साईबाबांच्या समाधीवर वहिले जाणारे गुलाबपुष्प, हारांपासून तयार होणार 'साईरोझ' अगरबत्ती

0

शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधीवर वाहिले जाणाऱ्या गुलाबपुष्प व हारांपासून साईरोझ अगरबत्तीची निर्मिती करण्याचा निर्णय संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

या बैठकीस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, ॲड. मोहन जयकर, नगराध्यक्षा योगिता शेळके व कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होते. डॉ. हावरे म्हणाले, ‘शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने साईभक्त येतात. ते बाबांना मोठ्या प्रमाणात गुलाबपुष्प व हार अर्पण करतात. मंदिरात सुमारे एक टन गुलाबपुष्प व हार जमा होतात. या गुलाबपुष्प व हारांचा उपयोग सत्कारासाठी करण्यात येतो.

राहिलेल्या गुलाबपुष्प व हारांपासून साईरोझ अगरबत्ती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम स्थानिक महिला बचत गटांना देऊन त्यातून रोजगारही उपलब्ध होईल. या अगरबत्तीची विक्रीची व्यवस्था मंदिराच्या माध्यमातून केली जाईल. मिळणारे उत्पन्न बचत गटांना सुपूर्द करण्यात येईल. या अगरबत्तीद्वारे साईबाबांच्या आशीर्वादाचा, स्नेहाचा सुगंध भक्तांच्या घरापर्यंत पोहाेचेल’, असे डॉ. हावरे यांनी सांगितले. मंदिरातील गुलाबपुष्प, हारांपासून होणार अगरबत्तीची निर्मिती

अहमदनगर - शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधीवर वाहिले जाणाऱ्या गुलाबपुष्प व हारांपासून साईरोझ अगरबत्तीची निर्मिती करण्याचा निर्णय संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

या बैठकीस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, ॲड. मोहन जयकर, नगराध्यक्षा योगिता शेळके व कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होते. डॉ. हावरे म्हणाले, ‘शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने साईभक्त येतात. ते बाबांना मोठ्या प्रमाणात गुलाबपुष्प व हार अर्पण करतात. मंदिरात सुमारे एक टन गुलाबपुष्प व हार जमा होतात. या गुलाबपुष्प व हारांचा उपयोग सत्कारासाठी करण्यात येतो.

राहिलेल्या गुलाबपुष्प व हारांपासून साईरोझ अगरबत्ती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम स्थानिक महिला बचत गटांना देऊन त्यातून रोजगारही उपलब्ध होईल. या अगरबत्तीची विक्रीची व्यवस्था मंदिराच्या माध्यमातून केली जाईल. मिळणारे उत्पन्न बचत गटांना सुपूर्द करण्यात येईल. या अगरबत्तीद्वारे साईबाबांच्या आशीर्वादाचा, स्नेहाचा सुगंध भक्तांच्या घरापर्यंत पोहाेचेल’, असे डॉ. हावरे यांनी सांगितले.