघात झाला होता. परतण्याचे सारे रस्ते बंद होते कारण तेथे त्या सारे काही सोडून आल्या होत्या.

मायदेशी आल्यावर त्यांना खूपच अडचणी आल्या. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना हैद्राबाद येथे एका रुग्णालयात नोकरी देखील करावी लागली. फारच कमी पगारात त्या काम करत होत्या पण नंतर त्यांच्या सेवांचा दर्जा पाहून त्यांचा दर्जा वाढत गेला आणि एक दिवस आला ज्या साठी या देशात परत आल्या होत्या. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी डर्मेटोलॉजी क्लिनिक्सच्या शृंखला तयार केली. आता त्या यशस्वी उद्यमी बनल्या आहेत. डॉ शुभा धर्माना यांची कहानी खूपच रोमांचित करणारी आहे. ज्यांनी ग्लँमरच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि चिकित्सेच्या दुनियेत येऊन लोकांना सुंदर करण्याच्या कलेत प्राविण्य मिळवले. केश आणि त्वचा यांच्या सौंदर्यासाठी तज्ञ समजल्या जाणा-या लोकांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाले. सौंदर्य विशेषज्ञ, डर्मोटॉलॉजिस्ट, हेअर ट्रान्सप्लांट सर्जन, आणि लेजर तज्ञ म्हणून त्यांना खूप लौकीक आणि सन्मान मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘लीज्वेन ग्रुप ऑफ मेडस्पास’च्या शाखा बंगळूरू आणि हैद्राबाद मध्ये अनेकांना आकर्षित करत आहेत.

शुभा धर्माना यांच्या जीवनात अनेक रोचक पैलू आहेत. बालपणापासून त्यांना मॉडेल व्हायची ओढ होती, माहविद्यालयीन दिवसात त्या सिनेमात कलाकार व्हावे आणि मोठे कलावंत व्हावे अशी स्वप्न पहात होत्या. आई-वडिल शिक्षित होते त्यामुळे त्यांनी सिनेमा आणि मॉडलिंग ही क्षेत्र वेळखाऊ आहेत असे मानले. त्यामुळे त्यांनी शुभा यांना डॉक्टर होण्याचा सल्ला दिला. वडील आंध्र विद्यापीठात राजकीय विज्ञान आणि जनव्यवस्थापन या विभागात प्रमुख होते. त्यांचा मोठा लौकीक होता. विदेशात ख्याती होती. आई पुरात त्व विषयात तज्ञ होत्या. त्या ग्रंथपाल म्हनून काम करत होत्या.त्यांना संगिताची आवड होती आणि आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम होत असत. त्याच वेळी त्यांनी एक ब्युटीपार्लर सुरू केले होते. अशा वातावरणात शुभा यांचे बालपण एखाद्या मुलासारखेच गेले. सा-या स्पर्धात भाग घेणे एन सी सी सांस्कृतिक कार्यक्रम मंचावरील उपस्थिती यात त्या अग्रभागी होत्या. त्यामुळे त्या विशाखापट्टणम येथे विद्यार्थ्यांच्या नेत्या बनल्या होत्या. त्या काळात त्या चांगल्या वक्त्या मानल्या जात होत्या. विशाखा पट्टणम येथील एवीएन महाविद्यालयात त्या पोहोचल्या तेंव्हा सुंदर शरीर सौष्ठवामुळे सर्व परिचित झाल्या. ग्लँमरच्या दुनियेत त्यांनी रँम्प वॉक, मॉडलिंग, फँशन शोज सारे काही केले. त्या काळात त्यांनी सिनेमात अभिनेत्री म्हणूनही काम केले. आता त्या ग्लँमरच्या दुनियेच्या उंबरठ्यावरच होत्या पण त्यांना वडीलांचा सल्ला मानावा लागला आणि त्या मागे फिरल्या. शुभा यांना मिस वैजाक, मिस स्टिल सिटी, मिस आंध्र सारखे अनेक खिताब मिळाले आहेत. त्या फेमिना मिस इंडिया आणि ग्लाडरैग्स च्या अंतिम फेरीतही पोहोचल्या होत्या. पण आई वडीलांना मग हे सारे मान्य नव्हते. त्यांचे वडील मानत होते की, यात भविष्य नाही. मॉडलिंगमध्ये करिअर फार काळासाठी करता येणार नाही.

