जीवघेण्या क्षयरोगावर मात करत डॉ राणे यांनी हिमालयातील सहा दिवसांच्या साहसी गिर्यारोहणाची यशस्वीपणे केली सांगता!

0

डॉ सौरभ राणे दिल्ली स्थित सार्वजनिक आरोग्य सेवेत डॉक्टर म्हणून काम करतात, त्यांनी नुकतेच देशातील त्या चाळीस जणांच्या चमू मध्ये सहभागी होवून सहा दिवसाच्या गिर्यारोहणाच्या कार्यक्रमात यशस्वी चढाई केली.आणि त्यांना फुफ्फूसांचा जीवघेणा विकार असल्याने दुर्मिळ उपचार सुरू असताना देखील, हे त्यांचे वैशिष्ट्य! अखेर अशक्य ते शक्य करून दाखविण्याच्या त्यांच्यातील उर्मीने जिवघेण्या रोगावर मात केलीच!

गेल्या दोन वर्षांपासून एका तरूण डॉक्टरला ट्यूबरकोलँसिस या फुफ्फूसांच्या विकाराने गाठले आहे, मात्र त्यावर मात करत त्याने नव्या उंचीला जाण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ सौरभ राणे (२४) यांनी नुकतेच स्वत:च्या एक्सडीआर या क्षयरोगाच्या उपचारातून मुक्ती मिळवली आहे, आणि त्याचवेळी त्यांनी ठरविले की ते लेह मधील स्टोक कांगरी या हिमालयीन ट्रेकला जातील , जी २०हजार फूट उंचीवरील चढाई आहे. ज्यावेळी त्यांच्यावर एक्सडीआर क्षयरोगाचे उपचार सुरू होते त्यावेळी कसेबसे त्यातून ते वाचले आहेत, त्यांच्या जगण्याची शक्यता केवळ २५% होती असे त्यांच्यावर उपचार करणारे सांगत होते.

फोटो सौजन्य : डीएनए
फोटो सौजन्य : डीएनए

मात्र राणे आज त्या चाळीस जणांच्या चमू मधले एक ठरले आहेत ज्यांनी मरणप्राय क्षयरोगाची भीती न बाळगता सहा दिवसांच्या गिर्यारोहणाची आपली किमया दाखवून दिली आहे.उपचारादरम्यान त्यांच्यावर करण्यात आलेल्या जालिम औषधौपचारामुळे त्यांना श्रवणदोष आणि दृष्टीदोषही झाला आहे, शिवाय शक्तिहीन झाल्याने त्यांच्यात ही सामान्य माणसाला कठीण ठरणारी चढाई करण्याचे सामर्थ्य असण्याची शक्यता दूरान्वयानेही नव्हती, मात्र त्यांनी ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे.

ते सांगतात की, “मी स्वत:लाच जानेवारीत वचन दिले होते की, जर या दुखण्यातून वाचलो तर मी असा काहीतरी धाडसी निर्णय घेईन की, या रोगांवर आणि त्यावरील जीवघेण्या उपचारांवर मात करून माझी जगात नवीन ओळख निर्माण करेन ज्यावेळी तुम्ही काही तरी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवता त्याचवेळी तुम्ही इतरांची प्रेरणा बनू शकता.”

दोनच वर्षापूर्वी राणे यांना क्षयरोगाने ग्रासले होते, सायकोथेरपीच्या अभ्यासक्रमासाठी मुंबईत ते शिकाऊ प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करत होते. “ खूप वेळ काम करत राहणे आणि रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागात फिरत राहणे याचा ताण माझ्या आरोग्यावर झाला, त्यामुळे मला थकवा आला आणि ताप भरू लागला. त्यानंतर माझ्या फुफ्फूसांत पाणी भरु लागले.” ते सांगतात.

त्यांना कठीण उपचार देण्यास सुरुवात झाली मात्र त्यातून त्यांना आराम मिळाला नाही. सहा महिने त्यांना क्षयरोगाचे उपचार देण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. “ मला सततच्या औषधांच्या मा-याने काविळ झाली. त्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारपध्दती देण्यात आल्या मात्र आराम पडला नाही”. ते सांगतात.

राणे यांच्या मते, क्षयासाठी करण्यात येणा-या औषधांच्या मा-याला त्यांच्या शरीरातील विषाणू सरावले होते आणि दाद देत नव्हते. तेरा पैकी केवळ चार औषधे माझ्या शरीरातील बँक्टेरियांवर कामी येताना दिसत होती. त्यामुळे मला बरा होण्याची शक्यता वाटत होती. मात्र अनपेक्षितपणे त्यातील काही औषधांचा परिणाम माझ्या दृष्टीवर होण्यास सुरुवात झाली, त्यानंतर मला कमी ऐकू येवू लागल्याने माझ्या श्रवणशक्तिवरही परिणाम होत असल्याचे समोर आले. माझ्या डोळ्यात पांढरी फुले पडलेली दिसू लागली होती. मग काही औषधांचा मारा कमी करण्यात आला आणि माझ्या पंचेद्रयातील दोष कमी होवू लागले.” राणे सांगतात.

गेल्या दोन वर्षापासून, राणे दिवसांला २० क्षयरोधी गोळ्या घेतात, आणि सहा सहा महिन्यांनी काही इंजेक्शनही त्यांना घ्यावे लागतात. त्यांनतर फुफ्फूसातील पाणी कमी होण्यास आणि आराम मिळण्यास सुरुवात झाली. “ फुफ्फूसांच्या क्षीण होण्याने मी तडजोड करण्यास विवश झालो होतो. मला फूटबॉल खेळायला आवडते, पण मला आता ते जमणार नाही, पण मला या विवशतेवर मात करायची होती. मला विरंगुळा वाटेल असे काही व्यायाम हवे होते त्यामुळे मी जॉगिंग आणि ट्रेकींग यांची निवड केली.” डॉ. राणे आता आनंदाने सांगतात.