देशातील सामाजिक उपक्रमात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उचलली जबाबदारी

स्वच्छता आणि पाणीपुरवठा क्षेत्रात युनिलिव्हर आणि कोकाकोलाची कामगिरी!

देशातील सामाजिक उपक्रमात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उचलली जबाबदारी

Sunday September 18, 2016,

3 min Read

पतंजली सारख्या स्वदेशी अभियानाने लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे की, विदेशातून या देशात उद्योग निर्माण करण्यास आलेल्या कंपन्यांना या देशातील जनतेच्या अस्मितेशी काहीच देणे घेणे नाही, त्या केवळ नफा कमविण्यासाठी आणि या देशातील संपत्ती आपल्या देशात नेण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे विदेशातून या देशात गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेल्या कंपन्यांना आपल्या सीएसआर कामकाजात मानवी आधिकाराच्या भावनेने काम करण्याचे नवे अाव्हान निर्माण झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही विदेशी उद्योग कशाप्रकारे या देशातील जनतेच्या कल्याणकारी कार्यात कार्यरत आहेत याची ही माहिती करून घेऊया.

image


हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीने गेल्या अनेक वर्षापासून देशात अनेक प्रकारची कॉस्मेटीक, निर्मलक उत्पादने घरोघर लोकप्रिय केली आहेत. या बहुराष्ट्रीय उद्योगाने ‘ चांगल्या समाजाची उभारणी आणि चांगल्या उद्योगाची उभारणी’ या सू्त्रांतर्गत ‘युनिलिव्हर हेल्प अ चाईल्ड ५’ हा कार्यक्रम घेतला. त्यात ‘लाईफबाॅय हॅन्ड वॉशिंग बिहेविअर चेंज प्रोग्राम’ या नावाने लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावण्याच्या उपक्रमाचा समावेश केला. यातून एक कोटी लोकांना आरोग्यकारक सवयी आणि सांडपाणी व्यवस्थापन याबाबत जागरुक केले जाणार आहे. 

image


२.४ दशलक्ष लोकांना चांगले पाणी मिळत नाही आणि त्यांना चांगल्या सांडपाणी व्यवस्थापनाची गरज आहे, या अभावी दरवर्षी दोन लाख मुलांना पाण्याशी संबधित आजार होत असतात. पाचव्या वाढदिवसापूर्वीच ही मुले डायरिया सारख्या रोगांना बळी पडतात. यापैकी ८८% मुलांचा मृत्य़ू स्वच्छ पाणी आणि अन्न यांच्या अभावे होतो. यापैकी ३५% मुलांना हात धुण्याचे महत्व माहिती नसते. लाईफबाॅयच्या या अभियानातून हजारपैकी पाच वर्षाखालच्या ३१८मुलांना या सवयी नसल्याने मृत्यू आल्याचे सत्य समोर आले आहे. देशात लाईफबोयचे अभियान १३० दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचले आहे. यासाठी कंपनीने ‘वॉश’ नावाचे अभियान सुरू केले असून त्यात अनेक भागीदार संस्था आणि सेवाभावी संस्थानी सहभाग घेतला आहे. १५० पेक्षा जास्त कर्मचारी, शालेय विद्यार्थी या अभियानातून हात धुण्याच्या सवयीबाबात जागृती करत आहेत. यासाठी ‘हेल्प अ चाईल्ड रिच ५’ या अभियानाला चांगले यश येत आहे. युनिलिव्हरचे सीईओ पॉल पोलमँन याबाबत सांगतात की, “ खरा बदल आणण्यासाठी आम्ही सारे मिळून काम करत आहोत आणि त्यासाठी तज्ञ, स्त्रोत, तसेच धोरण यांची आखणी केली जात आहे”. कंपनीच्या १५०० पेक्षा जास्त कर्माचा-यांनी तसेच स्वयंसेवी लोकांनी शाळांमध्ये जाऊन याबाबत हात धुण्याच्या सवयीबाबात जागरुकता निर्माण करण्याचे काम हात घेतले आहे. यासाठी मुलांचे सुपर हिरो असलेल्या कॉमिकबुकचा आधार घेतला जात आहे. २००८पासून ‘युनिलिव्हर’ ने जागतिक हात स्वच्छ दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. शहरी गरीब मुलांना देखील चांगल्या आरोग्यदायी वातावरणात रहाता यावे असा त्यामागे हेतु आहे. या सा-या सामाजिक कामांचा फायदा कंपनीच्या उत्पादन विक्रीतही मोठ्या प्रमाणात होणार आहे.

image


दुसरी संस्था कोकाकोलाने देखील अशाच प्रकारे सामाजिक जाणिवेतून दरवर्षी पाण्यामुऴे होणा-या आजाराबाबत जागृती अभियान हाती घेतले आहे. शितपेयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते त्यामुळे चांगले स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ते प्रयत्नरत आसतात. अफ्रिकेसारख्या देशातून दहा टक्के उत्त्पनातील निधी कंपनीने या कामी देण्यास सुरूवात केली आहे. कंपनीच्या बॉटलिंग प्लांटमध्ये स्थानिक जनतेचा अधिकाधिक सहभाग मिळवून त्यांना चांगल्या स्वच्छ पाण्याचे महत्व आणि ते मिळवण्यासाठीची उपाययोजना याबाबत जागृत केले जात आहेत.