पारंपारिक हस्तकला जतन करणाऱ्या पंचकन्या !

पारंपारिक हस्तकला जतन करणाऱ्या पंचकन्या !

Tuesday November 17, 2015,

4 min Read

महात्मा गांधी म्हणाले होते की, केवळ बोलणेच उपयोगाचे नाही, हस्तकला एक असा व्यवसाय आहे, ज्याचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. खरेतर सर्वात महत्वाची गरज आहे ती म्हणजे हा आमचा मुख्य उद्योग आहे आणि आमच्या गावातील समृध्द ग्रामीण परंपरांचे जतन करण्यासाठी आपण त्यांची पुनर्स्थापना केलीच पाहिजे आणि त्यावर लक्ष दिले पाहिजे.”

ती कलाकुसर असेल, शिवणकाम असेल, नक्षीकाम असेल किंवा नवनिर्मिती आणि शिल्पकला असेल; जे लोक यामध्येच आपला बहुतांश वेळ घालवतात तेच या कामातून मिळणा-या समाधानाला समजू शकतात. हस्तशिल्प, जे स्वत:च खूप व्यापक आहे आणि स्वत:च्या दैनिक सुखोपभोगाशी संबंधित नाही. पैसे वाचविण्यासाठी आपल्या घराची डागडुजी स्वत:च करण्यात आणि खूपच कलाकुसरीने आपल्या घराला एक नवे रूपडे देण्याचा आनंद प्राप्त करण्याच्या अनुभवात जमीन अस्मानाचा फरक आहे. आज आपण जाणून घेऊया हस्तशिल्पांच्या क्षेत्रात संपूर्ण जिद्दीने काम करणा-या काही महिला उद्यमींच्या बाबत.

अर्बन कला-सविता अय्यर

कला आणि सर्जनशिलतेबाबतच्या आपल्या जिद्दीने सविता अय्यर यांनी सन२०१२ मध्ये ‘अर्बन कला’ची मूहुर्तमेढ रोवली. त्यांच्या उत्पादनात चित्रकारी केलेल्या जूट आणि कँनव्हासच्या बँग्ज, दागिने,भित्तीचित्र, की होल्डर, ट्रे इत्यादी वस्तूंची मोठी साखळीच पहायला मिळू शकते. लाकूड, नारळाच्या करवंट्या, जूटचे जुने तुकडे आणि अन्य टाकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांनी स्थिरता आणि नक्षीकाम यांना सर्जनशिलतेच्या उंच पातळीवर पोहोचविण्यात यश मिळवले आहे.

image


एथनिक शेक- श्रीजता भटनागर

श्रीजता भटनागर यांनी सन२०१४मध्ये आपला छंद असलेल्या हस्तशिल्पाला नवे रुप देण्याच्या क्रमात ‘एथनिक शेक’ची स्थापना केली. येथे कलेच्या पारंपारिक आणि आधुनिक प्रचलनांना वापरून कपडे आणि नित्योपयोगी वस्तू, दुपट्टे,स्टोल, सलावार-कमीज, हँन्डबँग्ज, मूर्ती घराच्या सजावटीच्या वस्तू, भिंतीवरील लटकवण्याच्या शोभेच्या वस्तू आणि घोंगड्या इत्यादींच्या मोठ्या साखळीची ओळख होते. यातून शिल्पकार आणि कलाकार यांना सरळ संपर्क करून त्यांना पूर्णत: सहकार्य केले जाते आणि वस्तू करून घेतल्या जातात. त्यातून ही गोष्ट नक्की केली जाते की, त्यांना त्यांच्या कलेचा योग्य मोबदलाही मिळावा. याशिवाय त्यांच्यासमोर असलेल्या अडीअडचणी देखील सोडविण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यातून फायदा होतो आणि ग्राहकांचा पाठिंबा मिळवण्यासही मदत होते.

