कहानीवाली नानींना भेटा,ज्यांनी दहा हजार मुलांना गोष्टी सांगितल्या आहेत!

1

सरला मिन्नी मुंबईत वाढल्या. त्या हाती लागेल ती कथा, गोष्ट वाचून काढत, मग ते रिडर डायजेस्ट असेल किंवा एनिड ब्लायटॉन. त्यामुळेच त्यांच्या नातीने त्यांना काही गोष्टी ध्वनिमुद्रीत केल्या, ज्या तिला तिच्या कुटूंबियाप्रमाणेच मित्र परिवाराला ऐकवता आल्या. सरला यांना यामुळे खूपच कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळाले. ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती, अशी अतुलनीय प्रसिध्दी त्यांना मिळाली. त्यानंतर त्याची ओळख ‘कहानीवाली नानी’ म्हणून दहा हजार मुलांना झाली ज्यांनी लहानाचे मोठे होताना त्यांच्या गोष्टी ऐकल्या. 


त्यांनी स्वत:च्या गोष्टी सांगताना त्या पंचतंत्र, अकबर आणि बिरबल आणि असंख्य विषयातून ध्वनिमुद्रीत केल्या, आणि त्या वॉटसअॅप च्या माध्यमातून पाठविल्या. सरला हे काम आठवड्यातून दोन दिवस करत असत. हिंदी मध्ये मंगळवारी आणि इंग्लिश मध्ये शुक्रवारी त्यांचा आवाज त्या जगभरातील मुलांना पोहोचवित राहिल्या. त्यांच्या यादीत लहानाप्रमाणे मोठी झालेली मुलेही आहेत ज्यांना त्याच्या गोष्टी ऐकायला आवडतात, एका मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की, “ मी जगभरातील लोककथांचा अभ्यास केला, प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या पध्दतीने सांगताना ऐकल्या. त्या नंतर मी पटकथेवर काम केले, ते ध्वनिमुद्रीत केले आणि माझ्या मुलीला आणि नातीला पाठविले. त्यांनी मला त्यांच्या प्रतिक्रीया दिल्या. त्यांच्या कडून जे मी ऐकले त्यानंतर मी माझ्या ग्राहकांसाठी ते प्रसारित केले. मी ऐकलेल्या गोष्टीत सुधारणा केल्या, जेणे करून त्या अगदी लहान नकळत्या वयातील मुलांनाही समजतील, त्याचप्रमाणे त्या मी रूची पूर्ण कश्या होतील यावरही लक्ष दिले.”


अशाप्रकारे त्या गोष्टींसोबत लहानाच्या मोठ्या झाल्या. २००९मध्ये एकदा त्या बंगळूरूला स्थलांतरीत झाल्या आणि त्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे त्यांना लोकांसाठीच नाही तर स्वत:साठी देखील गोष्टी सांगण्याची गरज भासू लागली.

जरी या गोष्टी सरला यांच्यासाठी व्यक्तिगत अनुभवाच्या असल्या तरी त्यात पार्श्वध्वनी किंवा इतर गोष्टींची भर नसते. ६१ वर्षांची कहानीवाली नानी अभिमानाने सांगतात की,  एका दिवशी त्यांना मुंबईतून ८०० जणांनी प्रतिसाद दिला होता. त्याबाबत सांगताना त्या म्हणाल्या होत्या की, “ काहीवेळा मला संदेश येतात की ‘नानी आम्ही नव्या गोष्टींची वाट पहात आहोत!’ अनेक पालकांनी सांगितले की त्यांच्या मुलांना आजोबा आजी नाहीत, त्यांच्या गैरहजेरीत कहानीवाली नानीने ही उणिव पूर्ण केली आहे. काही जण म्हणाले की यातून त्यांच्या मुलांना नवे नवे शब्द कळतात, त्यामुळे त्यांच्या आकलन शक्तीमध्ये भर पडते.”