रणांगणापासून ते गावातील वस्त्यांपर्यंतचा ‘अनंत’ प्रवास

0

भिंतीवर अभिमानाने लटकणारा लष्कराचा गणवेश, वाफाळलेला चहा घेत अनेक मुद्द्यांवर होणारी गरमागरम चर्चा, काहीतरी नवे आणि मनोरंजक असे शिकण्याची मनापासूनची आवड आणि इच्छाशक्ती हाच ‘अनंत सर्वीसेस अँड डेव्हलपमेंट’चा पाया आहे. कौशल्य निर्मितीचा कार्यक्रम काय आहे हे शेतक-यांना व्यवस्थित समाजावे यासाठी तांत्रिक साधने उपलब्ध करण्याचे काम ‘अनंत’ करते. या व्यतिरिक्त ‘अनंत’ ही कंपनी रोजगारमेलाडॉटकॉम ( rojgarmela.com) या नावाने जॉब पोर्टल सुद्धा चालवते.

कंपनीने नुकतेच ‘इनोवेंट इंपॅक्ट इन्व्हेस्टमेंट होल्डिंग’ आणि ‘उपाय सोशल वेंचर्स’ द्वारे आपले प्रारंभिक भांडवल गोळा करण्यात यश मिळवले आहे. कंपनीचे संस्थापक अजीत सिंग सांगतात, की समाजात राहणा-या प्रत्येक समुदायाच्या सर्वसमावेशक विकासाचा मार्ग निश्चित करण्याच्या मूळ भावनेनेच त्यांनी ‘अनंत’ ची स्थापना केली होती. ते सांगतात, “ कोण्या एका विचाराला बांधून घेऊन किंवा एकाच प्रकारच्या कामाला वाहून आम्ही स्वत:ला मर्यादित करु इच्छित नाही. ‘अनंत’चा शाब्दिक अर्थ ‘अमर्याद’ आणि ‘असंख्य’ असा सुद्धा आहे. आणि आमचे प्रतीक चिन्ह सुद्धा आमची ‘अनंतता’च दर्शवतो.”

जेव्हा आपण अनंतच्या गतकाळाची पाने चाळतो, तेव्हा आपल्या समोर अजीत यांनी लष्करात घालवलेला काळ आपल्या समोर येतो. लष्करात त्यांनी घालवलेला काळ हा त्यांच्या साहसी प्रवृत्तीचा निदर्शक आहे. ते सांगतात, “ मी लष्करात घालवलेल्या काळाने मला कठीणातील कठीण परिस्थिती आणि लोकांना हाताळण्याची क्षमता विकसित करण्याचे शिकवले. या व्यतिरिक्त मोठ्या चमूंना सांभाळणे आणि दूर दूरच्या विभागांचा खडतर प्रवास करणे यासाठी देखील याच काळाने मला सक्षम बनवले. मी जेव्हा गतकाळावर नजर टाकतो तेव्हा मला लक्षात येते, की मी जे काही लष्करात असताना केले ते केवळ आव्हानात्मक आणि मजेदार होते इतकेच नव्हे, तर माझा गणवेश निघून गेल्यानंतर देखील काहीतरी नवे करावे यासाठी या काळाने मला सक्षमपणे तयार केले. मी देशातील काही कठीण ठिकाणांवर देखील राहिलेलो आहे. या व्यतिरिक्त एकदा मी १९९९ च्या संपूर्ण संघर्षात देशाची सेवा केली आहे. माझ्या समोर आलेली प्रत्येक स्थिती आणि परिस्थिती माझ्यासाठी जीवनाचे महत्त्व समजून घेण्याची एक संधी सुद्धा होती. याच कामामुळे मला देशातील विविध भागात राहणा-या देशवासीयांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांना कोण-कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याबाबतही मला जाणून घेता आले.”

लष्कराची नोकरी सोडल्यानंतर अजीत यांनी समस्याग्रस्त लोकांसाठी काहीतरी करण्याचा विचार केला आणि विकास व्यावसायी ( development professional ) बनण्याचा निर्णय घेतला. ते दिल्लीत एका चहाच्या दुकानावर आपल्या काही मित्रांना भेटत असत आणि याबाबत विस्ताराने चर्चा करत असत. ते सांगतात, “ आम्ही पाच मित्र देशाच्या ग्रामीण भागांमध्ये कौशल्य निर्मिती प्रकल्प विकसित करणा-या विविध संघटनासाठी काम करत होतो. आम्ही या भागांमध्ये राहणा-या लोकांसमोर येणारी आव्हाने आणि समस्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला. त्यात आमच्या लक्षात आले, की आम्ही जे काही त्या लोकांसाठी करत होतो त्याने त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा सकारात्मक परिणाम होत नाही आहे.”

चहाच्या दुकानावर होणा-या या दीर्घ स्वरूपातील चर्चेमधूनच ‘अनंत’ची कल्पना साकार झाली. ते सांगतात, “ या कामाचा सुरूवातीचा प्रवास खूपच खडतर होता आणि काळासोबत आमचे सहकारी सुद्धा कमी होत गेले. शेवटी आम्ही दोघेच, सुरेश कुमार आणि मीच तेवढे उरलो.” गेल्या एक वर्षाच्या काळात या टीमने आपले लक्ष ‘पोस्ट प्लेसमेंट ट्रेकिंग’ आणि ‘मूल्यांकन जॉब पोर्टल’ अशा तीन मुख्य क्षेत्रांवर केंद्रीत केले.

