‘आधाराशिवाय चालता येणार नाही’ असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही; 'त्यांनी' कसे केले माऊंट एव्हरेस्ट सर

‘आधाराशिवाय चालता येणार नाही’ असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही; 'त्यांनी' कसे केले माऊंट एव्हरेस्ट सर

Wednesday July 12, 2017,

5 min Read

चार वर्षांपूर्वी अपर्णा प्रभूदेसाई यांना सांगण्यात आले होते की त्या आधाराशिवाय चालू शकणार नाहीत, मागील महिन्यात या ४७वर्षीय महाराष्ट्रीयन महिलेने माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. 


image


अपर्णा प्रभू देसाई यांनी जी म्हण आहे ‘जम्पींग आऊट ऑफ द फ्राईंग पॅन इन टू द फायर’ त्यानुसार अविश्वसनीय रित्या हे शक्य करून दाखवले आहे. कारण ज्या महिलेला डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना आधार घेतल्याशिवाय साधारण चालणे देखील शक्य होणार नाही त्यांनी स्वप्नवत वाटणा-या जगातील सर्वात उंच शिखराची चढाई केली.

“ दोन महिने व्हिलचेअर मध्ये बसून घालविल्यानंतर, माझ्या समोर असाच काहीतरी जगावेगळे करून दाखविण्याचा पर्याय होता.” त्या म्हणाल्या. हे सारे घरात पडून छोटा अपघात झाल्यांनतर सुरू झाले. त्यानंतर अनेक प्रकारच्या चाचण्या झाल्या आणि भलतेच निदान झाले. डॉक्टरांना आणि तज्ज्ञांना त्यांची स्थिती न सुधारण्याजोगी असल्याचे दिसून आले.

अधिक शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार यांचा तिटकारा आल्याने अपर्णा यांनी त्यांच्या डॉक्टर असलेल्या बंधूकडून सल्ला घेतला. त्यांनी त्यांना सल्ला दिला की, त्यांनी थोडे चरबीचे नियमन करावे जेणे करून त्यांच्या शरीराच्या हाडांचे ओझे पेलवता यावे आणि वेदना कमी व्हाव्या. योगायोगाने त्या धावू लागल्या आणि प्रथम जेंव्हा त्या तीन किमी धावल्या, त्यांनी निर्धार केला की त्या अशा प्रकारच्या व्यायामात खंड पडू देणार नाहीत. त्यांच्या जीवनातील दुस-याच गिर्यारोहणाच्या प्रसंगात ऑक्टोबर २०१३मध्ये त्यांनी एव्हरेस्टच्या पायथ्या पर्यंत चढाई केली होती.


image


त्या शिखराचे असामान्य सौंदर्य आणि प्रमाण पाहता त्यांनी निर्धार केला की, त्या पुन्हा येतील आणि शिखर सर करतील. नंतरची चार वर्ष त्यांनी चढाई करण्याचा ध्यास पूर्ण करण्याच्या तयारीत घालविली. २२जून रोजी अखेर त्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले.

खडतर प्रवास

अपर्णा यांनी ऑनलाइन च्या मदतीने निधी गोळा करून आपले माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न साकारण्याची तयारी सुरु केली. त्यावेऴी त्या बोधीवृक्ष येथे ग्बल कन्सल्टंट म्हणून कार्यरत होत्या, जी त्यांची स्वत:ची कंपनी आहे. निधी संकलन करताना त्यांना चांगल्या प्रकारे लोकांचा पाठिंबा देखील मिळत होता. त्यावेळी त्यांना या शिखराबाबत खरेतर फार काही माहिती देखील नव्हती. त्यांच्या मैत्रिणीने धावण्याच्या क्लबमध्ये एका माणसाशी ओळख करून दिली ज्यानी त्यांना एव्हरेस्ट बाबत माहिती दिली. अपर्णा यांनी त्यांना सांगितले की, त्या देखील गिर्यारोही आहेत आणि त्यांना एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा आहे. सुरूवातीला त्यांना आश्चर्यच वाटले पण त्यांनी त्यांना सुचविले की त्यांनी नीट माहिती घ्यावी, अभ्यास करावा की त्याना कोणत्या बाजूने चढाई करायची आहे.

उत्तरेच्या बाजूने हिमनदीचा सूळका आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या वडीलांची बरीच वर्षे नियुक्ती झाली होती. त्यामुळे त्यांना या ठिकाणी गेल्यावर त्यांच्या बालपणीच्या आठवणीचे स्मरण झाले, जेथे पाच वर्षे त्यांच्या वडीलांनी सेवा दिली होती. त्यांनी उत्तर बाजूने सर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्राथमिक आणि आधुनिक सराव सुरू केला. त्यानंतर या मोठ्या कामगिरीसाठीच्या तयारीला त्या लागल्या.

