बजेट हॉटेल्सचे दक्षिण आशियाई मार्केट काबीज करण्यासाठी सिंगापूरमध्ये ‘रेडडोअर्झ’ सज्ज

बजेट हॉटेल्सचे दक्षिण आशियाई मार्केट काबीज करण्यासाठी सिंगापूरमध्ये ‘रेडडोअर्झ’ सज्ज

Friday March 18, 2016,

4 min Read

नवीन कंपनीचा प्रवेश असो, संपादन असो किंवा निधी उभारणी असो, आता काही महिने बजेट हॉटेलचे क्षेत्र या सगळ्या ऍक्टीविहिटीजने गजबजलेले असेल यामध्ये काहीच आश्चर्य वाटण्यासारखे नाही, कारण दिवसेंदिवस पर्यटकांची आणि सुट्ट्यांसाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जी ट्रॅव्हलबीझमॉनीटरच्या रिपोर्टनुसार २०१७ पर्यंत ४७ टक्क्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

सिंगापूरस्थित ‘रेडडोअर्झ’ने या मार्केटमध्ये आपला वाटा उचलण्याचा निर्धार केला आहे. हा हॉटेल्स, रिसॉर्ट, इन्स, सर्विस अपार्टमेंट्स, बी ऍण्ड बी आणि गेस्टहाऊससाठी सेवा देणारा असेट-लाइट बजेट अकॉमोडेशन ब्रॅण्ड आहे. हा ब्रॅण्ड बजेट हॉटेल्सच्या मालकांना त्यांच्या सेवा प्रमाणित करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आणि सहाय्य मिळविण्याची आणि आपल्या टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना थेट ऑनलाईन वितरण करण्याची संधी मिळवून देतो.


image


कस्टमर सॅटिस्फॅक्शनच्या वाढत्या मागणीमुळे ‘रेडडोअर्झ’शी संलग्न सर्व बजेट हॉटेल्समध्ये ग्राहकांना प्रमाणित सेवा पुरविण्याबरोबरच टेक्नोलॉजीच्या माध्यमातून बजेट हॉटेलच्या मालकांनाही विविध डिजीटल प्लॅटफॉर्म्सवरुन आपल्याविषयीची माहिती पसरविण्यासाठी मदत करण्याचे ‘रेडडोअर्झ’चे लक्ष्य आहे.

‘रेडडोअर्झ’ने आरक्षण प्रणाली आणि ग्राहकांच्या चेक-इन टाईमचे केलेले एकत्रिकरण वास्तविक वेळ नियंत्रित करते. अमित सबरवाल आणि आशीष सक्सेना यांना ही कल्पना सुचली तेव्हा ते मेक माय ट्रीपसोबत काम करत होते. एशिया पॅसिफिक रिजनसाठी आणि या क्षेत्रासाठी काम करत असताना हे क्षेत्र असंघटीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना जाणवले की तंत्रज्ञानाच्या मदतीने हे बदलता येऊ शकते.

“आम्ही पाहिलं की आज बजेट हॉटेल्सचं क्षेत्र खूप विस्कळीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देणारं आहे, ज्याचा कस्टमर सॅटीस्फॅक्शनवर परिणाम होत असल्याचं पहायला मिळत आहे. रेडडोअर्झ याच समस्येवर उपाय घेऊन आले आहे,” ४५ वर्षांचा अमित सांगतो.

दक्षिणपूर्व आशियातील पर्यटन व्यवसायाचे मार्केट आज ६०.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहचलेले आहे. वर्षातून अनेकदा थायलंड, बाली, सिंगापूर, जकात्रा आणि क्वालालंपूरसारख्या मुख्य पर्यटन आणि बिझनेस हब असलेल्या शहरात राहण्याच्या व्यवस्थेच्या उपलब्धतेपेक्षा ग्राहकांची संख्या जास्त असते.

अनेक प्रॉपर्टीज ऑफलाईन आहेत. त्याशिवाय कमी प्रमाणात ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन तंत्रज्ञानाचा अवलंब केलेले हे मार्केट अतिशय विस्कळीत आहे. हॉटेल मालकांना त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तांमध्ये किती आर्थिक मोबदला देण्याची क्षमता आहे याची जाणीव नाही आहे आणि त्यामुळे त्यांना दररोज कमीत कमी सरासरी दरामध्येच काम चालवावे लागते.

