काही करून ‘दंगल’ बघाच! त्यात फोगट कुटूंबियांकडून सर्वांनी शिकाव्या अश्या पाच गोष्टी आहेत.

0

हरियाणा सारख्या राज्यातून येत, जे मुलींच्या बाबतीत खाप पंचायत सारख्या नकारात्मकतेच्या गोष्टीनी भरले आहे, फोगट भगिनींनी कुस्तीच्या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे.

महावीरसींग फोगट आणि त्यांच्या मुली यांची कहाणी म्हणजे युगातून तयार होणा-या असामान्य वडील आणि मुलींची कहाणी आहे. ती पाहिल्यानंतर अनेक पुस्तके आणि सिनेमांना ही कहाणी प्रेरक ठरली नसती तरच नवल आहे. शेवटी झुंज देणारे सर्वांनाच आवडतात. जे शूर असतात ते भिडतात, त्यांचा विजय हा सा-या समाजाचा आणि देशाचा विजय असतो.

हरियाना सारख्या मागासलेल्या मानसिकेतून आलेल्या खाप पंचायतीसारख्या वातावरणात या बहिणींनी इतिहास घडविला, कुस्तीच्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. सहा फोगट भगिनी माजी कुस्तीपटू महावीर यांच्या मुली आहेत, गीता, बबिता, रिंतू, आणि संगिता त्याच प्रमाणे विनेश आणि प्रियांका. महावीर यांच्या दिवंगत भावाच्या मुली. ज्यांना त्यांनी त्यांच्या पत्नी दया यांच्या सोबत सांभाळ केला.

गीता भारतातील लोकप्रिय खेळाडू झाल्या आहेत, ज्यावेऴी त्यांनी २०१०मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या इमिली बेन्स्टेडला नमवून सुवर्ण पदक जिंकले. तिघी फोगट भगिनी- गिता, बबिता आणि विनेश यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत वेगवेगळ्या वजन गटातील सुवर्ण पदक पटकाविले आहे. तर रितू यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे. प्रियांका आणि संगीता यांनी देखील अनेक प्रकारच्या कनिष्ठ स्तरावरील आंतरराष्ट्रीय सामन्यात पदके मिळवली आहेत. गीता ज्यांना नुकतेच हरियाणा सरकारने पोलिस खात्यात सहायक पोलिस अधिक्षक पदावर नियुक्त केले आहे, त्यांनी २०१२मध्ये भारताचे ऑलिम्पीकसाठी प्रतिनिधित्व केले आहे. बबिता आणि विनेश यांनी २०१६च्यऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक जिने कांस्य पदक पटकाविले तिच्या सोबत संघात प्रतिनिधित्व केले आहे.


विनेश, रिंतू आणि बबिता
विनेश, रिंतू आणि बबिता

तर, खेळातील त्यांच्या कामगिरी बाबतचे सांगणे थोडे थांबवून, या फोगट कुटूंबाने काय कामगिरी केली ते पाहूया.

भेदभावाच्या वातावरणात

प्रतिभा ही यशाचे एक साधन असते. योग्य संधी- योग्य दरवाजा योग्य वेळी उघडणे फार महत्वाचे असते. रुढीवादी घराण्यात जन्माला येवून देखील, केवळ त्यांच्यात असलेल्या क्षमतेच्या बळावर आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना बळ दिल्यानेच फोगट भगिनींनी पहिल्यांदा चुणूक दाखविली. यातून प्रत्येकात प्रत्येक क्षणी क्षमता असते हेच दिसून येते.

झेलून घेणारा प्रशिक्षक

पहिल्यापासून मैदानात उतरेपर्यंत महावीर यांच्यासारख्या प्रशिक्षकाने वेगळेपणाने सांभाळ केला.अर्थातच लोकांनी प्रशिक्षकाशिवाय अनेकदा यश मिळवले आहे, पण कुणीही, विद्यार्थी किंवा उद्योजक अथवा कलावंत ज्यांना प्रशिक्षक मिळतात त्यांना त्यांच्या क्षेत्रात जास्त काही करून दाखविण्याची संधी असते.


काम काम काम त्याला पर्याय काहीच नाही

मागील महिन्यात मोठी बहीण गीता यांनी दिल्ली येथील कुस्तीपटू पवन कुमार यांच्याशी विवाह केला. हरियाणाच्या चरखी दादरी या भिवानी जिल्ह्यात झालेल्या विवाहावर माध्यमांनी लक्ष दिले होते. अभिनेते अमीर खान आणि इतर सेलेब्रिटी या लग्नात हजर होते. या मोठ्या विवाह सोहळ्यांनतर लगेच दोनच दिवसांत या नवविवाहीत जोडप्याने आपल्या कामाला सुरुवात केली,कारण कुस्तीची लीग डिंसेबंर महिन्यात होती. प्रशिक्षण आणि कठोर श्रम हे केवळ महिला आणि खेळाडू यांचे परवलीचे शब्द नाहीत तर जो कुणी यशाच्या शिखरांना पादाक्रांत करण्याचे स्वप्न पाहतो त्यांच्यासाठी आवश्यक गोष्ट आहे.

गीता फोगट
गीता फोगट

तुमच्या यशाची कहाणी लिहिता त्यावेळी तुम्ही जग बदलता

भारतातील मागासलेल्या भागात लहान वयातच मुलींची लग्न केली जातात. घरी रहा नवरा आणि मुलांची काळजी घ्या, आणि घरकाम करा. त्यांच्यातील हुनर आणि प्रतिभा मान्य केल्यांनतरही त्यांना मनासारखे जगता येत नाही. अशा प्रकारच्या समाजातून येवून ज्यावेळी फोगट भगिनी यश मिळवतात त्यावेळी नक्कीच त्या कौतुकास पात्र ठरतात. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक महावीर यांना माहिती नव्हते की समाजाच्या या रुढीवादी परंपरा ते बदलू शकतात, पण हे सारे घडले आहे.

एका माणसाच्या सुधारणावादी विचाराने नव सुधारणावादी विचारांची मालिका सुरु होते. त्यांचे पुस्तक “आखाडा: महावीरसिंग फोगट यांचे आत्मवृत्त” हेच सांगते.आश्चर्य म्हणजे घरात पहिली मुलगीच झाली त्यामुळे नाराज होणारे कुणी पुरुष माणूस नव्हते तर स्वत: दया कौर या गीता यांच्या आईच होत्या. ही त्यांच्या मनात रुढीवादी विचांरानी घर केलेली मनोवृत्ती होती जी या कहाणीचा मुळारंभ आहे.

तुमच्या ध्येयावरील दृष्टी कधी ढळू देवू नका

मुलींनी कायम कठोर परिश्रम घेतले आणि अनेक समस्या असूनही अनेक यशाची शिखरे गाठली मात्र महावीर यांनी सुरु केलेल्या या कहाणीचा अंत तो पर्यंत होत नाही जोवर या मुली भारतासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक घेवून येत नाहीत.