गोसी खुर्द प्रकल्पाला गती देण्यासाठी ‘नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन’बरोबर सामंजस्य करार 

0

गोसी खुर्द प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला असून, याद्वारे पहिल्या टप्प्यात 1 हजार 70 कोटी रूपयांची कामे कंपनीकडून केली जातील. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


राज्य शासनाचा जलसंपदा विभाग व केंद्र शासनाची नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ही कंपनी यांच्यात गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामाबाबतचा सामंजस्य करार आज झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामास गती देण्याच्या दृष्टीने ‘एनबीसीसी’कडे प्रकल्पातील काही घटकांची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 1 हजार 70 कोटी रूपये किंमतीची कामे कंपनीस सोपविण्यात येत असून, त्यामुळे प्रकल्पाच्या कामाचे नियंत्रण व अंमलबजावणी होऊ शकेल. जलसंपदा विभागाकडील प्रकल्पांबाबत अशा प्रकारे प्रथमत:च बाह्य संस्थेमार्फत काम (Outsource) करण्यात येत आहे. ही संस्था प्रकल्प सल्लागार व अंमलबजावणी अशी दोन्ही कामे करेल. (सौजन्य -महान्युज)