१५लाखांची नोकरी सोडून तीन मुलांनी बनविले स्टार्टअप, जुने सलून उघडले आणि ग्राहकांचा वाचविला वेळ !

१५लाखांची नोकरी सोडून तीन मुलांनी बनविले स्टार्टअप, जुने सलून उघडले आणि ग्राहकांचा वाचविला वेळ !

Thursday March 24, 2016,

5 min Read

एक जुनी म्हण आहे की, आवश्यकता अविष्काराची जननी आहे. याचा अर्थ हाच की, व्यक्ती आपल्या गरजेनुसार आणि आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी नवनव्या वस्तू आणि व्यवस्था बनवतो. याचा फायदा ग्राहक बाजारातच नव्हे तर केवळ वस्तूच्या उत्पादनावर तसेच सेवाक्षेत्रात देखील समान पद्धतीने लागू होतो. देशात मध्यमवर्गाच्या सतत वाढणा-या खरेदीमुळे सेवा क्षेत्राचा सलग विस्तार होत आहे. बाजारात मोठमोठ्या देशी आणि विदेशी कंपन्या अनेक सेवा घेऊन येत आहेत, ज्यामुळे ग्राहकांना केवळ त्यांनी खर्च केलेल्या पैशांमुळे सुलभ, स्वस्त आणि संतोषजनक सेवा मिळत आहे, तसेच त्यांच्या वेळेची देखील बचत होत आहे. सेवाक्षेत्रामध्ये आज अशा कंपन्या वेगाने वाढत आहेत, ज्या केवळ फायद्याच्या दृष्टीनेच चालविल्या जात नाहीत तर, सामान्य लोकांच्या समस्यांना सोडविण्यासाठी एक पर्याय म्हणून बाजारात उपलब्ध आहेत. विशेषकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप योजनेनंतर संपूर्ण देशात आंत्रप्रेन्योरशिप बाबत एक सकारात्मक विचार बनला आहे. आता महाविद्यालयातून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करून निघणारे युवा नोकरी करण्याचे सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. काही तरुणांनी या दिशेने आपले पाउल देखील वाढविले आहे. ही नवी कहाणी आहे, भोपाळमध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेणारा विद्यार्थी प्रवीण मौर्या आणि त्याचे दोन साथीदार रवी नारंग आणि मोहन साहू यांची, ज्यांनी वर्षाचे लाखो रुपये नाकारून स्वतःचे स्टार्टअप सुरु केले आहे. सलून आणि पार्लर यांच्याशी जोडलेले हे स्टार्टअप आपल्या केवळ एक महिन्याच्या काळातच लोकांना खूप आवडत आहे. आपल्या यशाने उत्साहित या लोकांनी आता भोपाळच्या बाहेरच्या शहरात आणि संपूर्ण देशात आपल्या पार्लर्सच्या साखळीचा विस्तार करण्याची योजना बनविली आहे. 

image


नाव्हयाच्या दुकानावर ते वाट बघणे होऊ लागते कंटाळवाणे

केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी एखाद्या नाव्ह्याच्या दुकानात किंवा पार्लरमध्ये आपला नंबर कधी येईल, असा विचार करत बसणे सर्वांसाठी कंटाळवाणे असते. सलूनमध्ये बसून बसून जर तुम्ही तेथे ठेवले वर्तमानपत्र पूर्ण वाचून काढाल आणि दुकानात लागलेल्या टीव्हीवर चालू आलेला एखादा सिनेमा किंवा कार्यक्रम तुमच्या आवडीचा नसेल तर, ते हळू हळू खूपच कंटाळवाणे होते. त्यातच जर कार्यालयात जाण्याची घाई असेल तर, असा विचार येतो की, केस न कापल्याशिवायच तेथून पळून जावे. अनेकदा असेही होते की, आपला नंबर येतो, परंतु पार्लरवाल्या व्यक्तीचा कुणीतरी खास परिचित किंवा त्याच्या भागात राहणारी एखादी व्यक्ती आली तर, सर्व नियम तोडून तो पहिले त्याचे केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी लागतो. तेव्हा आपण इच्छा असूनही काहीच करू शकत नाही आणि मन मारून पुन्हा एकदा वाट बघू लागतो. वेळ वाया जाण्यापासून वाचण्यासाठी आणि या प्रकारच्या त्रासापासून वाचण्यासाठी अनेक लोक घरातच स्वतः दाढी करतात, मात्र इच्छा नसूनही त्यांना केस कापण्यासाठी सलून मध्ये जावेच लागते, मात्र, आता या समस्येचा उपाय शोधला गेला आहे. आता तुम्ही आपले केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी आपल्या आवडत्या सलून आणि पार्लरमध्ये देखील जाऊ शकाल आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ देखील वाया घालवावा लागणार नाही आणि रांगेत बसून वाटही बघावी लागणार नाही. आता नाव्ही पहिल्यापासूनच तुमची वाट बघत बसेल. सलूनमध्ये पोहोचल्यावर तो तुमचे काम पटापट करेल आणि त्यानंतर तुम्ही तेथून लगेच बाहेरही पडाल. 

image


वाट पहाणे आता विसरा...

