परदेशातील करोडोची नोकरी सोडून गोशाळेद्वारे गावाचा कायापालट करत आहेत 'विज्ञान गडोदिया'

0

देशात अशा तरुणांची कमी नाही जे समाजासाठी सर्वस्व पणाला लावून आपल्या ऐहिक सुखांना तिलांजली देतात. आम्ही अशा दोन तरुणांची आपल्याला ओळख करून देत आहोत ज्यांनी करोडोंच्या कमाईवर पाणी सोडून समाज व शेतकऱ्यांसाठी सर्वस्व पणाला लावले.

काही दिवसांपूर्वी जेव्हा जयपूर मध्ये सकाळी-सकाळी लोकांचे फोन खणखणू लागले की तुम्हाला गाईचे शुद्ध दुधाची आम्ही घरपोच सेवा देवू शकतो व त्याचबरोबर गाईच्या दुधाच्या गुणवत्तेबद्दलही ते लोकांना समजावू लागले. तेव्हा लोक अचंबित झाले की अशी सेवा देणारी व्यक्ती कोण?

वस्तुतः हे काम करीत आहेत आयआयटी दिल्लीतील बायोकेमिकल इंजिनिरिंग व आयआयम कोलकत्ता मधून एमबीए चा अभ्यास करणारे विज्ञान गडोदिया. येस बँकेत व्हाईस प्रेसिडेंट असणारे विज्ञान गडोदिया यांना सुरुवातीपासून गायींबद्दल कनवळा होता. याला कोणत्याही धार्मिक कारणाची जोड नव्हती तर गावाला आजीकडून गाईच्या दुधाच्या पौष्टिक गुणधर्माबद्दल ऐकूण होते. पुढच्या अभ्यासादरम्यान त्यांना कळले की गायीच्या दुधातील पौष्टिक गुणधर्मामुळे कुपोषणाला आळा बसू शकतो तसेच गोशाळेला प्रोत्साहन देऊन गावातील अर्थव्यवस्थेलाही भक्कम केले जाऊ शकते. आज एकट्या जयपूर मध्ये विज्ञान यांचे २५० ग्राहक आहेत.

भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पारंपारिक व्यवसायाला मजबूत केले पाहिजे.

विज्ञान २००५ मध्ये एस बँकेच्या मायक्रोफायनान्स शाखेचे अध्यक्ष असतांना त्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीला जवळून बघितले व त्यांना जाणवले की मायक्रोफायनान्स हे शेतकऱ्यांच्या समस्येचे समाधान नसून शेतकऱ्यांनी त्यांच्या पारंपारिक व्यवसायाला मजबूत केले पाहिजे. जुलै २००६ मध्ये विज्ञान यांनी नोकरीचा राजीनामा देऊन सेंद्रिय खत, ग्रामीण बीपीओ सारख्या कामांना हाताळले पण ते मनस्वी गोसंवर्धनाच्या कामासाठी आसुसलेले होते. ज्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये जयपूर पासून ७० किलोमीटर दूर लिसारीया गावात १.७२ हेक्टर जागेत गाईच्या दुधाच्या वितरणासाठी डेअरी फार्म उघडले. विज्ञान यांनी युअर स्टोरीला सांगितले की, ‘देशात गायीच्या दुधाची पौष्टिकता सर्वश्रुत असून पचायला ते हलके आहे. गाय हे असे जनावर आहे की त्याला आपण जसे खाऊ घालू तसे ती दुध देते. पण अतिरिक्त दुधासाठी गावात लोक म्हशी पाळतात, जरी गाई पाळल्या तरी जर्सी गाई पाळतात जिच्या पालनाचा खर्च हा महागडा असतो. अशातच देशी गाई शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे व तिचे दुध हे प्रकृतीसाठी पौष्टिक ठरू शकते’.

गावकऱ्यांनी पाळल्या गाई –

मागच्या चार वर्षांपासून विज्ञान यांच्या सहज डेअरी फार्म मध्ये वासरांसह १५० गाई असून, यामुळे प्रेरित होवून जवळपासच्या सुमारे २५ गावातील शेतकऱ्यांनी गाई पाळल्या आहेत. देवरला येथील सीताराम यादव सांगतात की, ‘आम्हाला विज्ञान यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आम्ही जुलै २०१५ मध्ये एक गाय व ६ महिन्यानंतर दुसरी गाय खरेदी केली व आता आपल्या तीन म्हशी विकून ६ गाई खरेदी करून त्यांचे ५० लिटर दुध विकत आहोत. यामध्ये खर्च कमी व फायदा जास्त आहे.

