स्वस्तातील हॉटेल्समध्ये उत्कृष्ट सेवेची हमी म्हणजे ‘ट्रीबो’

स्वस्तातील हॉटेल्समध्ये उत्कृष्ट सेवेची हमी म्हणजे ‘ट्रीबो’

Tuesday February 23, 2016,

6 min Read


भारतात बजेट (स्वस्तातील) हॉटेलचा वाईट अनुभव अशा हॉटेल्समध्ये राहिलेल्या कुणालाच नवीन नसावा. अशा हॉटेल्समध्ये राहिलेल्याला प्रत्येकवेळी काही न काहीतरी दगाफटका बसतोच. पण कल्पना करा की तुम्ही एका हॉटेलमध्ये जाता आणि तिथला कर्मचारी वर्ग खूप विनयशील आहे, रुम खूप स्वच्छ आहेत आणि सगळे काही सुव्यवस्थित आहे.

बजेट हॉटेलमध्ये असा अनुभव देण्यासाठीच ट्रीबो हॉटेल्सची सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षी जून महिन्यात बंगळुरुमध्ये चार हॉटेल्ससह सुरुवात केलेले ट्रीबो आज ११ शहरांमध्ये कार्यरत आहे. रद्द केलेली बुकिंग वगळून त्यांचे एकूण वार्षिक उत्त्पन्न ११ दशलक्ष डॉलर एवढे आहे.

image


बजेट हॉटेलच्या २० कोटी डॉलरच्या मार्केटमध्ये अशाप्रकारची सेवा पुरविण्यासाठी अनेकजण पुढे आले आहेत. विशेषतः गेल्यावर्षी मुळात जम बसलेली मोठमोठी हॉटेल्स आणि नवीन मात्र अनुभवी कंपन्या रिंगणात उतरल्या आहेत. ओयो रुम्सने त्याच्या स्पर्धक झो रुममध्ये गुंतवणूक करुन त्याच्यावर मिळविलेला ताबा असो किंवा लास्ट मिनिट हॉटेल बुकिंगच्या क्षेत्रात पेटीएमच्या प्रवेशाची बातमी असो, या सगळ्या बातम्यांमुळे बजेट हॉटेल सेगमेंट बातम्यांमध्ये आले.

तरीही ट्रीबोला विश्वास आहे की ते या क्षेत्रात वर्चस्व निर्माण करु शकतात. “आम्ही एक गतिचक्र प्रणाली स्थापन करत आहोत. जी ग्राहक आणि भागीदार या दोघांच्या फायद्याचे ठरणारे संघटनात्मक आणि शाश्वत वर्तुळ निर्माण करेल,” ट्रीबो हॉटेल्सचा सहसंस्थापक असलेला ३१ वर्षांचा सिद्धार्थ गुप्ता सांगतो. अनेक वर्षांपासूनचे मित्र असलेले सिद्धार्थ, राहुल चौधरी आणि कदम जीत जैन यांनी मॅककिन्सेने पसंती दिलेल्या कंपन्यांसाठी काम केल्यानंतर आणि मिंत्राच्या स्ट्रॅटेजी टिमचे सह-नेतृत्व केल्यानंतर ट्रीबोची सुरुवात केली. या विभागामध्ये येण्याच्या निर्णयाबाबत बोलताना सिद्धार्थ सांगतो की मध्यमवर्गीय घरातून आलेलो असल्यामुळे आणि कन्सल्टन्ट म्हणून कामाचा अनुभव असल्यामुळे आम्ही तिघांनाही हॉटेल रुम्सचा दोन्ही बाजूने अनुभव घेतला होता.

image


मात्र एक संघटनात्मक आणि शाश्वत मॉडेल निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष या मार्केटमध्ये उतरणे सोपे नव्हते. इतर स्टार्टअप्स प्रमाणेच या तिघांनीही सर्वप्रथम बाजाराचे अन्वेषण करायला आणि विविध हॉटेल्सना कोल्ड-कॉलिंग करायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आले की जेव्हा मालक स्नेहपूर्ण, शांत आणि वाजवी असतो त्यावेळी व्यवस्थापक तिथे फायर वॉल म्हणून काम करत असतो.

या सेगमेंटमध्ये त्यांची नुकतीच सुरुवात असल्याने त्यांना हॉटेल्सना विश्वास द्यावा लागला की ट्रीबो त्यांना फायदा करुन देऊ शकते असं सिद्धार्थ सांगतो. “या व्यवसायात पैसा मिळवण्यासाठी आणि ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा यासाठी हॉटेल मालकाला फायदा होईल याची तुम्हाला खबरदारी घ्यावी लागते,” असं सिद्धार्थ सांगतो.

