मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’

आयआयटी मुंबई येथे सोमवारी संवाद मालिकेतील पहिला कार्यक्रमदि. 26 डिसेंबरला दु. 2 वाजता आयआयटी मुंबई येथे कार्यक्रम स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार साडेतीन हजार विद्यार्थ्यांशी संवादपत्रकार अर्णब गोस्वामी करणार कार्यक्रमाचे सूत्रसंचालनऑनलाईन माध्यमातून एक कोटी तरुणांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प राज्यातील गंभीर आव्हानांवर तरुणांकडून होणार विचारमंथन

0

राज्यातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच शाश्वत विकासासाठी तरुणांची कल्पकता व ऊर्जा यांचा पुरेपूर वापर करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत ‘संवाद मालिके’तील पहिला कार्यक्रम आयआयटी, मुंबई येथे सोमवार, दि. 26 डिसेंबर रोजी दु. 2 वाजता होणार आहे. या कार्यक्रमातून स्वतः मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राच्या धोरणांविषयी सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पत्रकार अर्णब गोस्वामी हे या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळतील.

सरकारच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणा-या मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाश्वत विकासासाठी तरुणांची कल्पकता व ऊर्जा यांचा पुरेपूर वापर शासनाने करावा अशी भूमिका घेतली आहे. याच भूमिकेतून ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ हे व्यासपीठ साकारले जात आहे. यापुढे या व्यासपीठाशी महाराष्ट्रातील पाचशे महाविद्यालयांतून दोन लाख विद्यार्थी जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे, ऑनलाइन माध्यमातून एक कोटी (महाराष्ट्रातील एकूण तरुणांपैकी 40 टक्के) विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प आहे. हे पाऊल ॲक्शन फॉर कलेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन (Action for Collective Transformation) च्या मार्फत उचलले जात आहे.

प्रगतीशील महाराष्ट्राची आराखडा तयार करण्याची तरूणांना संधी

राज्यातील लोकसंख्येत 16 ते 35 वयोगटातील तरुणांचे प्रमाण 35 टक्क्यांहून अधिक आहे. या तरुणाईकडे राज्याच्या प्रगतीसाठी अनेक कल्पना व ध्येय-धोरणे आहेत. त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात अवतरण्यासाठी तसेच शासनातील सर्व घटकांशी त्यांचा संवाद घडवण्यासाठी एका योग्य व्यासपीठाची गरज ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ साकार होत आहे. या व्यासपीठाद्वारे तरुणांना 2025 पर्यंतच्या प्रगतीशील महाराष्ट्राचा आराखडा तयार करण्याची संधी मिळेल.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून राज्यातील 11 गंभीर आव्हानांचे धोरण किंवा कार्यक्रमांमार्फत उपाययोजना केले जाणार आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत होणार आहे.

सुसंवाद, समन्वय व बदलासाठी कार्यवाही

याअंतर्गत महाराष्ट्रात आवश्यक बदल घडवण्याच्या दृष्टीने नेते, नीतीतज्ज्ञ, व्यावसायिक, पत्रकार आणि तरुण यांच्यात आपापसात सुसंवाद घडवणे, राज्यातील 11 मोठ्या समस्यांवर राज्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उपाय आणि योजना जाणून घेणे, अभिप्रेत बदल घडवण्यासाठी विविध सरकारी विभागांमध्ये समन्वय साधून योग्य पद्धतीने कार्यवाही करणे आदी प्रयत्न केले जातील.

ट्विटरच्या माध्यमातून #AskMahaCM या हॅशटॅगसह प्रश्न विचारण्याचे आवाहन

राज्य शासनाविषयी तरुणांची भूमिका, तरुणांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेली पावले, शासनाच्या सहभागामुळे झालेले सामाजिक बदल आणि विविध विषयांवर चर्चा होईल. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रेक्षकांकडून ट्विटरच्या माध्यमातून #AskMahaCM या हॅशटॅगसह प्रश्न विचारण्याचे आवाहन केले जाईल.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून “Transform Maharashtra” (http://transformmaharashtra.com/) ह्या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. Transform Maharashtra ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा आणि आधुनिकीकरण यांची बांधणी करणे हे या स्पर्धेचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील सगळे नोंदणीकृत महाविद्यालयीन विद्यार्थी (कनिष्ठ महाविद्यालायासाहित) हे स्पर्धेसाठी पात्र आहेत. निवडलेल्या उमेदवारांसोबत आव्हानांसंबंधी चर्चा करण्यात येईल. हा उपक्रम एक शक्तिशाली कल्पना आहे आणि मुख्यमंत्र्यांना असा विश्वास आहे कि राज्याच्या विकासासाठी आणि ‘Transform Maharashtra’ साठी तरुणांच्या सामर्थ्याचा नक्की फायदा करून घेता येईल. हा उपक्रम Action for Collective Transformation तर्फे राबविण्यात येणार आहे.