गावातच उघडले आहे दुध गोळा करण्याचे केंद्र

सहज डेअरीच्या ५० गाई जवळपास ५०० लिटर दुध देतात व या व्यतिरिक्त विज्ञान यांनी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून दुध गोळा करण्यासाठी एक केंद्र उघडले आहे. सहज डेअरी मध्ये देशी गायीच्या दुधापासून ताक, लोणी, दही, तूप व आईस्क्रीम बनवले जाते. देशी गायीच्या या तंत्रज्ञानावर दृष्टीक्षेप टाकत राजस्थान सरकारने त्यांच्या कंपनीला सहज इनक्लूसिव अपॉरच्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड डेअरीचे एमओयू केले जिथे शेतकऱ्यांना पाठवून प्रशिक्षित केले जाते. त्यांच्या यशाला बघून आयआयटी दिल्ली मधून पॉलीमर इंजिनिअरींग करून मागच्या २० वर्षांपासून रिलायन्स पॉलीमर मध्ये नोकरी करणाऱ्या त्यांच्या भावाने विज्ञानच्या बरोबरीने काम करण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेमधून प्राविण्य मिळवलेले रणदीप सिंह, चार करोडोंचा व्यवसाय सोडून लोकांचे आयुष्य सुखी करण्याच्या उद्देशाने ते गावाला परतले व गोमुत्र, शेण, यांना आपले शस्त्र बनवून लोकांना गायी पाळण्याबद्दल प्रेरित करीत  आहे. ते सांगतात की, ‘’जेव्हा कधी गावाला फोन करायचो तेव्हा कुणाच्या तरी मृत्यूची बातमी ऐकायला मिळायची. मागच्या दोन वर्षांपासून घरातीलच तीन लोकांच्या मृत्यूची बातमी एेकून विचार केला की अशा आयुष्याचा काय फायदा जिथे आपण घरच्यांचे प्राण नाही वाचवू शकत’’.

मुंबईतील शामलाल कॉलेजमधून बीटेक व कॅलिफोर्नियाच्या सेंट जॉस युनिव्हर्सिटी मधून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवी संपादन केल्यानंतर मुंबई मध्ये डिपार्टमेंटल स्टोरची चेन उघडणारे श्रीगंगानगरचे रणदीपसिंह कंग यांना रासायनिक औषधांनी झालेल्या गावकऱ्यांच्या मृत्यूने याप्रकारे हादरवले की त्यांनी आपला सगळा व्यवसाय सोडून गावातील लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी वाटचाल केली. वर्षाला ४ करोड कमवणारे कंग यांनी आपले ऐशो आरामाचे आयुष्याला तिलांजली देऊन, गोमूत्र, शेण, गांडूळ, कडूलिंबापासून खत तयार करून त्याच्या प्रयोगासाठी गावक-यांना विनवित आहे. यासाठी कंग कुटुंबाने मुंबईतील आपला गाशा गुंडाळला व आपले घर श्रीगंगानगर गाठले.

गावाला परतून गायींना बनवले उपजीविकेचा भाग

रणदीप सिंह कंग यांना अमेरिकेहून परतल्यावर २००६ मध्ये मल्टीनॅशनल कंपनीत लाखांमध्ये मासिक उत्पन्नाचे पॅकेज मिळत असतांना त्यांनी स्वतःच्या व्यवसायाची सुरवात करून मुंबईमध्ये पहिले डिपार्टमेंटल स्टोअर उघडले. त्यानंतर सलग तीन स्टोअर्स उघडले ज्यांचे वार्षिक उत्पन्न ४ करोड रुपयांपर्यंत गेले. आयुष्य मजेत चालले असतांना गावाकडून येणाऱ्या बातम्या रणजीत यांना दुखी करीत होत्या. याचे कारण एकच असायचे, कॅन्सर. ते याच्या मुळाशी गेल्यावर त्यांना कळले की शेतामध्ये अंदाधुंद होणारा रासायनीक औषधांचा होणारा वापर हा शेती व पिकांना घातक असून जमीन नापीक करत आहे. पण जेव्हा गावाला या औषधांचा शेतमालावर होणारा बेसुमार प्रयोग बघून राज्यस्थान श्रीगंगानगरचा परिसर हा कॅन्सर ने मृत्युमुखी पडणाऱ्या पंजाबच्या मार्गावर चालत असल्याचे त्यांना जाणवले. कंग यांनी गायींच्या पालना बरोबरच जमिनीची सुपीकता तपासून कामाला सुरवात केली. शेण खताने जमीन कसदार होऊ शकत नाही. म्हणून त्याच्यात गोमूत्र, कडुलिंब यांच्या मिश्रणाचे खत तयार केले.