शुभा सांगतात की, “ माझे मन तसे अभ्यासात नव्हतेच. मला डॉक्टर व्हायचेच नव्हते, माझे प्राधान्य ग्लँमरच झाले होते. पण घरातून सांगण्यात आले की, अभ्यासात लक्ष दे. मी नेहमी पहिल्या किंवा दुस-या वर्गात उत्तिर्ण झाले. तिस-या वर्गात येणे घरच्यांना मान्यच नव्हते. शिकण्यात मन नव्हते तरी मी त्यात दुर्लक्ष केले नाही कारण आई वडीलांना निराश करायचे नव्हते”.

शुभा यांना ग्लॅमरच्या दुनियेतून जायचे नव्हते. या संघर्षांच्या जीवनातून त्या विचारपूर्वक बाहेर पडल्या. त्यांनी आईवडिलांसमोर अट ठेवली. त्या म्हणाल्या की, “डॉक्टर झाल्यावर मला या साठी सूट मिळाली पाहिजे की मी ग्लॅमरशी संबंधित गोष्टीत भाग घेऊ शकेन”. घरच्यांना ही अट मान्य होती. पण एमबीबीएसचा अभ्यास इतका कठीण होता की, मला ग्लँमरच्या दुनियेला सोडावेच लागले. “स्थिती अशी होती की मी दुर्लक्ष केले असते तर नापास झाले असते. त्यामुळे मला रँम्पच्या दुनियेला सोडावेच लागले. त्यामुले फेमिना मिस इंडियाच्या फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न सोडून मला माझ्या अभ्यासात लक्ष द्यावे लागले.”

शुभा म्हणाल्या की, “ त्याच काळात माझी भेट प्रसिध्द व्यक्ती कौशल घोष यांच्याशी झाली. ते म्हणाले की माझ्यात खूप टँलेन्ट आहे.पण त्यासाठी मी खूप विचार केला पाहिजे. वैजाक सारख्या छोट्या जागेतून बाहेर पडले पाहिजे. त्यामुळे माझे सौंदर्य आणि क्षमता दोन्ही दबल्या जात आहेत.”

त्यामुळे शुभा यांनी एमबीबीएस झाल्यावर युकेच्या दिशेने प्रयाण केले. तेथे मेडिकल प्रँक्टिशनर म्हणून साध्या गोष्टी सुध्दा हाताळल्या. तातडीच्या सेवाही दिल्या. अनेक इस्पितळात काम करताना त्यांनी स्वत:ची डॉक्टर अशी ओळख मिळवली. इंग्लंडमध्ये त्या खूप  काही शिकल्या. आगीत भाजल्यानंतर रुग्णांचे काय हाल होतात ते त्यांनी पाहिले. त्यांचे भाजलेले चेहरे पाहून कुणीही निराश होईल असेच ते होते. त्वचेच्या आजारांनी ते हैराण होत असत. त्यावेऴी त्यांना आपल्या आईच्या ब्युटीपार्लरची आठवण आली. त्यांना आठवले की लोकांना सुंदर बनवून त्यांची आई कशी त्यांना आंनद देत होती. शुभा यांना जाणवले की त्वचा आणि केस नीट नाहीत म्हणून किती लोक दु:खी असतात. अश्या लोकांना सामान्य माणसांच्या जीवनातील आनंद द्यावा यासाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि मग त्या डॉक्टरीतून डर्मेटॉलॉजी कडे वळल्या. त्यानी लेजरचे शिक्षण घेतले. आणि युरोपात काम करता करता लुटोन मध्ये दी अल्टिमेट ब्युटी वेस्ट लंडन मध्ये कॉस्मेटिक नावाच्या दोन क्लिनिकची स्थापना केली. त्यानी नँशनल स्लिमींग ऍन्ड कॉस्मेटिक क्लिनीक मध्येही काम केले. डर्मेटोलॉजीमध्ये पदवीत्तर पदविका त्यांना खूपच फायद्याची ठरली. त्याकाळातील विख्यात हेअर ट्रान्सप्लांट सर्जन मारवान सैफी यांच्या सोबत काम करताना त्यानी आधुनिक तंत्रही अवगत केले. शुभा यांनी त्वचा आणि केशउपचार या क्षेत्रात मेहनतीने अनुभव आणि ज्ञान मिळवले. नाव कमावले ओळख मिळवली. आपल्या या नव्या रुपाबद्दल त्या म्हणतात की, “ ज्यांना त्वचा किंवा केस यांच्या समस्या होत्या त्यांच्या मानसिक स्थितीत देखील स्थिती खराब होती. ते तणावाची शिकार होते. लोकांना भेटणे बोलणे बंद करत होते.अशा लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठीच मी इंग्लंड मध्ये डर्मेटोलॉजीचे शिक्षण घेतले.”

