घानाच्या या महिलांकडून शिकण्यासारखा धडा, ज्या स्वच्छ पाणी वास्तवात निर्माण करत आहेत

0

“असे होवू शकेल का की एक महिला रिकामी बादली घेवून अश्मयुगात निघाली आणि सन २०१६पर्यंत घरी पाणी घेवून परत आली” - संजय विजेशेकर युनिसेफ चे ग्लोबल हेड वॉटर, सॅनिटेशन अॅन्ड हायजीन.

युनिसेफच्या मते, दररोज मुली आणि महिला दोनशे दशलक्ष तास जगभरात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करतात. ज्यावेळी जागतिक पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, याचे आश्चर्य वाटते की, त्यावर कुणीच विचार करत नाही की, की लैंगिकबाबतीत दुजाभाव केला जात नसता तर जगातील निम्म्या लोकसंख्येचा घटक त्यांच्या जीवनातील बहुतांश वेळ पिण्याचे पाणी शोधून ते मिळवण्यात वाया घालवत आहे. हे तेच आहे जे साहा ग्लोबल आणि त्यांच्या संस्थापिका केट सींकोता आणि वँन्नेसा ग्रीन यांच्या लक्षात आले.


साहा ग्लोबलची सुरुवात २००९मध्ये झाली. त्याचा उद्देश घाना मधील लोकांना कायमस्वरूपी शुध्द पाण्याचा पर्याय मिळवून देणे, आणि महिलांच्या उद्योजकतेला त्याचवेळी प्रोत्साहन देणे. यातील नेमक्या कोणत्या गोष्टींचा त्यांना वेध होता याबाबत बोलताना केट म्हणाल्या की, “ माझ्यासाठी हे धक्कादायक होते की, बहुतांश पाणी शुध्द करण्याच्या तंत्राचा विकास हा विकसनशील विश्वासाठीच करण्यात आला आहे. परंतू तरीही लोक पाणीजन्य आजारांमुळे आजही मरत आहेत. हे माझ्या मनाला लागले आणि समस्या तंत्रात नाहीतर त्यांच्या अंमलबजावणीत आहे असे मला वाटले. हा प्रश्न अंतिमत: सोडविण्याचा मार्ग म्हणजे लोकांना हा प्रश्न कायमस्वरूपी कसा सोडविता येईल याचा विचार करणे.”

असे असले तरी हे सारे काही सोपे नव्हते, केट यांनी विचार केला की प्रयत्न सफल व्हावे असे काहीतरी केले पाहिजे. जी पध्दत त्या हाती घेतील तिला परंपरा आणि विश्वास यांच्या साठी आव्हानात्मक काही नसावे. त्यांच्या हे देखील लक्षात आले की महिलांना यातील सा-या गोष्टी शिकवाव्या लागतील, ज्या पाणी शुध्द करण्याचे काम करणार आहेत. जे पाणी त्यांच्या घानामधील घरात वापरले जाणार आहे.


याच समजदारीतून, महिला उद्योजिकांना परवडतील अशा साधनांची तसेच प्रशिक्षणाची सोय करून देण्यात आली जेणेकरून अशुध्द पाण्याचे त्या पिण्याच्या शुध्द पाण्यात रूपांतर करतील. स्थानिक पातळीवर उपलब्ध गोष्टी जसे की कोळसा आणि पोटॅशियम ऍल्यूम पावडर यांचा वापर या प्रक्रियेत करण्यात आला.

आज यामध्ये सहभागी महिला एक ते दोन डॉलर आठवड्याला कमाई करत आहेत, ज्या पाच तास सप्ताहात काम करतात. याबाबत माहिती देताना केट सांगतात, “ मी खरेतर त्यांच्या वागणुकीत झालेल्या बदलांवर लक्ष देते, ज्यातून लोकांना खात्रीने स्वच्छ पाणी पिण्यासाठी कायम देता येते. गरीबातील गरीब माणसाला आम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी देता यावे, आणि योगायोगाने येथे मोठ्या प्रमाणात उदासिनता दिसते ज्यावेळी अशा घटकांना पाणी देण्याचा विषय येतो”. 

पन्नास हजार पेक्षा जास्त लोकांना यातून फायदा होत आहे, आणि मोठा दुसरा फायदा असा झाला आहे की शंभर जणांना शुध्द पाणी पुरवण्याचा उद्योग मिळाला आहे. यातील कुणीही तो मध्येच बंद करणार नाही. साहा ग्लोबलच्या प्रयत्नातून आता घानाच्या लोकांना सौर उर्जा देण्याच्या पर्यायांचा देखील विचार सुरू आहे,आणि पाणी शुध्दीकरणाचे काम अन्य देशात विस्तारित देखील केले जात आहे.