प्रारंभ राष्ट्रगीताने, मग जनतेचे काम, एका महिला जिल्हाधिका-याने बदलून टाकली, संपूर्ण जिल्ह्याची कार्यसंस्कृती...!

0

अनेकदा असे म्हटले जाते की, एखादी व्यक्ती कोणत्याही रुपात काम करत असली तरी, त्याचा सरळ परिणाम देशावर होतो. असे असूनही लोकांना हे दिसत नाही, परंतु हेच खरे आहे की, कुठल्या न कुठल्या परिस्थितीत त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम देशावर होतो. ईश हा व्यक्ती आणि समाजाचाच बनतो. हो, हे खरे आहे की, लोक अनेकदा देशाचा नंतर विचार करतात आणि स्वतःचा विचार पहिले करतात. मात्र युद्धावर आपल्या जीवाची चिंता न करणारे जवान सोडून काही लोक असे असतात, ज्यांना देशाचा विचार सर्वात पहिले येतो. त्यांना या गोष्टीची जाण होते की, जर प्रत्येक गोष्ट देशाचा विचार करून केली तर, अनेक गोष्टींच्या समस्या कमी होतील. अशाच आहेत, जिल्हादंडाधिकारी रचना पाटील. 

एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने वैशाली जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात त्यांनी प्रशंसनीय काम केले आहे. लोकशाहीच्या जननी असलेल्या वैशाली जिल्ह्यात वर्ष २०१६मध्ये राष्ट्रगीत आणि जनतेच्या कामाच्या पद्धतीमध्ये मौन क्रांतीच्या त्या साक्षीदार बनत आहेत. रचना पाटील यांनी हे सुनिश्चित केले की, सरकारी कार्यालयात कामकाज सुरु होण्यापूर्वी सर्व कर्मचारी मिळून राष्ट्रगीत गातील. या अनोख्या प्रयोगाची सुरुवात करून दाखवली आहे, वैशालीच्या जिल्हाधिकारी रचना पाटील यांनी. संपूर्ण देशात सरकारी कार्यालयात कदाचित असे कुठले दुसरे उदाहरण असेल की, जेथे एखाद्या सरकारी कार्यालयात दररोज सर्वात पहिले ‘जण- गण- मन...’ म्हटल्या नंतरच हजेरी लागते. सोबतच उशिरा येणा-यांसाठी कार्यालयाचा दरवाजा बंद होतो आणि सोबतच फलकावर रोज नवीन सुविचार लिहिला जातो. त्यानंतरच जनतेचे काम. त्यामुळे फाईलचा गठ्ठा पुढे सरकायला लागला आणि तक्रारी देखील कमी होण्यास मदत झाली आहे. आपल्या या अनोख्या प्रयोगामुळे सन२०१०या कालावधीत आयएएस अधिकारी वैशालीच्या जिल्हादंडाधिकारी देखील खुश आहेत. त्यांना सकारात्मक बदल जाणवायला लागला आहे. याबाबत रचना पाटील यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, “मी छत्तीसगढ च्या राजनांदगावात लहानाची मोठी झाले. लहानपणी शाळेत जायची, तर सर्वात पहिले प्रार्थना व्हायची. आम्ही सर्व मिळून ‘जण-मन-गण...’ गायचो. पुढील जीवनात अशा संधी खूप कमी आल्या. परंतु जेव्हा मी आयएएस झाले आणि वैशाली मध्ये जिल्हाधिकारी झाले तेव्हा वाटले की, राष्ट्रगीत ‘जण-गण-मन...’ रोज म्हटल्याने केवळ आंतरिक उर्जा प्राप्त होऊ शकते, तसेच स्वतःला अनुशासित देखील करू शकतो. त्यामुळे १जानेवारी, २०१६पासून वैशाली मध्ये त्याची सुरुवात केली.”