सौंदर्याच्या दुनियेत आल्यावर शुभा यांच्या जीवनात परिवर्तन आले. लोकांना सौंदर्याची सेवा देणा-या अनेक संस्था सोबत त्यानी काम केले. त्यात त्यांनी नवनवीन प्रयोग कले आणि ते यशस्वी झाले. ज्यात केवळ सौंदर्यच नाहीतर लोकांच्या वाढत्या वयाचा प्रभाव देखील कमी करता आला.

इंग्लंडमध्ये सारे काही व्यवस्थित होते. आता देशात परत येऊन आपल्या कला आणि सेवा येथे लोकांना द्याव्या असा त्या विचार करत होत्या. त्यातच त्यांना एका नामचिन व्यक्तीकडून विश्वासघात सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी हैद्राबाद मध्ये एका छोट्या रुग्णालयात नोकरी केली. वाईट काळ होता. येथील पगार इंग्लंडच्या तुलनेत काहीच नव्हता. मग अनेक इस्पितळात कामे केली. त्यातून त्यांना समाधान मिळेना. येथे सारे काम जुन्या पध्दतीने चालायचे. लोकांना आधुनिक पध्दती माहितीच नव्हत्या. वापरली जाणारी औषधे संशयास्पद होती. ही परिस्थिती पाहून त्यांनी विचार केला की स्वत:चे क्लिनीक सुरु केले पाहिजे. मग २०१३मध्ये माधापूर येथे त्यांनी पहिले क्लिनीक सुरू केले. डॉ शुभा स्किन ऍण्ड लेजर क्लिनीक या नावाने सुरु केले आणि नंतर त्याला लिज्वेन ग्रुप ऑफ मेडस्पास मध्ये विकसित केले. विश्वासघाताच्या त्या घटनेनंतर शुभा यांना काही वेळ नक्कीच लागला. पण त्यांनी जे काही मिळवले, जे काही लोकांना दिले, ज्या प्रकारे लोकांच्या सौंदर्याच्या स्वप्नांना आकार दिला ती सारी मेहनत, जिद्द आणि सौंदर्य़ांची अनोखी कहाणी आहे. आपल्या या यशाबद्दल डॉ शुभा म्हणतात, “ भारतात परतल्यांनतर माझा पहिला अनुभव खूपच वाईट होता. पण नंतर भारतातून मला जो काही अनुभव आला तो खूप अविस्मरणीयच होता. अनेक चांगले मित्र मिळाले. खूप आनंद मिळाला. मला लोकांचे सौंदर्य खुलविण्याच्या कामावर प्रेम जडले.”

आज अनेक फिल्मी तारे शुभा यांच्याकडून आपले सौंदर्य खुलवितात. वाढते वय त्याचा प्रभाव तुमच्या त्वचा आणि केसांवर करते. मात्र शुभा यांच्या अनुभव आणि कौशल्य यांची मदत त्यावेळी होते. अश्याप्रकारच्या सेवा अनेक सेलिब्रिटिजना त्यांनी दिल्या आहेत. त्यांनी आपल्या या उद्यमाच्या अनेक शाखा सुरू केल्या आहेत. भारतात आल्यावर त्यांनी अनेक वर्तमान पत्रांसाठी स्तंभ लेखन केले आहे. त्या दरम्यान त्यांची ओळख त्यांच्या जीवनसाथी सोबत झाली आणि पतीचे कार्य जेंव्हा बंगळूरूमध्ये सुरू झाले तेंव्हा शुभा देखील बंगळुरू मध्ये स्थलांतरीत झाल्या. तेथेही त्यांनी कार्य विस्तार केला. याच दरम्यान त्यांच्या सामाजिक कक्षा देखील रुंदावल्या. आता त्या हैद्राबाद आणि बंगऴूरू येथे प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. त्यांनी पँशनेट फांउंडेशन नावाने एक स्वयंसेवी संस्था सुरु करून टिच फॉर चेंज नावाच्या कार्यक्रमाशी स्वत:ला जोडले आहे. त्यांना त्यांच्या सामाजिक सेवेसाठी वुमेन ऑफ दि इयर आणि बेस्ट वुमेन डर्मिटोलॉजिस्ट या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

