शिक्षणाच्या स्टार्टअपसाठी AIIMS मधून डॉक्टरचे शिक्षण आणि IASची नोकरी सोडणारे २४ वर्षाचे रोमन सैनी !

0

जगभरात एक वाद अनेक काळापासून सुरु आहे की, मोठा कोण आहे? तो जो आपल्या आयुष्यासाठी एक उद्देश निश्चित करतो आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला प्राप्त करतोच. किंवा ते जे लक्ष्य गाठूनही त्याला नाकारत काहीतरी नवे करू इच्छितात. नवे काम देखील असे, ज्यात सध्या त्याला एक तुटका फुटका रस्ता दिसतो, लक्ष्याचा लांब लांब पर्यंत ठिकाणा नसतो. परंतु यात सर्वात मोठी बाब ही आहे की, नवे काम आपल्यासाठी नाही, समाज आणि देशासाठी आहे. मोठे दोन्ही आहेत, पण तुम्ही कशाला मोठे म्हणाल? वेगवेगळ्या लोकांची उत्तरे देखील यात वेगवेगळी असतील. परंतु मला विश्वास आहे की, अधिकाधिक लोक दुस-या व्यक्तीला मोठे म्हणतील.

आता एक सत्य तुमच्या समोर आणणार आहे. एका व्यक्तीने देशातील सर्वात पहिली प्रतिष्ठीत वैद्यकीय संस्था एम्स मधून २०१३मध्ये डॉक्टरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्या व्यक्तीने देशाची सर्वात मोठी आणि प्रतिष्ठीत परीक्षा नागरी सेवा परिक्षामध्ये २०१३या वर्षात यश प्राप्त केले आणि १८वे स्थान मिळविले. आयएएस बनण्याच्या दोन वर्षापर्यंत त्या व्यक्तीने जबलपूरमध्ये सहायक कलेक्टर म्हणून काम केले. मात्र, तुम्हाला विश्वास बसणार नाही की, त्यांनी आयएएसची नोकरी सोडली. तुमच्या मनात प्रश्न असेल, आता काय करेल ती व्यक्ती? आता ती व्यक्ती विद्यार्थ्यांना शिक्षणा दरम्यान येणा-या सर्व समस्यांमध्ये त्यांची मदत करून त्यांची स्वप्ने साकार करण्यात त्यांची मदत करू इच्छिते. आश्चर्यचकित झाले ना तुम्ही. तुम्हाला आता त्या व्यक्तीला भेटवणार आहे. त्या व्यक्तीचे नाव रोमन सैनी असे आहे. 

आयएएस बनल्यानंतर का सोडली नोकरी?

वय केवळ २४ वर्ष. जयपूर मध्ये जन्मलेले रोमन सैनी यांनी इतक्या कमी वयात ते सर्व प्राप्त केले, ज्याच्यासाठी प्रत्येकजण कधी न कधी स्वप्न बघतो. एम्सचे डॉक्टर बनणे आणि नंतर आयएएस बनणे. मात्र रोमन यांनी स्वतःसाठी काहीतरी वेगळाच विचार करून ठेवला आहे. रोमन आपले मित्र गौवर मुंजाल यांच्यासोबत मिळून यु ट्युबवर मुलांना शिकवितात. त्यांच्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देतात. विशेषकरून त्या मुलांसाठी जे डॉक्टर बनू इच्छितात, किंवा सिविल सेवेची तयारी करत आहेत, किंवा कंप्युटर प्रोग्रामर्स बनू इच्छितात. रोमन आणि त्यांचे मित्र गौरव यांनी मिळून एक ई – ट्युटर मंच तयार केले Unacademy.in या मंचावर सर्व शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. विशेष बाब ही आहे की, रोमन यांची ही योजना खूप यशस्वी होत आहे. परिणाम हा आहे की, त्यांना फॉलो करणारे १० विद्यार्थी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण  देखील झाले आहेत. त्याव्यतिरिक्त यु ट्युबवर रोमन यांच्या या प्रशिक्षणाच्या विडीओला एक कोटी दहा लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. फेसबुक पेजवर रोमन यांचे ६४हजार फॉलोअर्स आहेत, तसेच ट्विटर २०हजार लोक रोमनच्या या नव्या अभियानात सामील झाले आहेत.

कशी सुचली कल्पना?

रोमन सैनी यांनी युवर स्टोरीला सांगितले की,“माझ्या लहानपणीचे आणि सर्वात चांगले मित्र गौरव मुंजाल यांनी २०११मध्ये काहीतरी करण्याचा विचार केला, जेव्हा मी एम्समध्ये होतो. त्यांनी यु ट्यूबवर अनअकॅड्मी डॉट इन ची सुरुवात केली. ज्यावर ते शिक्षणाशी संबंधित विडीयो टाकत होते. जे पूर्णपणे मोफत होते, त्यासाठी त्यांनी मला देखील त्यात सामील करण्याचा सल्ला दिला. मला गौरव यांची ही कल्पना आवडली. त्यामुळे मी त्यात सामील झालो. आम्ही मोफत दुस-यांना योग्य माहिती देऊ शकतो. याहून मोठी गोष्ट अजून काय असू शकते.” 