मालकाला फायदा होणे म्हणजे वार्षिक महसूलात वाढ होणे, ग्राहकांची संख्या वाढणे आणि त्याला कारभारात मदत होणे. कमीत कमी हमी देऊन हे शक्य होऊ शकते. ट्रीबोच्या बाबतीत कमीत कमी हमी ज्या मॉडेलवर काम करते ते मॉडेल आंशिक इन्वेन्टरी मॉडेलपेक्षा वेगळे आहे.

त्यामुळे, जर हॉटेलचा ऑक्युपंट रेट 40 टक्के असेल तर ट्रीबो तेवढ्याचीच हमी देते. “महिनाअखेरीस जर मी तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त व्यवसाय आणण्यात अयशस्वी ठरलो तर तोट्याचे पैसे आम्ही आमच्याकडून देतो,” सिद्धार्थ सांगतो. कुठल्याही पाठबळाशिवाय टीम या गोष्टीची हमी देते. गेल्या जून महिन्यात ट्रीबोला निधी उभारण्यात यश मिळाले असल्यामुळे व्यवसायातून फायदा नाही झाला तरी ट्रीबो ते पैसे देऊ शकते.

ट्रीबोमध्ये गुंतवणूकीबाबत सैफ पार्टनर्सचे मयांक खंदुजा सांगतात, “ही टीम हा व्यवसाय वेगळ्या पद्धतीने करत आहे. त्यांच्यासाठी हे खरोखरच एक ब्रॅण्ड उभारण्याचे काम आहे आणि ते क्वालिटी सर्विस देत असल्यामुळे आम्हाला वाटतं की ब्रॅण्ड उभारण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी त्यांचे मॉडेल खरोखरच उपयोगी आहे.”

कॅप लिमिटच्या वर जो काही नफा होईल त्यातील केवळ काही टक्के भाग ट्रीबो स्वतःला ठेवते. जर नियमित व्यवसाय पाच लाखांचा असेल तर तेवढी रक्कम हॉटेल मालकालाच मिळते. आता जर त्यांनी सात लाखांचा व्यवसाय केला तर वरच्या जास्तीच्या दोन लाखाच्या ३० टक्के रक्कम ट्रीबोला मिळते. यामुळे हॉटेल मालकाला कुठल्याही प्रकारचे नुकसान न होण्याची हमी मिळते.

“आंशिक मॉडेलच्या विपरीत, हॉटेल रुम्स रिटेलमध्ये विकत घ्यायचे आणि होलसेल किंमतीत विकायचे हे मोठं बारमाही दुखणं मी टाळलं. हे सततचं दुखणं असतं. तुमच्या स्पर्धेत अनेकजण असल्यामुळे तुम्ही हॉटेल मालकाला दिलेले दर तुम्ही कमी करु शकत नाही आणि जर तुम्ही किंमत वाढवली तर तुम्ही ग्राहक गमावता,” सिद्धार्थ सांगतो.

ट्रिबो हॉटेल विकत घेत नाही किंवा हॉटेलचा दैनंदिन कारभार सांभाळत नाही. पण सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे एकदा का काही बदल केल्याने व्यवसायात अधिक फायदा होत असल्याचे हॉटेल मालकांच्या लक्षात आले की त्यानंतर ग्राहकांचा अनुभव गांभिर्याने घेतला जातो.

मयांक पुढे सांगतो की हॉटेल व्यवसायात नेहमीच खूप स्पर्धा असणार आहे आणि चायना मार्केटप्रमाणे यामध्ये ब्रॅण्डेड कंपन्या आणि संकलक दोन्ही प्रकारचे व्यावसायिक असणार आहेत. “जेव्हा की ब्रॅण्ड प्ले निवडणे खूप कठीण आहे. दर्जेदार कामामुळे योग्य मूल्य प्राप्त होते. ट्रीबो टीमने त्यांच्या योजनांची अंमलबजावणी करुन चांगला दर्जा निर्माण केला आहे. मी स्वतः काही हॉटेल मालकांशी बोललो आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या,” मयांक सांगतात.

ट्रीबोद्वारे ‘माय ग्रीन अवर’ नावाचा उपक्रम राबविला जातो. ज्यामध्ये प्रत्येक कर्मचारी दर पंधरवड्याला ग्राहकांच्या कॉल्सना उत्तर देण्यासाठी एक तास व्यतित करतो. त्याचबरोबर हॉटेलचा दर्जा ट्रीबोच्या मानकानुसार राखला जातो आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अनेकदा टीम, विशेष करुन हॉटेल मालकाला कधीही प्रत्यक्ष न भेटलेले टीममधील लोक हॉटेलमध्ये एक किंवा दोन रात्रीसाठी रहायला जातात.