वय नव्हे केवळ संख्या


image


४७ वर्षांच्या महिला म्हणून, किंवा स्त्री म्हणून कोणताही अडथळा अपर्णा यांच्या मार्गात आला नाही. “ मी विचारांच्या शाळेत शिकले होते की, वयस्कर लोक शिखरांवर चांगली कामगिरी करू शकतात. कारण तुम्हाला शांत आणि संयमी पणाने वावरायचे असते आणि त्यासाठी वयाचा फायदाच होतो. न संपणारे दिवस पहात तुम्हाला राहायचे असते आणि शांतपणाने संयमाने वागायचे असते. तुम्ही इंटरनेटवर नसता. कुणाच्या संपर्कात नसता ” त्या म्हणाल्या. त्यांचा विश्वास आहे की, तरूण रक्ताला समजणे आणि भावूक होणे हे ज्येष्ठांपेक्षा पटकन जमते. त्यातून एक प्रकारे मानसिक उभारणी होत असते ज्यांचा त्यांना फायदा झाला असे त्या मानतात.

सदैव मृत्यूचा सामना

शारिरीक आव्हानांप्रमाणेच, एव्हरेस्ट चढाई करताना मनाची एकाग्रता आणि मनोधैर्य तसेच कणखरपणा यांची गरज असते. खासकरून त्यावेळी जेंव्हा इतरांची ताजी उदाहरणे तुमच्या समोर असतात. अगदी फूटभर चढून जाणे सुध्दा येथे आव्हानात्मक असते.

“ अंधारात तुम्ही केवळ चालत राहता. एका मागे एक पावले आणि तुम्हाला तुमच्या खाली सारे खोरे दिसत असते. यातून क्षणभर तुम्ही कुठींत होवून जाता.”

या मध्ये असेही क्षण आले की त्यांना सारे सोडून द्यावेसे वाटले. खासकरून दमछाक होत होती त्यावेळी. अपर्णा यांनी मग स्वत:लाच प्रश्न केला, “ मला खरंच तसे करायचे आहे का? मी आधीच ८४०० मीटरला आले आहे मागे फिरावे का?” पण त्यांचा निर्धार कायम राहीला आणि त्या मागे फिरल्या नाहीत. त्यांना जसे आठवते की कठीण कामे त्यानी पूर्वी देखील केली होती ज्यावेळी त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा सराव सुरू केला होता.

चढाई करून माघारी

जरी अपर्णा यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले, त्या अनभिज्ञ होत्या की त्यातून त्यांनी इतरांना कशी प्रेरणा दिली आहे.

.

image


अशी माणसे त्यांना भेटायला आली जी त्यांना कधीच भेटली नाहीत किंवा त्यांनी पत्रे पाठवली ज्यांचा पूर्व परिचय नव्हता. “पुणे रनिंग नावाचा छान मित्रपरिवार मला लाभला आहे. मी माझी धावण्याची सुरूवात त्यांच्यासोबत केली.” त्यांनीच त्यांना सकारात्मक राहण्यास आणि समाजात वावरण्याचे बळ दिले. अपर्णा यांच्या पालकांनी देखील त्यांना चांगल्या प्रकारे पाठबळ दिले. “ माझ्या वडीलांना खरोखर मी कोणत्या स्थितीत आहे ते माहिती होते, ते हिमवादळात सापडले होते आणि ग्लेशीयरच्या बाजूला होते. तरीही ते म्हणाले नाहीत की ‘हे करू नकोस’. या पाठबळानेच त्यांना सारे काही दिले.

या यात्रेतून धडा

हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपर्णा यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांच्या हाती केवळ कसोशीने प्रयत्न करत राहणे इतकेच होते असा त्यांचा विश्वास होता. त्या चार वर्षात रोज खडतर प्रशिक्षण त्यांनी घेतले. कधी कधी त्या अगदी पहाटे दोन वाजता उठल्या होत्या, आणि सराव केला होता. अपर्णा यांना माहिती होते की त्या हे करू शकतात मात्र त्यांना हे करून दाखवायचे होते. स्वत:वर विश्वास ठेवत त्यागपूर्ण पध्दतीने, एकाग्रपणे आणि शिस्त तसेच संयमाने त्या जगातील सर्वोच्च स्थानी पोहोचू शकल्या.

या यात्रेतून अपर्णा शिकल्या की, मानवी गौरव आणि सन्मान कसा मिळतो. “ हे सारे विलोभनीय आहे, शिखरावर स्वत: किती लहान आहोत याची जाणिव होते. शिखराने माझ्यातील ‘माझा’ मला शोध लागला. माणूस म्हणून आपण खरंच किती लहान आहोत.”

    Share on
    close