कंग यांनी युवर स्टोरीला सांगितले की,’’शेतकऱ्याला दुकानदार एक झाकण औषध टाकायला सांगतो पण मालकाला वाटते की दुकानदाराने कदाचित कमी प्रमाण सांगितले असेल म्हणून तो मजुरांना दीड झाकण टाकायला सांगतो,मग मजुराला वाटते मालकाने कमी सांगितले असेल म्हणून तो स्वतः कडून अजून अर्धा झाकण वाढवतो अशामुळे त्या  रासायनिक औषधांची मात्रा दुप्पट होते व त्याचमुळे काळानुसार  किड्यांची सहनशक्ती ही वाढत जाते. परंतु आपले देशी तंत्र इतके प्रभावी आहे की त्याने शेतीची सुपीकता तर वाढतेच पण शेतामधील विषाचा प्रभावपण कमी होत आहे’’.

शेण व गोमुत्र यांचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना फायदे समजावले

रणदीप सिंह यांना शेतकऱ्यांसाठी काम करण्याची नवीन दिशा सापडली व ते २०१२ मध्ये व्यवसाय गुंडाळून श्रीगंगानगर येथे आले. श्रीकरणपूर मधील आपल्या १०० बिघे शेतीलाच त्यांनी एका प्रयोग शाळेचे रूप दिले. डेअरीमधून गोमूत्र गोळा करून त्यामध्ये रुई, कडुलिंब, लसून यांचे मिश्रण उकळून ते बाटली मध्ये भरून शेतकऱ्यांना समजवण्यासाठी गावोगावी जात असत. सुशिक्षित असलेल्या रणदीप यांच्या गोष्टी शेतकऱ्यांना हळूहळू पटायला लागल्या तसेच शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जैविक सुपिकतेचा प्रयोग केला ज्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. रणदीप सांगतात की,’’ खरे तर हे काम सोपे नव्हते पण ते स्वतः सधन व संपन्न असल्यामुळे हे शक्य झाले. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना गाय पालनासाठी  प्रेरित करावे लागले. जोपर्यंत प्रत्येक शेतकरी गाय पाळत नाही तो पर्यंत इतक्या संखेने गोमूत्र व शेण उपलब्ध होणार नाही’’.

गोमूत्रामध्ये १६ प्रकारचे पोषण मुल्य असून झाडांना १४ प्रकारच गरजेचे आहे

रणदीप यांच्या मतानुसार गोमूत्रात १६ प्रकारचे पौष्टिक घटक उपलब्ध आहेत पण झाडांना १४ प्रकारचेच गरजेचे आहे. गोमूत्र फंगस व वाळवीला संपवून त्यांचे पोषण मुल्य वाढवते. मग यानंतर कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांची गरज पडत नाही. जिथे रासायनिक खतांच्या वापराणे शेतामध्ये २-३ दिवसातच पाण्याची गरज भासत असे तिथे जैविक खतांच्या वापरणे शेताला ७-८ दिवसांनी पाणी द्यावे लागायचे. या प्रक्रियेचा अजून एक भाग म्हणजे रणदीप आता एका गोशाळेतून प्रत्येक दिवशी ५०० लिटर गोमूत्र पाच रुपये लिटर भावाने विकत घेतात. यासाठी या गोशाळेला कोणत्याही दानावर निर्भर रहाण्याची गरज वाटत नाही.      

अशाच नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'

दोन अभियंता मित्रांचा ‘सात्विक’ प्रयत्न, सेंद्रीय अन्न खा निरोगी रहा ! आता शेतातील ‘शुध्द’ फळं भाज्या थेट तुमच्या स्वयंपाकघरात !

पंचवीस हजार डॉलरचे काम सोडून झाले गुराखी! ,‘कश्मीरइंक’च्या बाबर यांनी पश्मीना कारागीरांच्या कल्याणासाठी रात्र-दिवस केला एक!

लेखिका : रिम्पी कुमारी
अनुवाद : किरण ठाकरे