साधना- लिला विजयवर्गीय

सन १९९८ मध्ये लीला विजयवर्गी य़ांनी केवळ पंधरा महिलांसोबत सुरू केलेल्या ‘साधना’ मध्ये आज ६२५ महिला कारागिरांची संख्या जमवण्यात त्यांना यश आले आहे. उदयपूर येथील ही संस्था महिलांना आर्थिक आणि सामाजिक स्तरावर सक्षम करण्यासाठी चालविली जाते. या संस्थेची पूर्णत: मालकी कलावंतीच्या हाती आहे. आणि मिळणा-या उत्पन्नावर केवळ त्यांचाच हक्क आहे. याशिवाय त्यांना आपले उत्पन्न वाढविण्यासाठी इतर पर्याय उपल्ब्ध आहेत. ‘साधना’ महिलांच्या कुर्ते, घरगुती वस्तू, दागिने याशिवाय पुरूषांच्या उपयोगातील वस्तूंची निर्मिती करते.

सबला हँन्डीक्राफ्ट्स- मल्लमा यलवार

मल्लमा यलवार यांनी सन१९८६ मध्ये सबला संघटनेची स्थापना केली. बाजीपूरमध्ये स्थापन केलेल्या या संस्थेत महिलांच्या प्रश्नावर काम केले जाते. येथे महिलांना अनेक प्रकारच्या कौशल्यांत आपला हात अजमावण्यासाठी प्रेरणा दिली जाते आणि त्यातून उत्पादकता वाढवून उत्पन्न वाढविण्यासाठी मदत केली जाते. ‘सबला’ ने पारंपारिक लंबाणी आणि कसूटी शिल्पकला पुनर्जीवित करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी तयार केलेल्या सर्व उत्पादनात पारंपारिक हस्तनिर्मितीच्या उच्च गुणवत्तांचा परिचय होतो.

क्रियेटिव हँन्डीक्राफ्टस् – इसाबेल मार्टिन

सुमारे पंचवीस वर्षांआधी इसाबेल मार्टिन नावाच्या स्पँनिश मिशनरी मुंबईच्या अंधेरी भागात राहात होत्या. आजूबाजूच्या झोपड्यात राहणा-या महिलांनी त्यांच्याकडून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मिळवताना मदत घेतली. त्यांनी एका स्थानिक संस्थेच्या मदतीने झोपड्यातील दोन महिलांना शिलाईचे काम तर इतर काहीजणींना सॉफ्ट टॉय,कपडे आणि अन्य पारंपारिक हस्तशिल्प तयार करण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. इसाबेल यांनी आपल्या स्त्रोतांच्या मदतीने त्यांच्याकडून तयार झालेल्या उत्पादनांना स्थानिक स्तरावर तसेच स्पेन,फ्रान्स, आणि इटली पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शिलाईच्या त्या पहिल्या शिक्षणानंतर दोन दशकांनी ‘क्रिऐटिव हँन्डिक्राफ्ट’ सध्या तीनशे पेक्षा जास्त महिलांना पूर्णवेळ आणि चारशेपेक्षा जास्त महिलांना अंशकालीन रोजगार मिळवण्याची संधी देत आहे. या महिलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू मुंबईच्या उपनगरांत, अंधेरी, कांदीवली, आणि बांद्रा या भागातील तीन दुकानात विक्रीसाठी ठेवल्या जातात.

कोणत्याही वस्तू कशा तयार केल्या जातात, आणि त्यांना का तसे तयार केले जाते हे जाणून घेणे सध्याच्या काळात जास्त महत्वाचे आहे. हस्तशिल्प साहित्य मूळत: तयार करण्याची एक सामूहिक भाषा आहे जी वस्तूंना शिकण्याचे मूल्य मिळवून देते. हे तर खरेच आहे की हस्तकलेच्या वस्तू स्वस्तात मिळत नाहीत, पण त्यांची किंमत केवळ पैश्यात नाही करता येणार. हस्तकलेच्या वस्तूंचे आपले स्वत:चे वेगळे सौंदर्य सुख असते आणि आपले वेगळे मूल्य देखील! मग त्या स्थानिक असोत किंवा जुन्या काळातील साध्या फँशनच्या असोत.