घरात किवा कार्यालयात रोपटी लावून शुद्ध हवा मिळवा - पहाडपूर बिझनेस सेंटरचे संशोधन

0

हवेतील विषारी घटकांच्या प्रदुषणाने, नवी दिल्ली नेहमीच बातम्यांचा विषय असते, ज्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत असतो. यामध्ये शहरात आता काहीतरी सकारात्मक घडताना दिसते आहे ज्याने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

पहाडपूर बिझनेस सेंटरने काहीतरी वेगळे केले आहे, वाढते प्रदुषण कमी करण्यासाठी असे काहीतरी केले आहे ज्याने इतरांसमोर वेगळे उदाहरण ठेवले आहे ज्याचे अनुकरण त्यांनी करावे. १९९० मध्ये उभारलेल्या या सहा मजली इमारतीमध्ये हवा शुध्द करण्याची आणि पुन्हा वापरण्याची यंत्रणा आहे. बाहेरून पाहिले तर ही साधारण इमारत वाटते. मात्र आतमधील वातावरण पूर्णत: वेगळे आहे. हजारो रोपट्यांनी भरलेले, या सुविधेमुळे असे सांगण्यात येते की हवेतील विषारी घटकांचे विघटन होते आणि ती शुध्द होते अगदी पर्वतावर गेल्यावर असते तशीच.


कमल मित्तल, सीइओ, पहाडपूर बिझनेस सेटर, ( फोटो सौजन्य -  पहाडपूर बिझनेस सेटर) 
कमल मित्तल, सीइओ, पहाडपूर बिझनेस सेटर, ( फोटो सौजन्य -  पहाडपूर बिझनेस सेटर) 

कमल मित्तल, या बिझनेस सेटरचे सीइओ आहेत, त्यांनी सांगितले की, तेथे १२०० रोपटी आहेत, म्हणजेच प्रत्येक कर्मचा-यामागे सरासरी चार याप्रमाणात ही रोपटी तेथील माणसांना आवश्यक शुध्द हवा देतात.” कमल यांनी जागतिक आरोग्य संस्थेच्या त्या अहवालाबाबतही सांगितले की, साधारणत: एक कोटी लोक भारतात घरातील अशुध्द हवेमुळे मरण पावतात, त्या खालोखाल रक्तदाबामुळे.

१९९२मध्ये कमल यांना फुफ्फूसाच्या क्षमतेमध्ये कमतरतेचा मोठा आजार झाला, आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना दिल्ली सोडून जाण्यास सांगितले. त्याकडे लक्ष न देता त्यांनी या वाईट गोष्टीशी सामना करण्याचे ठरविले. त्यांनी बिझनेस सेंटरच्या अवती भवती हिरवाई लावण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या कार्यालयभर हिरवीगार रोपटी लावण्यास सुरुवात केली. त्यांनी संशोधन सुरु केले की यातून कोणत्या प्रकारे ही रोपटी शुध्द हवा उत्सर्जित करतात, आणि त्यांना नासाने याबाबत केलेल्या अभ्यासाची जोड मिळाली. त्यांनी ही संकल्पना प्रथम घरात राबविली आणि नंतर पीबीसी मध्ये आणली.

Source: Little Black Book
Source: Little Black Book

आश्चर्यकारकपणे, या रोपट्यांनी नियोजितपणे तेथील हवेचा दर्जा सुधारला आणि तेथे काम करणा-यांना प्रत्येक मजल्यावर प्रत्येकाला शुध्द हवा मिळू लागली. जरी इमारतीमध्ये एअर कंडिशनची सुविधा होती तरी, यंत्रे साप्ताहिक सुटीत बंद असत. त्यामुळे वातावरणातील हवेच्या शुध्दतेचा दर्जा खालावत होता. त्यानंतर आतमध्ये झाडे लावण्यात आली आणि सहाव्या मजल्यावरही शुध्द हवा मिळू लागली. या मागील हेतू इतकाच की हवेतील विषारी घटकद्रव्य जावून हानीकारक कार्बन मोनोक्साइड, किंवा विषाणूंचा परिणाम होवू नये.

कॅफे आइन्स्टेन, बिझनेस सेंटरमधील रेस्तरॉंमध्ये केवळ सेंद्रीय पदार्थ वापरले जातात आणि पदार्थ शिजविण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी इंडक्शनचा वापर केला जातो. कारण ज्योत आणि बर्नर्स यांनी जास्त हानी होते. या इमारतीमध्ये लेड बल्बज् लावण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे खिडक्यांना ज्यूटचे जाळे लावून झाकले आहे. त्यामुळे बाहेरच्या उष्णतेला आता येताना अटकाव होतो.एका चॅटमध्ये कमल यांनी सांगितले की, “ रेस्तरॉमधील हायजीन आणि बुरशीची पातळी भारतातील कोणत्याही रुग्णालयाच्या तुलनेत कमी आहे, आणि मी विश्वासाने कोणाही डॉक्टरांना पाचारण करु शकतो की, त्यांनी येथे येवून त्यांच्या शस्त्रक्रिया कोणत्याही हानी किंवा जंतूसंसर्गाशिवाय पार पाडाव्या”.

सौजन्य - थिंक चेंज इंडिया