देशाच्या सेवाक्षेत्रामध्ये आपल्या सारख्या या आगळ्या वेगळ्या कल्पने सोबत पार्लोसैलो नावाने सुरु करण्यात आलेल्या या स्टार्टअपने कुठलीही व्यक्ती हेयर कटिंग, हेयर डाय, शेविंग, ट्रीमिंग, स्पा, मसाज, वैक्स, फेशियल आणि मेकअप सहित पार्लरच्या कुठल्याही सेवेसाठी पहिलेपासूनच बुकिंग करू शकतो. बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना जवळच्या आणि त्यांच्या आवडीच्या सलूनमध्ये सेवा उपलब्ध होण्याचा एक निश्चित वेळ दिला जातो. ग्राहक आपल्या वेळेवर जाऊन वाट न बघता केस कापणे किंवा अन्य कुठलीही सेवा प्राप्त करून मोकळा होतो. त्यामुळे त्याच्या वेळेची बचत होते आणि त्यांना कुठलीही अन्य अधिकची रक्कम द्यावी लागत नाही. या प्रकारच्या सर्विस सोबत एकत्र तिघांना फायदा मिळत आहे. ग्राहकांना जेथे आपल्या वेळेनुसार सेवा मिळत आहे, तेथे सलून आणि पार्लरवाल्यांना देखील वाट पाहणा-या ग्राहकांचा कुठलाही दबाव नसतो. आता अशा ग्राहकांना स्वतःच्या पार्लरकडे वळविण्यात देखील सोपे जात आहे, जे पार्लरची गर्दी पाहून दुस-या पार्लरचा रस्ता पकडतात. पार्लर आणि ग्राहकांना जोडण्यासाठी पार्लोसैलो एक उत्तम मंच आणि सेतूचे काम करत आहे. 

image


पार्लोसैलो अशा पद्धतीने करते काम

पार्लोसैलो जवळ शहरातील सर्व सलून आणि पार्लरची यादी आहे. कुठले सलून शहरातील कोणत्या भागात आहे, त्याची पूर्ण माहिती कंपनी कडे आहे. कंपनी मध्ये २४ तास ग्राहक बुकिंग करू शकतात. बुकिंग ऑनलाईन आणि फोन मार्फत करण्याची सुविधा आहे. ग्राहक आपल्या जवळच्या किंवा शहराच्या एखाद्या जवळच्या आवडत्या पार्लरसाठी आपली बुकिंग करू शकतात. सर्विस चार्ज ग्राहक बुकिंगच्या वेळीच ऑनलाईन करू शकतात, किंवा सेवा घेतल्यानंतरही पार्लरमध्ये पैसे देऊ शकतात. 

image


कंपनीच्या जवळ सध्या केवळ १२ लोकांचा कर्मचारी वर्ग आहे. चार लोक कार्यालयात ग्राहकांचा फोन उचलतात किंवा त्यांनी केलेल्या मेल मार्फत पाठविण्यात आलेल्या बुकिंग रिक्वेस्टला कंफर्म करून ग्राहकांना सेवा उपलब्ध करण्यासाठी फोन करून वेळ सांगतात. चार लोक व्यवस्थापन आणि कार्यालयाच्या अन्य कामांची जबाबदारी सांभाळतात. अन्य चार शहरातील नवे सलून आणि पार्लरला कंपनीला जोडण्याचे काम करतात. 

image


तीन मित्रांनी सोडली लाखोंची नोकरी

उत्तर प्रदेशच्या बनारसमध्ये राहणारा प्रवीण मौर्या भोपाळच्या मिलिनियम कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी च्या बीई (सीएस) अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचे दोन साथीदार पूर्वी नारंग आणि मोहन साहू आणि त्याचे तीन मित्र समीर, चंदन आणि निधीने मिळून काम केले. विशेष बाब ही आहे की, अनेक मित्रांचे हैद्राबादच्या एका आयटी कंपनीत प्लेसमेंट झाले. सर्वाना जवळपास १२ ते १५ लाख रुपये वर्षाच्या मानधनाचा प्रस्ताव देण्यात आला, मात्र विद्यार्थ्यांनी नोकरी सोडून स्वतःच्या उद्योगाला महत्व दिले आहे. 

image


प्रवीण यांच्या वडिलांचा संगणकाचा व्यवसाय आहे, तर त्यांचा मोठा भाऊ डॉक्टर आहे. प्रवीण आणि त्यांचे तीन मित्र समीर, चंदन आणि निधी यांचा आत्मविश्वास चांगला होता. प्रवीण यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “एक दिवशी आम्ही आमच्या कंपनीला उंच शिखर गाठून देऊ. खूपच लवकर आमचे नेटवर्क भोपाळ आणि मध्य प्रदेशच्या सीमेच्या बाहेर देशातील दुस-या शहरांमध्ये देखील पोहोचेल.”

असे असूनही सध्या निधी गोळा करण्यात खूप समस्या येत आहे. त्यांचे दोन जोडीदार पूर्वी नारंग आणि मोहन साहू आहेत. हे दोघेही सेवा व्यापाराच्या क्षेत्रात अनुभवी आहेत आणि कंपनीला चालविण्यासाठी पैशांची व्यवस्था देखील हेच दोघे करतात.

image


कशी सुचली कल्पना

पार्लेसैलोची कल्पना याच चार मित्रांची आहे. अनेकदा त्यांना स्वतःचे केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी नाव्ह्याच्या दुकानात जावे लागायचे. दुकानावर ग्राहकांची खूप गर्दी असायची. तेथे आपला नंबर कधी येईल या विचारात तासोनतास बसावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात होता. वेळ वाया जाण्यापासून वाचण्यासाठी अनेकदा हे लोक नाव्ह्याला फोन करून दुकानावर जावू लागले, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचून त्यांचे काम योग्य वेळेत होऊ लागले. तेव्हा कल्पना आली की, हे काम मोठ्या प्रमाणावर सर्व ग्राहकांसाठी देखील केले जाऊ शकते. सर्व मित्रांनी विचार केला आणि सुरु केले पार्लोसैलो सारखे एक नवे स्टार्टअप.

या सारख्याच नाविन्यपूर्ण कहाण्या कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

लेखक : हुसैन ताबिश

अनुवाद : किशोर आपटे