सारे अडसर दूर करत मुंबईच्या या महिला ऑटोचालक दाखल झाल्या रस्त्यावर!

सारे अडसर दूर करत मुंबईच्या या महिला ऑटोचालक दाखल झाल्या रस्त्यावर!

Saturday April 22, 2017,

2 min Read

वर्षभरातपूर्वी महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक नविन योजना लागू केली असल्याने सोमवारी मुंबईतील ऑटो रिक्षा चालक महिला रस्त्यावर दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारने त्यांच्यासाठी पाच टक्के रिक्षा परवाने राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता.


Image: India Times

Image: India Times


याचा अर्थ मुंबईत ४६५ महिलांना हे परवाने मिळू शकतात, त्यापैकी १९ जणींनी मागील सप्ताहात मुंबईत रिक्षा सुरू केल्या आहेत. मागील वर्षीच महिलांच्या रिक्षा ठाण्यात सुरू झाल्या. याचा महिला प्रवाश्यांना खूप मोठा दिलासा मिळाला, ज्यांना व्यक्तिगत मदतीची गरज होती, शिवाय सामाजिक सुरक्षेची हमी नव्हती की त्यांचा छळ किंवा छेडछाड होणार नाही. मात्र या व्यवसायात येण्यासाठी देखील महिलांना खूप मोठ्या प्रमाणात झुंज द्यावी लागली आहे.

तीन मुलांची माता असलेल्या छाया मोहिते या मुंबईतील पहिल्या महिला ऑटो चालिका ठरल्या आहेत, त्या म्हणाल्या की, “घरकामापेक्षा हे काम चांगले आहे, यातून मला चार पैसे जास्त कमाविता येतात आणि भविष्याच्या सुरक्षेची हमी घेता येते. यापूर्वी मी साधी सायकल सुध्दा कधी चालविली नाही, पण आज मी ऑटो रिक्षा चालविते, मी स्वतंत्र आहे त्यातून मला समाधान आणि आनंद मिळतो”.

या शिवाय सरकारने नुकतीच पिंक टक्सी योजना जाहीर केली आहे त्यातून महिला महिलांना शहरभर फिरवू शकतात. मुंबई हे खूप वर्दळीचे आणि दाटी-वाटीचे शहर आहे, त्यामुळे खूप लोकांना ऑटोची गरज पडते, त्यावेळी प्रशिक्षित महिला जर ती ऑटो चालवित असेल तर महिलांना ते सोयीचे पडते. महिलांना परवाने देतानाच सरकारने महिला चालवित असलेल्या ऑटोंचा रंग वेगळा असावा, जेणे करून त्यांचे वेगळेपण दिसून यावे असा प्रयत्न केला आहे.त्यामुळे या रिक्षा चालविणा-या महिलांना त्यांच्या पुरूष सहका-यांशी स्पर्धा टाळता येणार आहे.

सुधीर डोईफोडे, ज्यांनी या सा-या महिलांना प्रशिक्षण दिले, त्यांना या 'ए टू झेड' प्रकारच्या ज्ञानाचा फायदा महिलांना देत असल्याचा अभिमान वाटतो. सध्या ते ४० जणींना प्रशिक्षण देत आहेत आणि आणखी पाचशे महिलांनी त्यासाठी स्वारस्य दाखवले आहे, ज्यांना परवाना घेवून शहरात रिक्षा चालवायच्या आहेत. (थिंक चेंज इंडिया)