अजीत सांगतात, “ आम्ही लाभार्थी आणि नोकरीवर ठेवणा-या मालकांच्या अपेक्षा आणि इच्छा, तसेच त्यांच्या प्रतिक्रियांना समजून घेण्यासाठी डेटा गोळा केला. हा डेटा आम्ही विकसित केलेल्या अर्जावर संकलित करवून घेतला. या माहितीचा उपयोग करून आमचे भागीदार एक विश्लेषण अहवाल तयार करून संपूर्ण प्रकल्पाची निगरानी करू शकतात. या व्यतिरिक्त ते कामगिरीचे मूल्यांकन करण्यासोबत संपूर्ण आराखड्यामध्ये अभ्यासक्रम सुधारणा लागू करण्यासाठी एक रणनीतीच्या स्तरावर निर्णयही घेऊ शकतात.”

या व्यतिरिक्त ‘अनंत’ने मूल्यांकनाच्या क्षेत्रावर देखील लक्ष टाकून शेतक-यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. अजीत सांगतात, “ आम्ही भारतीय कृषी कौशल्य परिषदेसोबत (एएससीआय) भागीदारी करून वेगवेगळ्या कामांसाठी प्रशिक्षित शेतक-यांचे मूल्यांकन करणे सुरू केले. वास्तविक हे काम तांत्रिक स्तरावर करणा-या काही सुरूवातीच्या संस्थांपैकी आम्ही एक होतो.” त्यांनी आता पर्यंत १९ विभागीय भाषा असलेल्या ११ राज्यांमधील ३० हजाराहून अधिक शेतक-यांचे मूल्यांकन केलेले आहे.

निम्नस्तरावर नोकरी शोधत असलेल्या ग्रामीण युवकांना संभाव्य नियोक्त्यापर्यंत पोहोचवणारे रोजगारमेलाडॉटकॉम ( rojgarmela.com) हे एक एसएमएसवर आधारित वेब व्यासपीठ आहे. याबाबत अधिक माहिती देताना अजीत सांगतात, “ या सेवांचा मोफत लाभ बेरोजगार असलेला कोणताही युवक घेऊ शकतो ही आमच्या या मॉडेलची सर्वात मोठी विशेषता आहे. अधिकाधिक लोकांना मदत करता यावी या उद्देशाने आम्ही नियोक्त्यांसोबत आमचे चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत आहोत.”

अजीत सांगतात, “ साधनांच्या कमतरतां व्यतिरिक्त सुरूवातीच्या काळात आमची विश्वसनीयता निर्माण करण्याचे सर्वात मोठे आव्हान आमच्या समोर होते. आमच्या सारखी नवी संघटना इतक्या छोट्या टीमच्या सहाय्याने इतकी मोठी कामे करण्यासाठी सक्षम आहे याबाबत लोकांना विश्वास नव्हता.” तथापि, ‘अनंत’ने जलदगतीने प्रगती केली. आता आपल्या सुदैवाने दुस-याच वर्षी ती नफ्याच्या स्थितीत आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष देखील ‘अनंत’कडे गेल्यामुळे ते सुद्धा ‘अनंत’मध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. नव्या युगातील गुंतवणूकीबरोबर ‘अनंत’ स्वत:ला नव्या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तयार करत आहे. यासोबतच ती नव्या मार्केटिंगच्या नीतीचा अंगीकार करून आपली चमक दाखवण्याच्या तयारीत आहेत.

‘अनंत’च्या नियतीबाबत बोलत असताना अजीत आठवणींमध्ये रमून जातात. ते सांगतात, “ जेव्हा काही चांगली माणसे एकत्र येऊन एक टीम तयार करतात, तेव्हा त्याचा परिणाम सुद्धा चांगलाच होतो. आमची टीम एक अनुभवी लोक आणि तरूणांचे एक अचूक असे मिश्रण आहे. या टीमचे बहुतेक सदस्य हे मैदानात भक्कमणे पाय रोवून उभे राहणारे आहेत. तर काही व्यावहारिक आणि क्रियाशील दृष्टीकोन असणारे आहेत. आम्ही सर्व सुरूवातीच्या संघर्षमय दिवसांचे साक्षीदार आहोत. सर्वांनी मालकी आणि बांधिकलकीच्या भावनेला योग्य न्याय दिला आहे.”

जिथे परिस्थिती वेळेसोबत बदलत जाते अशा क्षेत्रात ‘अनंत’ काम करत आहे. या पार्श्वभूमीवर अनंतला देखील आपले विचार लवचिक ठेवून त्या प्रमाणे ते व्यक्त करण्याची आवश्यकता असते. अजीत सांगतात, “ आमच्या स्वत:च्या आणि आमच्या भागधारकांच्या गरजांना पूर्ण करण्याच्या उद्देशाने नव्या तंत्रज्ञानाला अनुकूल होणे, आणि त्यांना विकसित करण्याच्या दिशेने आम्ही सतत क्रियाशील राहत असतो. तुम्ही किती चांगले करू शकता आणि किती चांगले करण्याची तुमची इच्छा आहे या मध्ये चांगले संतुलन राखणे हा आमचा मुख्य सिद्धांत आहे.”

worked with CNews, ETV Marathi, Mumbai Sakal Daily, IBN Lokmat and Mi Marathi as a Reporter, Senior Reporter / Copy Editor and Associate Editor. Presently working as freelance writer and Translator. Poetry ( Ghazal), singing and writing is my passion.

Related Stories