रोमन यांनी सांगितले की, गौरव देखील बंगळूरू मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होते, मात्र ‘अनअकँड्मी डॉट’साठी त्यांनी आपली नोकरी सोडली. रोमन सैनी यांचे हे देखील म्हणणे आहे की, त्यांच्या मनात नागरी सेवेसाठी खूप सन्मान आहे. त्यामुळे आयएएस सारखे पद सोडण्यासाठी सोपे नव्हते, त्यांचे कुटुंबीय देखील या निर्णयाने खुश नव्हते. मात्र नंतर रोमन यांच्या कुटुंबीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि खूप साथ दिली. रोमन यांच्या वडिलांनी युवर स्टोरीला सांगितले की, “रोमन भारतीय शिक्षणात क्रांतिकारी बदल आणू इच्छितात आणि या कामाला लक्ष्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.” कुटुंबियांना आशा आहे कि, रोमन आपल्या या कामात देखील खूप यश प्राप्त करतील. 

रोमन यांच्या वडिलांनी अजून एक गोष्ट युवर स्टोरीला सांगितली. त्यांनी सांगितले की, रोमन यांच्या मनात एक घटना घर करून गेली होती. झाले असे होते की, बिहारचा एक मुलगा आयएएस बनू इच्छित होता. आयएएसच्या प्रशिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी आपली जमीन गहाण ठेवली. मात्र, दुर्देवाने तो मुलगा आयएएस बनू शकला नाही. या बाबतची माहिती जेव्हा रोमन यांना झाली तेव्हा, त्यांना धक्का बसला. त्यांना वाटले की, असे काहीतरी झाले पाहिजे की, मुले मोफत अशा परीक्षांची तयारी करू शकतील. फक्त हीच घटना सतत त्यांच्या मनात फिरत होती. आणि आज परिणाम तुमच्या समोर आहे.

या घटनेने रोमन यांच्या मनावर मोठी छाप सोडली. आणि एके दिवशी रोमन यांनी निश्चय केला की, ते शिक्षणाच्या क्षेत्रात काहीतरी मोठे काम करतील. असे असूनही रोमन यांच्यासाठी वैयक्तिकरित्या हा एक सोपा निर्णय नव्हता आणि त्यात अनेक पैलू सामील होते, त्यामुळे त्यांनी अधिकाधिक लोकांसोबत याबाबत बातचीत केली आणि अखेर जिद्दीचा विजय झाला.

रोमन सैनी यांनी सांगितले कि,“माझा उद्देश उच्च शिक्षणावर भर देणे आणि ऑफलाईन पद्धतीने प्राप्त करणे योग्य नाही. मला वाटते की, कोटी लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी खूप मोठ्या स्तरावर तांत्रिक विकास आणि पात्र लोकांची गरज आहे. त्यामुळे मी या अनअकॅड्मीच्या पद्धतींना पूर्णपणे मान्य करतो.

गौरव मुंजाल आपले जवळचे मित्र रोमन सैनी यांच्याबाबत सांगतात की,“मी एक आयएएस अधिका-याला आपल्या कल्पनेबाबत सांगितले, त्यांना चांगले वाटले आणि त्यांनी निश्चय केला की, ते पूर्ण वेळ आमच्या सोबत काम करतील. खरंच रोमन बहादूर आहेत. सर्वच अशी हिम्मत करू शकत नाहीत.”

गौरव आपल्या या मंचाबाबत सांगतात की, अनअकॅड्मी डॉट इन देशातील सर्वात मोठे ई – लर्निंग मंच आहे. ज्यावर ५०० पेक्षा अधिक मोफत अभ्यासक्रम आहेत आणि ज्यामुळे देशाचे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ सामील आहेत.

असे खूप कमी लोक असतात, ज्यांना आपल्याहून अधिक देशाची चिंता असते. युवर स्टोरी आशा करतात की, रोमन सैनी आपले स्वप्न असेच साकार करत रहावेत.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण  कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

भारताचा सर्वात तरुण प्रशासकीय अधिकारी : रोमन सैनी

सकारात्मक बदलांचे दूत घडविणारा 'प्रखर भारतीय'

जिल्हाधिकारी झाले मुलांचे मित्र, अनवाणी शाळेत जाणा-या पंचवीस हजार गरीब मुलांना ‘चरण पादूका’ योजनेतून दिली पादत्राणे!

लेखक : निरज सिंह
अनुवाद : किशोर आपटे