सॅटर्डे क्लबची महाराष्ट्रीय उद्योजकांची जागतिक परिषद

सॅटर्डे क्लबची महाराष्ट्रीय उद्योजकांची जागतिक परिषद

Friday December 23, 2016,

2 min Read

सॅटर्डे कल्ब आयोजित महाराष्ट्रीय उद्योजकांची उद्योगबोध २०१७ ही जागतिक परिषद १३ व १४ जानेवारी २०१७ या दिवशी होणार असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील. उद्घाटन सोहळा टिपटॉप प्लाझा, ठाणे येथे होईल तर समारोप अंधेरी येथील द ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास क्लबचे संस्थापक माधवराव भिडे, विश्वस्त व शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, क्लबचे ब्रॅण्ड अॅम्बॅसॅडर संदीप कुलकर्णी, अॅडगुरू भरत दाभोळकर, ऑऱगॅनिक फार्मिंगचे तज्ञ कणेरी मठ, कोल्हापूरचे स्वामी काडसिद्धेश्वर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तसेच या वेळी पारितोषिक वितरण सोहळा होईल. सुमारे १ हजार उद्योजकांचे बिझनेस नेटवर्किंग यानिमित्ताने होईल.

image


१४ जानेवारीला पहिल्या सत्रात मेक इन इंडिया विषयाचे अभ्यासक जगत शहा यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर प्रख्यात व्याख्याते गिरीश जखोटिया 21 व्या शतकातील उद्योजकता या विषयावर तर पद्मश्री डॉ. गणपती यादव उद्योगासाठी आवश्यक नाविन्यपूर्णता या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच सॅटर्डे क्लबचे विश्वस्त व पितांबर प्रॉडक्टसचे संचालक रविंद्र प्रभुदेसाई उच्च, मध्यम व लघु व्यवसायातील संधी आणि आव्हाने या विषायवर अल्केश अगरवाल, शंतनू भडकमकर, नितीन गोडसे यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर विश्वस्त व बँक ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक अशोक दुगाडे महिला व्यवसायिक पद्मश्री कल्पना सरोज, रेवती रॉय व मीनल बीडकर यांच्याशी संवाद साधतील.

सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक संधीचा लाभ सहभागी होणा-या नवउद्योजक, सुस्थापित उद्योजकांना मिळेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 9220000022 किंवा 022-25688838 येथे व www.udyogbodh.com या संकेतस्थळावर संपर्क करावा, असे आवाहन संस्थापक माधवराव भिडे यांनी केले आहे.