शुभा सांगतात की, “ भारतात आताही सौंदर्य उजळण्यासाठी अनेक प्रकारच्या मिथ्या गोष्टी प्रचारात आहेत. जेंव्हा मला हैद्राबाद मध्ये स्वत:चे क्लिनीक सुरू करण्याची संधी मिळाली तेंव्हा मी पाहिले की, या मिथ्या गोष्टी दूर करण्यासाठी योग्य माहिती देण्यसाठी बरेच काही करता येऊ शकते. जरी मी माझी कारकिर्द मॉडलिंगच्या स्वरुपात सुरू केली तरी नंतर समजले की, कँमेराच्या मागे सारे काही तसे चांगले नाही जसे मला हवे आहे. मला असे काम करायच होते की, ज्यात नाविन्य असेल ज्यातून लोकांच्या जीवनात बदल होतील आणि आज मी तेच करते आहे.

शुभा यांनी ग्लँमरच्या दुनियेला सोडून लोकांना ग्लँमरस बनविण्याच्या उद्देशाच्या पूर्तीसाठी त्यांनी लक्ष्य निश्चित केले. त्यात त्या केवळ सफल उद्यमी नाहीतर चांगली पत्नी आणि आई म्हणूनही यशस्वी झाल्या. त्यांचे लक्ष्य आहे की त्या त्वचा आणि केश यांच्या उपचार पध्दतीमध्ये भारतात आधुनिक आणि प्रभावी तंत्रांचा लोकांना उपयोग करून देतील.

शुभा यांचे म्हणणे आहे की, भारतीय समाजाने त्यांना खूप काही दिले आहे. त्यांना या देशातही सन्मान, प्रेम मिळाले. या देशातही त्यांनी खूप पैसा मिळवला आणि मिळवत आहेत. त्या म्हणतात की,  मी आता समाजाला खूप काही देऊ इच्छिते. आता मला देण्याची वेळ आली आहे. मी टिच फॉर चेंजशी जोडल्याने खूप खुश आहे. मला आणखीसुध्दा काही प्रकारे समाजाची सेवा करायची आहे. “टिच फॉर चेंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून काही युवा समाजसेवक शाळांमध्ये शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवींच्या मदतीने सरकारी शाळांमधुन मुलांना शक्य ती सारी मदत केली जात आहे. कार्यक्रमांचा उद्देश हाच आहे की, विद्यार्थी आधुनिक सुविधा नसल्याने शैक्षणिक सोयीपासून दूर राहू नयेत. शुभा याच कार्यक्रमादरम्यान बंगलोर चँप्टरच्या सदिच्छा दूत बनल्या आहेत.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

भारतीय कलासंस्कृतीचा प्रसार परदेशात करण्याचा वसा घेतलेल्या कल्पना नारकर, गल्लीतून सुरु झालेला प्रवास पोचला सातासमुद्रापार

आई होऊ पाहणाऱ्या उद्योजिकांमध्ये स्वतःच्या उदाहरणाने आत्मविश्वास जागवणाऱ्या सुमी गंभीर

आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

Dr Arvind Yadav is Managing Editor (Indian Languages) in YourStory. He is a prolific writer and television editor. He is an avid traveler and also a crusader for freedom of press. In last 19 years he has travelled across India and covered important political and social activities. From 1999 to 2014 he has covered all assembly and Parliamentary elections in South India. Apart from double Masters Degree he did his doctorate in Modern Hindi criticism. He is also armed with PG Diploma in Media Laws and Psychological Counseling . Dr Yadav has work experience from AajTak/Headlines Today, IBN 7 to TV9 news network. He was instrumental in establishing India’s first end to end HD news channel – Sakshi TV.

Related Stories

Stories by ARVIND YADAV