ग्राहकांना आनंद देणारे वेगवेगळे उपक्रम राबविणे हा ट्रीबोच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा भाग आहे. एक ग्राहक ट्रीबोविषयीचा त्यांचा अनुभव सांगतात, “ट्रीबो अक्षय मेफ्लॉवर हे एक नवीन हॉटेल आहे. एकदा आमच्याकडे बंगळुरुमध्ये एका लग्नासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लोक येणार होते. त्यांच्यासाठी मी तिथे बुकींग केलं होतं. यावेळी हॉटेल मालक, मॅनेजर आणि फ्रट्ण डेस्कचे कर्मचारी या सगळ्यांचाच खूप चांगला अनुभव आला. पाहुण्यांना जणू घरीच असल्याप्रमाणे वाटलं.”

सिद्धार्थ पुढे सांगतो की हॉटेलमध्ये दर्जा राखून व्यवसाय निर्माण होण्याच्या दिशेने काम होते की नाही याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी ‘फ्रेण्ड ऑफ ट्रीबो’ हे मॉड्युल तयार केले आहे. हा लोकांमार्फत केला जाणारा क्वालिटी ऑडिट प्रोग्रॅम आहे. ज्यामध्ये विद्यार्थी, प्रवासी, कॉर्पोरेट्स आणि फ्रिलान्सर्सचाही समावेश असतो. या अंतर्गत हे लोक कोणालाही कळू न देता ट्रीबोच्या कुठल्याही हॉटेलचे ऑडिट करुन त्यांना अभिप्राय देऊ शकतात.

image


ट्रीबोचे गुणवत्ता हमीसाठी केलेले इन-हाऊस परिक्षण आणि ऑडिट्स खूप चांगले असले तरी ‘फ्रेण्ड ऑफ ट्रीबो’ हे प्रत्येक ट्रीबो हॉटेल खरोखरच चांगले आणि दर्जेदार सेवा देणारे आहे याची खात्री करण्यासाठी तयार केलेले एक शाश्वत मॉडेल आहे.

मॅट्रिक्स पार्टनरचे तरुण दावडा सांगतात की जेव्हा थर्ड पार्टीकडून लेखा परिक्षण आणि सर्वेक्षण केले गेले, तेव्हा ज्यांच्याशी आमची टीम बोलली अशा ग्राहकांपैकी जवळपास ७० टक्के ग्राहक ट्रीबोच्या सेवेबाबत खूष होते आणि त्यांची या हॉटेलमध्ये परत येण्याची इच्छा होती.

“असं खूप क्वचित पहायला मिळतं की एखाद्या टीममधली प्रत्येक व्यक्ती अव्वल असते. राहुल आणि सिद्धार्थ दोघांकडे पूरक कौशल्य आहे. ते त्यांच्या विजनबाबत गंभीर आणि खूप स्पष्ट आहेत. त्यांच्याबरोबर कदमही आहे, जो खूप चांगले सीटीओ आहे,” असं तरुण सांगतात.

डिसेंबर २०१५ ला या टीमने सरासरी रुम रेट २१०० रुपयाने दर दिवशी नाईट स्टेचे १००० ते १२०० बुकिंग प्रमाणे ७६ टक्के रुमचे बुकिंग केले. येत्या तीन वर्षात १०० शहरांमध्ये ६० हजार रुम्ससह २० हजार हॉटेल्समध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याची या टीमची योजना आहे.

ग्राहकांना ऑनलाईन हॉटेल बुकिंग करण्यासाठी तयार करणे हे अजूनही हॉटेल बुकिंग इण्डस्ट्रीसमोरचे मोठे आव्हान आहे. अजूनही ५० टक्के बुकिंग हे ऑफलाईन माध्यमातूनच होते.

वर्षभरात ओयो रुम्सला सगळ्यात जास्त १०० दशलक्ष डॉलर्स एवढा निधी सॉफ्टबँकद्वारा उपलब्ध झाला. टायगर ग्लोबलकडून निधी उपलब्ध झाल्यावर कमी किंमतीमधील हॉटेलच्या क्षेत्रात झोस्टेलने झो रुमच्या माध्यमातून प्रवेश केला.

ट्रीबो संकलक मॉडेलनुसार काम करत नसले तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झालेल्या संकलकांबरोबर ट्रीबोची स्पर्धा आहेच. मेक माय ट्रीप आणि गोबिबो सारख्या कंपन्याही त्यांच्या स्पर्धेत आहेत.

आणखी काही स्टार्टअप्स संबंधित कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

दुबईतील एका लहानशा रो हाऊसमध्ये सुरुवात करत, संपूर्ण मध्य पूर्वेत सर्वात मोठे ट्रॅव्हल पोर्टल बनण्याचे ‘हॉलीडेमी’ चे लक्ष्य...

‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’..फूड चेन विश्वातलं आत्मविश्वासाचं पाऊल !

खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंटचे पर्याय देणारं पुण्यातील ‘क्विंटो’

लेखक : सिंधु कश्यप

अनुवाद : अनुज्ञा निकम