जरी या दोघांना या क्षेत्राचे ज्ञान आणि अनुभव असला तरी त्यांना एक चांगली टीम उभारणे खूप अवघड गेले. तथापि, त्यांनी त्यांचे दक्षिणपूर्वेकडच्या मार्केटमधील शक्य ते सर्व संपर्क वापरले आणि त्यांच्या सारखाच दृष्टीकोन असणाऱ्या लोकांना ऑनबोर्ड आणण्यासाठी काम केले. फोकस राईटचे संस्थापक फिलीप वोल्फ आणि सरोवर हॉटेल्स ऍण्ड रिसॉर्टचे कार्यकारी संचालक अजय बकाया त्यांच्या बोर्डवर आहेत.

तथापि, ते इतर नियमित स्टार्टअप्सना सामोरे जावे लागणाऱ्या निधी उभारणी, नवीन ग्राहक मिळविणे आणि आपल्या उत्पादनाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्यासारख्या समस्यांशी अजूनही झगडत आहेत.

गेल्या वर्षाच्या मध्यात रेडडोअर्झने व्यवसायाची सुरुवात केली आणि जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून ते इन्डोनेशियात कार्यरत आहे. महिनोंमहिने व्यवसायात ५० टक्केच्या आसपास वाढ होत असल्याचा आणि दर महिन्याला १००००च्या आसपास रुम्स बुक करत असल्याचा कंपनी दावा करते.

“परिसरातील सर्व हॉटेल ऑपरेटर्सच्या समस्यांचे निराकरण आम्ही करत असल्यामुळे इतर शहरातही आम्हाला असाच प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा करतो,” अमित सांगतो. यासारख्याच इतर व्यासपीठांप्रमाणेच रेडडोअर्झचे रेव्हेन्यु मॉडेल हे एका विशिष्ट किंमतीवर केलेली खरेदी आणि एका विशिष्ट किंमतीवर केलेली विक्री यावरच आधारित आहे. ज्यामध्ये मिळालेल्या मार्जिनमधूनच पैसा कमविला जातो.

रेडडोअर्झने व्यवसायाच्या विस्ताराला बळकटी देण्यासाठी सुरुवातीच्या फेरीत जंगल वेंचर्स आणि ५०० स्टार्टअप्सकडून निधी उभारला. आशिया पॅसिफीक मार्केट ट्रॅव्हल क्षेत्रात झपाट्याने वाढ अनुभवत आहे आणि ते या क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रतिक्षेत आहे.

“इन्डोनेशिया, थायलंड, सिंगापूर आणि क्वालालंपूरसह दक्षिणपूर्वेकडील मुख्य टुरिस्ट आणि बिझनेस हब्जमध्ये व्यवसाय सुरु करण्यावर सध्या आम्ही लक्ष्य केंद्रित केले आहे,” अमित सांगतो.

जागतिक स्तरावर असलेल्या बेस्पोक हॉटेल्स, निडा रुम्स आणि ट्यून हॉटेल्सप्रमाणेच दक्षिणपूर्वेकडच्या अनेक बजेट हॉटेल्समध्ये रॉकेट इन्टरनेटच्या झेन रुम्सचाही समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, दक्षिणपूर्व आशियातील बजेट हॉटेल्सचे मार्केट जवळपास १० अब्ज डॉलर किंमतीचे आहे आणि जवळपास १०० दशलक्ष पर्यटक दरवर्षी इथे येतात.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांप्रमाणेच भारतात सुरु झालेल्या कंपन्यानीही दक्षिणपूर्वेकडच्या मार्केटला लक्ष्य केले आहे. २०१५ मध्ये, ओयो रुम्सने सॉफ्ट बँकेकडून १०० दशलक्ष डॉलरचा सर्वात जास्त निधी उभा केला. टायगर ग्लोबलकडून वारंवार मिळालेल्या निधीनंतर झोस्टेलने झो रुम्ससह स्वस्त हॉटेलच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.

२५ अब्ज डॉलर ते ४० अब्ज डॉलरमधील एस्टिमेटेड बजेट हॉटेल ऍग्रीगेशन मार्केटमध्ये अनेक प्लॅटफॉर्म या क्षेत्राचा अधिकाधिक फायदा करुन घेण्यासाठी स्पर्धेत आहेत. दुसरीकडे, या क्षेत्रात छोट्या स्तरावर अनेक कंपन्यांचे अधिग्रहणही होत आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी वुडस्टेने ऑवसम स्टेला अधिग्रहित केले.

यासारख्याच नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित :

स्वस्तातील हॉटेल्समध्ये उत्कृष्ट सेवेची हमी म्हणजे ‘ट्रीबो’


image


लेखिका : सिंधु कश्यप

अनुवाद : अनुज्ञा निकम