‘जण-गण-मन...’ च्या सामुहिक गायनाच्या वेळी आमंत्रित करताना पाटील सांगतात की, “तुम्हाला बघून खूप चांगले वाटेल की, जिल्हाधिकारी कार्यालयात पाचशेहून अधिक सरकारी कर्मचारी एकाचवेळी मिळून राष्ट्रगीत गात आहेत. येथे कोणीही लहान – मोठे नसते. सर्वांचा एकसंघ आवाज असतो.”

जिल्हाधिकारी कार्यालया नंतर रचना पाटील यांनी यांनी संपूर्ण वैशालीच्या सरकारी कार्यालयात राष्ट्रगीत गाणे सक्तीचे केले आहे. रचना पाटील सांगतात की, ‘जण-गण-मन...’ म्हणण्याचे अनेक फायदे झाले आहेत.“वेळेत लोक कार्यालयात येतात. राष्ट्रगीत म्हणताना उशिरा येणा-यांसाठी कार्यालयाचा दरवाजा बंद करण्यात येतो. त्यानंतर उशिरा आलेल्या कर्मचा-यांना कारण सांगावे लागते.

रचना पाटील सांगतात की, सुविचाराला देखील त्यांनी आपल्या दररोजच्या कामातीलच एक भाग बनविला आहे. फलकावर आजचा सुविचार कुणीही लिहू शकतो. तयार होऊन येणा-यांची संख्या वाढत आहे. 

जिल्हाधिकारी यांच्या मते, तर अधिकारी- कर्मचारी यांच्यात नव्या प्रयोगाने केवळ बोलण्यातील दुरावा तसेच मानसिक दुरावा देखील कमी झाला आहे. हो, हे खरे आहे की, या दैनिक कामात थोडा वेळ लागतो. मात्र, पुढे जाऊन तथ्य हे आहे की, कार्यालयात कामाच्या गतीत तर बदल झाला आहेच, शिवाय त्यांच्या संस्कारात देखील फरक पडला आहे. सर्व कर्मचारी निश्चित वेळेवर कार्यालयात हजर असतात. काम गतीने व्हायला लागले आहे. शिल्लक काम कमी झाले आहे. कार्यालयातून कर्मचारी गायब असल्याच्या सामान्य लोकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. 

हो, ‘जन -गण- मन...’ च्या दैनिक गायनाच्या सुखद दिनचर्ये व्यतिरिक्त रचना पाटील यांनी सर्वांसाठी सरकारी ड्रेस कोड देखील सक्तीचा केला आहे. म्हणजेच जीन्स आणि टी शर्ट वैशालीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आता चालणार नाही. धोती- कुर्त्यावर पाबंदी नाही. रचना सांगतात की, हे गरजेचे आहे. तुम्ही काम करण्यासाठी कार्यालयात जात आहात तर, कुठलेही कपडे घालून चालणार नाही. सर्वकाही अनुशासित दिसले पाहिजे. जेव्हा जिल्हाधिका-याला हे विचारतो, तेव्हा त्या म्हणतात की, “हा बदल भलाईसाठी चांगला आहे. पुढे जाऊन सर्वांना चांगले वाटेल. मी स्वतः लक्ष ठेवते. लहान मुले जेव्हा शाळेचा गणवेश घालून शाळेत जातात, तेव्हा महत्वाचे काम करण्यासाठी तुम्ही कुठलेही कपडे घालून कसे चालेल?

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

आता वाचा या संबंधित कहाण्या

वयाच्या १० व्या वर्षी लग्न, २० व्या वर्षी ४ मुलं, ३० व्या वर्षी एका संस्थेची स्थापना...... आता २ लाख स्त्रियांचा विश्वास ‘फूलबासन’
इस्लामिक कायदेतज्ज्ञ आणि विद्वानांचा विरोध पत्कारत राजस्थानातील दोन मुसलमान महिला बनल्या काजी

महिला सक्षमीकरणाची अनोखी कहाणी: मंजुळा वाघेला!


लेखक : कुलदीप भारव्दाज
अनुवाद : किशोर आपटे